भविष्य

1 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, तूळ राशीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Rama Shukla  |  Jul 30, 2019
1 ऑगस्ट 2019 चं राशीफळ, तूळ राशीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता

मेष – मित्राच्या पोजेक्टमध्ये पैसे गुंतवाल

आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी तुमच्याकडील पैसे द्यावे लागतील. विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. रचनात्मक कार्यातील रस वाढेल. लोकांकडून मानसन्मान आणि भेटवस्तू मिळतील. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ – दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमवाल

कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे चांगली संधी गमवाल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. रखडलेले पैसे परत मिळतील. एखाद्या संस्थेकडून सन्मानित व्हाल. आत्मसन्मान वाढेल.

मीन- वातावरणातील बदलामुळे आजारी पडाल

आज तुम्ही वातावरणात झालेल्या बदलामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीबाबत समस्या सुटतील. व्यावसायिक भागिदारी फायद्याची असेल. धार्मिक कार्यात मन रमवाल. देणी-घेणी सांभाळून करा. जोखिमेच्या कामापासून दूर रहा.

वृषभ – नोकरी मिळेल

इंजिनिअर लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी मिळण्यात यश मिळेल. व्यापारातील नव्या योजना यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. सामाजिक सन्मान वाढण्याची शक्यता आहे.

मिथुन -व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता

आज कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू नका. व्यवसायातील एखादे  महत्त्वाचे काम रद्द होऊ शकते. उत्पन्न कमी आणि खर्च् अधिक झाल्याने त्रस्त व्हाल. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

कर्क – शारीरिक स्वास्थ चांगले राहील

आज तुमचे आरोग्य उत्तम असेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाला प्राधान्य देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. विनाकारण खर्च करू नका. बिघडलेले काम सुधारेल.

सिंह – तणाव वाढण्याची शक्यता

आज तुमचा कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. प्रेमयुगूलांना निराशा सहन करावी लागेल. आत्मविश्वास कमी जाणवेल. मन अशांत राहील. वादवविवाद करणे टाळा. कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे.

कन्या – मुलांची तब्येत बिघडेल

आज तुमच्या मुलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मुलांच्या आणि स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थाची काळजी घ्यावी लागेल. विनाकारण खर्च करू नका. धार्मिक कार्यातील रस वाढेल. वाहन चालवताना सावध राहा.

तूळ – आर्थिक लाभ होण्याची शक्यता

आज तुम्हाला व्यावसायिक आणि रचनात्मक कामात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. मित्रांसोबत प्रवासाला जाण्याचा बेत आखाल. विनाकारण खर्च करू नका. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक – वाद मिटण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला मोठ्यांच्या सल्लाने घरातील जुने वाद मिटवण्यात यश मिळेल. बाळाचं प्लॅनिंग करण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागिदारीतून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी विरोधक नमतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.

धनु – मतभेद होण्याची शक्यता

अधिकाऱ्यांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात मेहनतीप्रमाणे फळ मिळणार नाही. जोडीदाराशी नाते मजबूत होईल.

मकर- स्वप्न लवकर पूर्ण होईल

आज तुमचे घराचे स्वप्न लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळतील. व्यवसायात रखडलेल्या योजना पूर्ण होतील. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. भावंडासोबतचे वाद मिटण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

Read More From भविष्य