मेष – कामात यश मिळेल
कामाच्या ठिकाणी यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. मेहनत करून योजना यशस्वी कराल. शैक्षणिक समस्या दूर होतील. राजकारणातील पकड मजबूत होईल. धुर्त लोकांपासून सावध रहा.
कुंभ – मानसिक ताण जाणवेल
कुंटुंबातील भावनात्मक विषयांमुळे मानसिक अस्वास्थ जाणवेल. मन निराश होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. मात्र रखडलेले पैसे मिळू शकतात. रचनात्मक कार्यात मन रमवाल. धार्मिक कार्यात रस घ्याल.
मीन- नवीन संबध निर्माण होतील
नवीन प्रेमसंबध निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. घरात एखादं मंगल कार्य घडेल. व्यावसायिक प्रगती होईल. मित्रांसोबत प्रवासाचे योग आहेत. पैशांचे व्यवहार करताना सावध रहा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ – आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता
उत्पन्न आणि खर्चाचा योग्य समतोल राखा. कारण त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. घाई गडबडीत कोणतेही काम सुरू करू नका. विरोधकांपासून सावध रहा. रचनात्मक कार्यात रस घ्या. कायद्यातून सुटका होईल. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल.
मिथुन – आईच्या तब्येतीत सुधारणा
आईच्या तब्येतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामे करत रहा. परदेशी जाण्याचा योग आहे. व्यवसायात भागिदारीचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. देणी-घेणी सांभाळून करा. रखडलेली कामे पूर्ण कराल.
कर्क – घरातील संबधांमध्ये कटूपणा जाणवेल
प्रिय व्यक्तीशी आज तुमचे संबध बिघडण्याची शक्यता आहे. शंका घेऊ नका. सामाजिक मानमर्यादांचा विचार करा. कामाच्या ठिकाणी वाद करणे टाळा. वाहन चालवताना सावध रहा. रचनात्मक कार्यात रस घ्या.देणी-घेणी सांभाळून करा.
सिंह – तणाव वाढू शकतो
मुलांबाबत चिंतेने मन निराश होईल. घरात तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ-उतार जाणवतील. राजकारणात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्यांच्या मदतीने ताळमेळ राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
कन्या – कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता
आज एखादी नवीन व्यावसायिक योजना सुरू कराल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन संपत्ती खरेदी कराल. जुन्हा मित्रांशी भेट होईल. जोडीदारासोबत संबंध मजबूत होतील.
तूळ – आई-वडिलांचे सहकार्य मिळेल
आई-वडिलांकडून भावनिक सहकार्य मिळेल. विरोधक त्रास देतील. प्रतिष्ठित लोकांशी मैत्री वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. राजकारणातील आव्हाने वाढतील. वाहन चालवताना सावध रहा. एखाद्या संस्थेद्वारा सन्मान मिळेल.
वृश्चिक – नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे
कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. वाद-विवादांपासून दूर रहा. मित्रांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यांत रस घ्या. देणी-घेणी करताना सावध रहा.
धनु – कौंटुंबिक संपत्तीचा हक्क मिळेल
आज तुम्हाला कायदेशीर पद्धतीने कौटुंबिक संपत्तीचा हक्क मिळेल. व्यावसायिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध सुधारतील. जोडीदारासोबत नाते दृढ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात रस घ्या. वाहन चालवताना सावध रहा.
मकर- आळसामुळे काम बिघडेल
आज तुम्ही तुमच्या आळशीपणामुळे चांगल्या संधी गमवाल. विद्यार्थ्यांना परीक्षेत कठीण आव्हानांना सामोरं जावं लागेल. संयम ठेवून काम करा. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे सामाजिक सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje