भविष्य

1 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीची रखडलेली कामे पूर्ण होतील

Rama Shukla  |  Sep 30, 2019
1 ऑक्टोबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीची रखडलेली कामे पूर्ण होतील

मेष – घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या

आज तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. त्यांच्या नित्यनेमाच्या कामात लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांना समस्या येण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान मिळेल.

कुंभ – स्थायी संपत्तीत वाढ होईल

आज तुमच्या धनसंपत्तीत वाढ होणार आहे. कौटुंबिक सुखसुविधा वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासाला जाण्याचा योग आहे. 

मीन – व्यवसायात चढ-उतार येऊ शकतात

आज तुमच्या व्यवसायात चढ उतार येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कोर्ट कचेरीतून आराम मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

वृषभ – प्रेमसंबंध सुधारतील

आज तुमच्या घरात प्रेमाचे वातावरण असेल. घरातील आनंदी वातावरणामुळे खुश व्हाल. व्यवसायासाठी भावंडांची मदत मिळेल. सामाजिक समारंभात जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 

मिथुन – रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील

आज व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे जलद गतीने पूर्ण होणार आहेत. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात मंगलकार्याच्या योजना पूर्ण होतील. धार्मिक कार्यात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. 

कर्क – अचानक खर्च वाढणार आहे

आज तुमचा खर्च अचानक वाढणार आहे. कर्ज घेणे टाळा. पदोन्नतीसाठी केलेले प्रयत्न मार्गी लागतील. कामाच्या संत गतीमुळे निराश व्हाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

सिंह – उत्साही वाटेल

आज तुम्हाला दिवसभर उत्साही वाटणार आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. प्रवासादरम्यान विशेष यश मिळणार आहे. रोजच्या कामात व्यस्त राहाल. देणी घेणी सांभाळून करा. 

कन्या – कलह वाढण्याची शक्यता

जोडीदारांसोबत कलह वाढणार आहे. मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेबाबत निराश व्हाल. 

तूळ – कौटुंबिक समस्या येण्याची शक्यता 

आज तुमच्या घरात समस्या निर्माण होऊ शकतात. घाईघाईत कोणताच निर्णय घेऊ नका. उत्पन्नांचे साधन वाढणार आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. वाहन चालवताना सावध राहा. 

वृश्चिक – आर्थिक उन्नती होण्याची शक्यता 

आज शेअर बाजारातून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक उन्नतीची संधी मिळेल. व्यावसायिक व्यवहार लाभदायक असेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. जोखिमेची कामे करू नका. 

धनु – विवाहातील अडचणी दूर होतील

आज तुमच्या विवाहातील अडचणी दूर होणार आहेत. मुलांची कर्तव्य पूर्ण कराल. इतरांची मदत फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. व्यवहारात भागिदाराची चांगली साथ मिळेल.

मकर – समस्या येण्याची शक्यता

आज तुमच्या नोकरीत समस्या येण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. कोर्ट कचेरीच्या कामाबाबत सावध राहा. मित्रांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. 

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार निवडा तुमचे करिअर

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

Read More From भविष्य