
मेष – आरोग्य बिघडण्याची शक्यता
आज कामातील अडथळे आणि बिनकामाच्या चिंतेमुळे तुमचे मन निराश होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सुख-शांतीचे वातावरण असेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
कुंभ – फ्रेश वाटेल
आज तुम्हाला फ्रेश वाटेल. नवीन सुरूवात उत्साहवर्धक असेल. व्यावसायिक कामात व्यस्त असाल. काही काळानंतर तुम्हाला योग्य लाभ अवश्य मिळेल. विनाकारण खर्च करू नका. रखडलेली कामे पूर्ण होतील.
मीन – व्यवयासात धोका मिळण्याची शक्यता
आज प्रेमयुगूलांना समस्या येतील. व्यवसायात धोका मिळण्याची शक्यता आहे. तुमचं गुपित इतरांना सांगू नका. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती मजबूत असेल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे.
वृषभ – लाभाचा योग आहे
आज तुमच्यासाठी भाग्योदयाचा योग आहे. व्यवसायात अप्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. घर सजावटीची योजना आखाल. विद्यार्थ्यांचा खेळातील रस वाढणार आहे.
मिथुन – विरोधक नमतील
आज तुमचे विरोधक नमणार आहेत. घरातील समस्या सुटतील. जोडीदारासोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा.
कर्क – व्यवसायात अडथळे येण्याची शक्यता आहे
व्यवसायातील कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल नसल्यामुळे तणाव वाढेल. धुर्त लोकांपासून सावध राहा. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
सिंह – उत्पन्नांचे साधन वाढेल
आज तुमच्या उत्पन्नांचे साधन वाढणार आहे. व्यावसायिक प्रवास लाभदायक असेल. कौटुंबिक सुखसाधनांमध्ये वाढ होईल. कौटुंबिक नाते आनंदाचे असेल.
कन्या – दुर्लक्षपणा केल्यामुळे चांगली संधी गमवाल
आज तुम्ही आळस आणि दुर्लक्षपणा केल्यामुळे एखादी चांगली संधी गमावणार आहात. व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. देणी-घेणी सांभाळून करा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
तूळ- सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवेल
सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवणार आहेत. नित्यक्रमात बदल करू नका. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळेल. वाहन चालवताना सावध राहा.
वृश्चिक – नवीन प्रेमसंबंध तयार होण्याचा योग आहे
आज तुमची जुनी मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत परदेशी जाण्याचा योग आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. विरोधक नमण्याची शक्यता आहे.
धनु – नोकरीची चांगली संधी मिळेल
आज बेरोजगारांना नोकरीची चांगली संधी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसाय वाढीत अडथळे येण्याची शक्यता आहे. नवीन योजना यशस्वी होतील. वृद्धांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
मकर – व्यावसायिक कामे रखडण्याची शक्यता
आज चल-अचल संपत्ती खरेदीचा योग आहे. कोणाच्याही दबावाखाली येऊ नका. व्यवसायातील कामे रखडण्याची शक्यता आहे. देणी घेणी सांभाळून करा. जोडीदाराची साथ मिळणार आहे.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी
कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे, जाणून घ्या
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje