मेष- कुठल्याही कामाची यशस्विता ही त्या कामाच्या नियोजनेवर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही योग्य नियोजन करता तेव्हा तुमचं अर्धे कामम आधीच झालेले असतं. म्हणूनच आजच्या दिवसाचं योग्य नियोजन करा. त्यातून आज तुमची अनेक कामे मार्गी लागू शकतात. विशेषत: तुमचं एखादं कर्ज प्रलंबित असल्यास आज मार्गी लागण्याची शक्यता आहे. शिवाय आज तुमच्यासाठी प्रवासाचाही योग आहे. योग्यरीतीने तयारी केल्यास प्रवासातून आनंद व लाभ दोन्ही मिळू शकतात. अनेकांच्या भेटीगाठी होतील. नवीन ओळखीही होतील. आज फक्त जे कराल ते सर्व नियोजनपूर्वक करा. कारण तुम्हाला आज यश मिळणारच आहे.
कुंभ- ग्रहमान उत्तम असणं म्हणजे भाग्याची साथ मिळून यश प्राप्त करणं होय. आपले ग्रहमान उत्तम आहेत. त्यामुळे आज भाग्याची साथ आहेच. भाग्याची साथ असेल तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. मात्र यश किती मिळणार हे सर्वस्वी तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. आज व्यवसायातील नवीन कल्पना आकार घेऊ शकतात. व्यावसायिकांनी आज सृजनशीलतेवर भर द्यावा. नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वत:साठी व व्यवसायाच्या वाढीसाठी तुम्ही काही गोष्टी ठरविल्या असतीलच. त्या गोष्टींचा आज श्रीगणेशा करायला हरकत नाही किंवा श्रीगणेशा झाला असेल तर ठरविल्यानूसार त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी. ग्रहमान चांगले आहेत. योग्य परिश्रम करुन यश पदरात पाडून घ्या.
मीन– प्रवास करणे म्हणजे चैतन्य प्राप्त करण्यासारखं असतं. प्रवास हा आपल्याला रोजच्या दिनचर्येतून विरंगुळा देत असतो. मात्र या प्रवासाचा त्रास करुन घेतला तर दगदगही होऊ शकते. कोणत्याही गोष्टीत आनंद कसा मिळवायचा हे शिकलं पाहिजे. आज तुमच्यासाठी प्रवासाचे योग आहेत. म्हणजे चैतन्य मिळविण्याचे योग आहे. त्यामुळे प्रवासात जाण्याची इच्छा जे बागळून आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. आज प्रयत्न करायला चुकू नका. चैतन्य प्राप्त करणं हे जगण्यासाठी आवश्यक असतं. लांबचा प्रवासही घडू शकतो. त्याचा आनंद घ्या. दगदग करुन घेऊ नका. धार्मिक कामांमध्ये आज तुम्ही रममाण व्हाल. मन:शांती मिळेल.
वृषभ- लाभ व आनंद हे दोन्ही एका वेळी मिळण्याची शक्यता नसते. मात्र तुमचा आजचा दिवस या दोन्ही गोष्टी मिळविण्याचा आहे. नोकरीमध्ये तुमच्यासाठी चांगली संधी निर्माण होऊन लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या आनंदाने स्विकाराल. आज आनंद आणि उत्साहाने घरात जोडीदाराशी गुजगोष्टी कराल. नवीन संधीविषयी आणि भविष्याविषयी त्यांच्यासोबत चर्चा करण्यास उत्सुक असाल. योग्य नियोजन कराल. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहिल. विद्यार्थ्यांचे मात्र आज अभ्यासात मन रमणार नाही. मन रमत नाही म्हणून अभ्यास करायचा नाही, असे थाडंच आहे. अभ्यास करण्याचा प्रयत्न तर करावाच लागेल.
मिथुन- जीवन जगत असताना यश व आत्मिक समाधान या दोन्ही गोष्टी मिळवायच्या असतील तर घर आणि घराच्या बाहेर दोन्ही ठिकाणी यश व आनंद मिळविता आला पाहिजे. आपण जीवन एकट्याने जगत नसतो. काही वेळेला सामाजिक जीवनात सर्वत्र कौतुक होत असताना वैवाहिक जीवनात मात्र अनेकदा टिकेला सामोरं जावं लागतं. हे अनुभवण्याचा आजचा तुमचा दिवस आहे. तसंच आज तुमच्यासाठी शुभ दिवस आहे. कारण आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात. वरिष्ठांकडून तुमचं कौतुकही केलं जाऊ शकतं. बाहेर आज तुमच्यासाठी आनंदी आनंद आहे. मात्र घरात जोडीदारासोबत विसंवाद झाल्याने मिळवलेला आनंद मावळला जाण्याची शक्यता आहे. म्हणून आज आर्थिक लाभासह वादही होऊ शकतात. ते टाळण्यासाठी घरात शांत राहा.
कर्क- जीवन किती सुंदर आहे. सगळीकडे आनंदी आनंद पसलेला आहे. ज्याचा आपण लाभ घ्यायला हवा. नात्यांना जपायला हवं, नात्यांमध्ये रमायला हवं. हेच समजविणारा आजचा दिवस आहे. ज्याला व्यावहारिक परिभाषेत आपण सर्वाेत्तम दिवस म्हणू शकतो. कामामध्ये आज यश मिळेल. मिळालेल्या यशामुळे प्रतिष्ठा व नावलौकिक उंचावेल. घरच्यांसाठी उत्तम जेवणाचा बेत आखाल. घरातील सदस्यांशी विशेषत: आईशी मनमोकळेपणाने प्रेमळ गप्पा माराल. नात्यांच्या आनंदामध्ये रममाण व्हाल. रोजच्या व्यस्त अशा दिनचर्येमध्ये घरच्यांसाठी जे करता येणं शक्य होत नाही, ते सर्व करण्याला आज तुम्ही प्राधान्य द्याल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल. घरासह बाहेरही आज तुमच्यासाठी आनंदी दिवस आहे.
सिंह- जीवनात संधी वेगवेगळ्या रुपांमध्ये आपला दरवाजा ठोठावत असतात. वेळीच ओळखून संधीचं रुपांतर यशामध्ये करणं हे सर्वस्वी आपल्यावर निर्भर असतं. आज आपल्यासाठी अशाच संधीचा दिवस आहे. आज तुमच्या कर्तृत्वाला वेगळी दिशा गवसेल. उत्साहाने नवीन जबाबदाऱ्यांचा स्विकार कराल. कामांमध्ये धनलाभही होऊ शकतो. घरातही आज आनंदाचे वातावरण राहिल. सर्वांमध्ये योग्य सुसंवाद व ताळमेळ दिसून येईल. एकमेकांची काळजीही घ्याल. भविष्याचा विचार करत योजना आखाल. घरासह बाहेरही आज तुमच्यासाठी आनंदी आनंद भरलेला आहे.संधीचा सदुपयोग करुन घ्या.
कन्या- नवीन काही ज्ञान अवगत करण्यासाठी प्रवास जसा आवश्यक आहे तसा तो मन रमविण्यासाठी आणि आनंदासाठी आवश्यक आहे. प्रवास जर परिवारासोबत केला तर त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. आज तुमच्यासाठी अशाच आनंदाचा दिवस आहे. कारण आज जोडीदार व मुलांसोबतच्या प्रवासाचे योग आहेत. बाहेर जायला मिळणार असल्यामुळे जोडीदारासह मुलंही खुश असतील. एकमेकांसोबत तुम्ही आज मनसोक्त गप्पा मारणार आहात. गप्पांमध्ये रममाण होणार आहात. नवीन योजनाही आखल्या जाऊ शकतात. आजचा दिवस कौटुंबिक सौख्याने भरलेला आहे.
