मेष – जोडीदारासोबत तणाव वाढेल
गैरसमजामुळे जोडीदारासोबत तणाव वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. यशाचा योग आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. मनाविरूद्ध काम करावं लागेल. ज्यामुळे समस्या वाढतील. एखादे महत्त्वाचे काम होता होता राहील.
कुंभ – देणी घेणी करताना सावध रहा
आज तुमचा विनाकारण खर्च आणि समस्या वाढणार आहे. गुंतवणूक करताना सावध रहा. देणी घेणी सांभाळून करा. महत्त्वाची कामे करताना आळस करू नका. धार्मिक कार्यात मन रमवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करा.
मीन- दीर्घ आजारपणातून सुटका
आज तुम्ही एखाद्या दीर्घ आजारपणातून मोकळे व्हाल. मात्र आहार आणि विहार करताना सावध रहा. एखादी सुखद बातमी मिळेल. विरोधकांना मात द्याल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. सामाजिक संस्थेद्वारा मानसन्मान मिळेल. रखडलेली कामे पूर्ण कराल.
वृषभ – सनस्ट्रोकचा त्रास होऊ शकतो
आज दगदग झाल्याने उन्हाने त्वचा रापण्याची शक्यता आहे. सनस्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. लोकांच्या नादाला लागून व्यावसायिक हितसंबंध खराब कराल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. रचनात्मक कार्यात यश मिळेल.
मिथुन – नवीन घर विकत घ्याल
आज तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या नव्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
कर्क – नवीन मित्र बनवाल
आज जोडीदारासोबत जुना वाद मिटण्याची शक्यता आहे. नवीन मित्र तयार कराल. व्यवसायासंबधित कोर्ट कचेरीच्या मामल्यामध्ये तुमचा पक्ष मजबूत राहील. प्रभावशाली व्यक्तीशी झालेली भेट फायदेशीर असेल. नवीन योजना यशस्वी होतील.
सिंह – आळस आणि थकवा जाणवेल
आज विद्यार्थ्यांना आळस आणि थकवा जाणवण्याची शक्यता आहे. पैशांबाबत एखादा व्यवहार लवकर होण्याची शक्यता आहे. एखाद्या समस्येमुळे व्यवसायात अडचणी येऊ शकतात. तज्ञ व्यक्तीची मदत घेतल्यास समस्या सुटेल. जोडीदाराची साथ मिळेल.
कन्या – शेअर बाजारात फायदा होईल
शेअर बाजारात तुम्हाला आज चांगला फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अधिकारी प्रंशसा करतील. आत्मसन्मान वाढेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. इतरांच्या मदतीने यश मिळवाल. कौटुंबिक जीवन सुखाचे असेल. प्रवासाचा योग आहे.
तूळ – विद्यार्थ्यांचा तणाव वाढेल
विद्यार्थांचा अभ्यासातील तणाव वाढणार आहे. ज्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. राजकारणात समस्या निर्माण होऊ शकतात. रचनात्मक कार्यात यश मिळेल. आरोग्याबाबत सावध रहा. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील.
वृश्चिक – मानसिक असमाधान जाणवेल
कौटुंबिक तणावामुळे आज तुमची मानसिक स्थिती बिघडणार आहे. विनाकारण खर्च केल्यामुळे बजेट कोलमडणार आहे. सहकारी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होऊ शकते. व्यवसायात नवीन सहकारी मिळतील. कौटुंबिक संबध सुधारतील.
धनु – नात्यातील जवळीक वाढण्याची शक्यता
आज तुम्ही तुमच्या स्वभावामुळे एखाद्याचे मन जिंकाल, जोडीदारासोबतचे भांडण मिटेल. मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखीचा लाभ होईल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. रचनात्मक कार्यात वाढ होईल.
मकर- नवीन ओळखी लाभदायक ठरतील
आज नव्या ओळखींमुळे तुमच्या व्यवसायात वाढ होऊ शकते. इंजिनिअरींग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. तुमच्या कतृत्वासवर विश्वास ठेवा. राजकारणात यश मिळेल. मानसन्मान आणि धनसंपत्ती वाढण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी वाढतील.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje