भविष्य

14 जानेवारी 2019 चं राशीफळ

Jyotish Bhaskar  |  Jan 10, 2019
14 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष – खर्चातून आनंद मिळवा

खर्च ही आनंद मिळवि­ण्याची गोष्ट अजिबात नाही. मात्र दु:ख करुन खर्च टाळता येणं शक्य नसतं. खर्चातून आनंद मिळविता आला पाहिजे. घरातल्या सदस्याला एखादी वस्तू घेऊन दिली तर त्यातून त्याला होणारा आनंद आपल्यालाही झाला पाहिजे. आपल्याला हे शिकविणारा आजचा दिवस आहे. आज तुम्ही खर्च करणार आहात. त्यातून आनंद मिळवा, म्हणजे त्रास होणार नाही आणि घरातही आनंदाचे वातावरण राहिल. आज एखादे काम करीत असाल तर त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागणार आहेत. कारण त्यात अडचणी येऊ शकतात. लेखकांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. त्यांना आज लेखन कार्यामध्ये यश मिळणार आहे.

कुंभ – व्यवसायात गोंधळ होण्याची शक्यता

प्रयत्नांची पराकाष्टा करुनही जर यश मिळत नसेल मानसिक खच्चीकरण होऊन गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. मात्र परिश्रम व प्रयत्न यांना भाग्याची साथ जेव्हा मिळते तेव्हाच यश मिळत असते, हे सत्य स्विकारायला हवं. आज हे तुम्हाला हे शिकविणारा आजचा दिवस आहे. कारण आज व्यवसायात गोंधळ उडू शकतो. त्यामुळे आज खंबीर व सतर्क राहण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. यश मिळत नसल्याने प्रयत्नांची दिशाही तुम्हाला आज बदलावीशी वाटेल. मात्र आपले प्रयत्न खरंच चुकीच्या दिशेने आहेत का? याचीही खात्री करुन घ्या. संधीवात असणा-यांना आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. त्यांचा त्रास वाढू शकतो.

मीन – वास्तूवर खर्च कराल

आपण ज्या वास्तूमध्ये राहतो तिचा आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडत असतो. आपल्या सोबत ती वास्तूही जगत असते. आपल्या सुख-दु:खांची ती साक्षीदार असते. म्हणूनच आपण घराचे सुशोभिकरण करीत असतो. आनंदाच्या प्रसंगी घराची रंगरंगोटी करीत असतो. घरात स्वच्छता व पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करीत असतो. आज तुम्ही वास्तूवर आनंदाने खर्च करणार आहात. जोडीदाराशी आज मनमुटाव होऊ शकतो. व्यावसायिक आज जोड व्यवसायाचाही विचार करु शकतात. मात्र त्या विचाराला योग्य नियोजनाची जोड देऊन कृतीत उतरवलं पाहिजे. आज चिंतेची बाब म्हणजे तुमचे शत्रू वरचढ होऊ शकतात.

वृषभ – समजूतदारपणा दाखवाल

समजूतदार व्यक्तीचे आपले एक वेगळे व्यक्तिमत्व असते. समजुतदार व्यक्ती आपल्या स्वभावामुळे इतरांपेक्षा वेगळी असते. आज तुम्ही असाच समजूतदारपणा दाखविणार आहात. आज तुमचे इतरांशी सामंजस्य वाढणार आहे. प्रियकरांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. प्रेयसीची भेट होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल. आज तुम्ही अतिआत्मविश्वास दाखविणार आहात. त्यामुळे सावध रहा. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. आज तुमचा खर्चही अधिक होऊ शकतो.  

मिथुन – आहारावर नियंत्रण ठेवा

पोषक आहार ही एक प्रकारची औषधीच असते. जी आपल्याला आजरांपासून लांब तर ठेवते. मात्र आज चुकीचा आहार घेतल्याने अपचनाचा त्रास होणार आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. जेवणाच्या वेळा चुकवू नका. जेवढे शिस्तीत वागाल तेवढे तुमच्या फायद्याचे राहिल. बेशिस्तपणा हे आळसाला प्रवृत्त करीत असते. आज तुमच्या मानसन्मानातही वाढ होणार आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार करण्यासाठी तयार राहा. आज तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव जाणवेल. जोडीदाराने सांगितलेल्या गोष्टी आज तुम्ही आनंदाने करणार आहात.  

कर्क – अचानक आनंद मिळण्याची शक्यता

जीवनात फक्त दु:खच अचानक येत नाही तर कधी कधी आनंदही अचानक प्राप्त होत असतो. आज याची अनुभूती तुम्ही घेणार आहात. आज अचानक अशी एखादी गोष्ट घडेल ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल त्यामुळे आज सर्वत्र आनंदी आनंद असेल. यश मात्र आज तुम्हाला परिश्रम केल्यानंतरच मिळणार आहे. परिश्रमानंतर मिळालेले यश अधिक आनंद देत असते. हा आनंद द्विगुणीत करणारी घटना म्हणजे आज तुमचे शत्रू पराभूत होणार आहेत. त्यामुळे आज प्रयत्न व परिश्रम करायला चुकू नका. असे असले तरी महत्त्वाच्या प्रश्नांवर आज निर्णय नको. ते टाळण्याचा प्रयत्न करा.  

सिंह – सरकारी कर्मचारी सावधान

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज थोडा चिंतेचा दिवस आहे. आज ते गोंधळात पडणार आहेत.  एक तर नुकसान होऊ शकतं अथवा वरीष्ठांची नाराजी पत्करावी लागू शकते. सरकारी कर्मचाऱ्यांनी आज थोडं सावध राहून प्रत्येक काम विचारपूर्वक करायला हवं.. एखादे काम अपूर्ण राहिलेले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न वाढवायला हरकत नाही. आज तुम्हाला यश मिळू शकतं. जेष्ठ नागरीकांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. किरकोळ आजार उद्भवू शकतात. आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी आज तुम्ही एकांत शोधाल. चिंतन करण्यावर आज तुमचा भर राहू शकतो.

कन्या – स्त्रिया मानसिक तणावात राहतील

स्त्रिया संवेदनशील तर असतातच शिवाय सोशिक प्रवृत्तीच्याही असतात. कुठल्याही गोष्टी चटकन मनाला लावून घेतात. आज त्या मानसिक तणावात राहतील. त्यामुळे आज कुठेलच धाडस नको. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवून जे काम करायला अधिक आवडत त्यात त्यांनी आज मन रमवायला हवं. ­अधिकारी वर्गाच्या हातात एखादं काम अडकलेले असेल तर आज प्रयत्न वाढवायला हवे. कारण आज ते पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे आत्मविश्वासही आज वाढलेला असेल. मात्र अनोळखी लोकांचा विरोध होऊ शकतो. म्हणून त्यांच्यापासून सावध राहा.  

तूळ – कार्यात व्यस्त राहाल

कुठल्याही इतर गोष्टीचा आपल्यावर परिणाम करुन घ्यायचा नसेल तर आजच्या काळात सर्वात चांगला उपाय म्हणजे कार्यात व्यस्त राहणे. मात्र ही गोष्ट एखाद्या गोष्टीपासून पळ काढण्यासाठी केली जात असेल तर चुकीची आहे. आज तुम्ही कार्यात व्यस्त राहणार आहात. मात्र तुमच्या घरात जर कुठल्याही कारणाने शितयुद्ध सुरु असेल तर आज तुम्हाला घरातही थोडं लक्ष घालणं आवश्यक आहे. शक्य तितक्या लवकर ते शिस्तयुद्ध संपविण्याचा प्रयत्न करावा. मग त्यासाठी काम बाजुला ठेवावे लागले तरी चालेल. या सर्व गोष्टींमुळे आज तुमचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. तरीही तुम्ही अमर्याद सहनशील व उत्साह दाखविणार आहात. त्यामुळे आज कोणतंही काम समजुतदारपणा दाखवूनच करा.

वृश्चिक – नफ्याकडे लक्ष ठेवा

व्यवसाय करीत असताना नफा बघितला जातो. त्यामुळे नफ्याकडे लक्ष ठेवा असं कोणत्या व्यावसायिकाला सांगितल्यास आश्चर्य वाटू शकतं. ग्रहमानानूसार कधी कधी छोट्याशा चुकीमुळे किंवा दुर्लक्षपणामुळे नुकसान होऊ शकतं किंवा मोठ्या नफ्यापासून वंचित राहावं लागू शकतं. म्हणून आज व्यावसायिकांनी आज नफ्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. इतरांनीही आज थोडं स्वार्थी बनून आपल्या फायद्याकडे लक्ष दिले पाहिजे. आज एखाद्या मोठ्या फायद्यासाठी लहान नुकसान होणार असेल तर ते करायला हरकत नाही. कारण ते नुकसान नसून भविष्यातील फायद्यासाठी गुतंवणूक असेल. मात्र लहान नफा कमविण्याच्या प्रयत्नांमध्ये जर आज मोठं नुकसान होणार असेल लहान फायदाही नको. म्हणून आज कुठलाही व्यवहार करताना सावध राहा.

धनु – मुलांच्या वागणूकीकडे दुर्लक्ष करा

लहान असो की मोठी मुलं ही शेवटी मुलंच असतात.आज मुलं तुमच्या मर्जीप्रमाणे वागणार नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आज तुमच्यासाठी प्रवासाचेही योग आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रवास जोडीदारासोबत केला जाऊ शकतो. त्यामुळे आनंदी आनंद असेल. प्रवासातून आज संधीही मिळू शकतात. कलाकारांच्या कलेचं आज कौतुक होणार असून त्यांना आज यश प्राप्त होणार आहे.

मकर – अतिआत्मविश्वास घातक ठरेल

जीवन यशस्वीरीत्या जगण्यासाठी आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. मात्र हाच आत्मविश्वास अती झाल्यास नुकसान होऊ शकते. अतिआत्मविश्वासामुळे आपण गाफील, बेसावध राहत असतो. आज आत्मविश्वासाला थोडसं आवर घाला आणि सतर्क राहा. आज तुम्हाला वास्तूतूनही लाभ मिळू शकतो. मात्र आज सासरकडच्या मंडळींशी वाद होऊ शकतो. वादापासून दूर राहा. शक्य तेवढे कमी बोला.

लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद

 

Read More From भविष्य