भविष्य

10 नोव्हेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीला धनसंपत्तीचा लाभ

Rama Shukla  |  Nov 6, 2019
10 नोव्हेंबर 2019 चं राशीफळ, मिथुन राशीला धनसंपत्तीचा लाभ

मेष – मनासारखे प्रेम मिळेल

आज तुम्हाला तुमच्या मनासारखे प्रेम मिळेल. कोर्ट कचेरीत सुटका मिळेल. नवीन संपर्कातून लाभ मिळेल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. धनसंपत्तीबाबत सावधगिरी बाळगा. 

कुंभ –  मुलांची तब्येत बिघडण्याची शक्यता

आज तुमच्या नकारात्मक विचारांमुळे मुलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. एखाद्या मनाविरूद्ध बातमीमुळे मन निराश होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. मित्रांची मदत मिळेल. 

मीन – नवीन कामे मिळतील

आज तुम्हाला नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ मिळेल. नवीन सहकारी मिळतील. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. आत्मसन्मान वाढेल. प्रेमात त्रिकोण तयार होण्याची शक्यता. 

वृषभ – विद्यार्थ्यांचे अभ्यासातून मन भटकेल

आज आयात निर्यातीच्या व्यवसायात अडथळा येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. कटू शब्दप्रयोग करणे टाळा. मित्रांची भेट होईल. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. 

मिथुन – कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

आज तुमचा दिवस विशेष व्यवस्था करण्यात जाणार आहे. कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. खर्च करणे टाळावे लागेल. व्यावसायिक योजना तयार करा. रखडलेली कामे पूर्ण होतील. 

कर्क –  व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता 

आज एखादे काम रद्द होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तणाव वाढणार आहे. वाहन चालवताना सावध राहा. मुलांकडून एखादी आनंदवार्ता मिळेल. 

सिंह – जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता

आज तुमच्या जोडीदाराच्याय तब्येतीची काळजी घ्या. मन निराश होईल. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. 

कन्या – मित्रांची साथ मिळेल

आज भावंडांमुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. विरोधक त्यांचे मत मंजूर करून घेण्यात यशस्वी होतील. कुटुंबासोबत सुखद काळ घालवाल. आत्मविश्वास कामी होईल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. 

तूळ – विद्यार्थ्यांना यश मिळेल 

विद्यार्थ्यांना लक्ष्य प्राप्त करण्यात यश मिळेल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी संतुष्ठ राहतील. रोजगारासाठी प्रवास करावा लागेल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 

वृश्चिक – आर्थिक संकट येण्याची  शक्यता

आज विनाकारण तुम्हाला खर्च झाल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. कौटुबिक सहकार्य मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची  शक्यता आहे. प्रवासाला जाणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवा.

धनु – आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. फ्रेश वाटल्यामुळे प्रकृतीत सुधारणा होतील. योजना सफळ होतील. धार्मिक कार्यात मन रमवाल. सामाजिक संस्थेद्वारा सन्मानित व्हाल. धुर्त लोकांपासून सावध राहा.

  

मकर – नातेसंबंधांमध्ये कटूपणा येण्याची शक्यता

आज तुमच्या नातेसंबंधांमध्ये कटूपणा येण्याची शक्यता आहे. संकटकाळात मित्र मदत मिळणार नाही. विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागेल. व्यापारात अथवा नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

Read More From भविष्य