बॉलीवूड

12 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीला अचानक लाभाचा योग

Rama Shukla  |  Sep 10, 2019
12 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीला अचानक लाभाचा योग

मेष – कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत सिनेमाला जाण्याचा प्लॅन कराल. कोर्ट-कचेरीतून सुटका मिळणार आहे. मित्रांकडून भेटवस्तू मिळणार आहेत. आरोग्यासाठी काळजी घ्या. 

कुंभ – सहकार्यांकडून तणाव वाढण्याची शक्यता

आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या वागण्यामुळे निराश वाटेल. कामाच्या ठिकाणी सहकारी तणाव वाढवण्याचा प्रयत्न करतील. रागावर नियंत्रण ठेवा. रचनात्मक कार्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. विनाकारण वाद घालू नका. 

मीन – कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता

कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. उत्साह कमी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. रचनात्मक कार्यात मन रमवा. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. 

 

वृषभ – ताण-तणाव दूर होण्याची शक्यता

आज तुमची जोडीदारासोबत एखाद्या विषयावर दीर्घ चर्चा होईल. ज्यामुळे तुमच्यामधील ताण-तणाव कमी होणार आहे. सामाजिक कार्यातील रस वाढणार आहे. भावंडांच्या सहकार्यामुळे व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. 

मिथुन – विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भटकेल

आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून मन भरकटणार आहे. एखाद्या कामासाठी शिफारस करावी लागेल. अभ्यासासाठी घरापासून दूर जावे लागेल. कोर्ट-कचेरीतील कामात सावध रहा. रागावर नियंत्रण ठेवा. 

कर्क – व्यवसायातून अचानक लाभ मिळेल

आज तुम्हाला व्यवसायातील एखाद्या कामात अचानक लाभ मिळणार आहे. या कामात यश मिळण्याची तुम्हाला मुळीच अपेक्षा नव्हती. कामाच्या  ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना संगीत आणि कला क्षेत्रात रस वाढणार आहे. जोडीदाराशी नाते मजबूत असेल. 

सिंह – मेहनत करूनही यश मिळणं कठीण असण्याची शक्यता

आज तुम्हाला मेहनतीप्रमाणे यश मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढणार आहे. एखादे काम रद्द होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळवण्यासाठी सकारात्मक विचारसरणीचा वापर करावा लागेल. 

कन्या – वडीलांची तब्येत बिघडण्याची शक्यता

आज तुमच्या वडीलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येतील. वाहन चालवताना सावध राहा. राजकारणात जाण्याची संधी मिळेल. महत्त्वाची कामे करणे कठीण जाईल. 

तूळ – अविवाहितांसाठी भाग्योदयाचा  योग आहे

आज अविवाहितांचे भाग्य उजळणार आहे. आईवडीलांचे सहकार्य मिळेल. घरात आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समर्थन मिळेल. विरोधक तुमच्यासमोर टिकणार नाहीत. उत्पन्न आणि खर्च यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा.  

वृश्चिक – करिअरमध्ये यश मिळेल

आज तुम्हाला कामात चांगले यश मिळणार आहे. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी चांगला काळ आहे. रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. कामाच्या  ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल.

धनु – आर्थिक संकट येण्याची शक्यता

आज एखादी मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायातील मंद गतीमुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. उधारी घेताना नीट विचार करा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रवास करणे सध्या टाळलेले चांगले राहील. 

मकर – आरोग्य चांगले राहील

आज तुम्हाला उत्तम मानसिक, शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. व्यवसायाय अथवा नोकरीतील वातावरण अनुकूल असेल. युवकांना चांगले यश मिळणार आहे. व्यावसायिक संम्मेलनात तुमचा प्रभाव राहील.

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

राशीनुसार निवडा तुमचे करिअर

Read More From बॉलीवूड