तुळ- काम करीत राहणं ही सर्वच दृष्टीने आवश्यक गोष्ट आहे. परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत. काही वेळेला अधिक श्रम करावे लागले तरी त्याचा कंटाळा करुन घेऊ नका. या कष्टांचं अतिरिक्त फळदेखील आपल्याला मिळणारच.आजचा तुमचा दिवस कष्टाचा आहे. आज कामाचा अतिरिक्त भार तुमच्यावर राहिल. परिणामी आज तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. कामापासून पळ न काढता किंवा कंटाळा न करता आज शक्य तेवढे काम पूर्ण करण्यावर भर द्या. विद्यार्थ्यांसाठी आज दिवस अभ्यासामध्ये रममाण होण्याचा आणि प्रयत्नांमध्ये यश देणारा आहे. विद्यार्थीही आज अभ्यासामध्ये व्यस्त राहणार आहेत.
वृश्चिक- कधी कधी प्रयत्नांची पराकाष्टा करुनही यश मिळत नाही तर कधी कधी अगदी थोडेच प्रयत्न करुनही प्रचंड यश पदरात पडतं. यश मिळविण्यासाठी प्रयत्नांच्या सोबतीला भाग्यही असावं लागतं. आज भाग्य तुमच्या सोबत आहे. यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. आज तुमची ग्रहस्थिती उत्तम आहे. जे काम तुम्ही हातात घ्याल, त्यात तुम्हाला यश मिळणारच. आजच्या दिवसाचा योग्य सदुपयोग करुन घ्या. आज प्रवासही घडू शकतो. भाग्याची साथ असल्याने त्या प्रवासातूनही लाभ मिळू शकतो. ग्रह सतत भ्रमण करीत असल्याने असे ग्रहयोग क्वचित जुळून येतात. संधी मिळाल्यास तिचा योग्य लाभ करुन घ्या.
धनु- येणारा प्रत्येक दिवस कधीच सारखा नसतो. दिवसामागून रात्र तसंच सुखामागून दु:ख हे येतंच. त्यामुळे सुखाने हुरळून जाऊ नका आणि दु:खात आत्मविश्वास कमकूवत होऊ देऊ नका. हे समजविणारा तुमचा आजचा दिवस आहे. आज तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कुठल्याही तरी कारणांमुळे काही तरी अशा घटना घडतील की ज्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या दुखावले जालं. परिणाम स्वरुप चित्त विचलीत होऊ शकतं. कामामध्ये मन लागणार नाही. भरीस भर म्हणून खर्चही वाढणार आहे. म्हणजे तणाव वाढण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींमुळे आत्मविश्वासाला मात्र तडा जाऊ देऊ नका. खंबीरपणे या गोष्टींचा सामना करा. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे.
मकर- आपल्या जीवनाची दिशा आणि दशा आपले ग्रह ठरवित असतात. त्यांना आपण सामान्य भाषेमध्ये नियती म्हणू शकतो. ही नियती जशी आपली काही प्रसंगांमध्ये साथ देते तशी काही प्रसंगांमध्ये परिक्षाही घेत असते. आज तुमची परिक्षा बघणारा दिवस आहे. त्यामुळे वरिष्ठांशी मतभेद होण्याआधी त्यांच्याशी जळवून घ्या. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकवेळी आपलीच गोष्ट रेटणे योग्य नाही. तुमच्यासाठी आज तर असे करणे अजिबातच चांगले नाही. आज तुम्हाला थोडं नमतं घ्यावं लागणार आहे. आज तुम्हाला तुमच्या विचारांची दिशा बदलावी लागणार आहे. बाहेर तणाव असला तरी घरात आनंद प्राप्त होऊ शकतो. संततीसाठी आज यश प्रातीचा दिवस आहे. मुलांकडून शुभवार्ता कानी पडतील.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje