भविष्य

2 जुलै 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या धनसंपत्तीत वाढ

Rama Shukla  |  Jul 1, 2019
2 जुलै 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या धनसंपत्तीत वाढ

मेष – धनसंपत्तीमध्ये वाढ होईल

आज तुमच्या धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. घरातील आधूनिक सुखसुविधा वाढतील. नवीन उद्योगातील अडचणी कमी होतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. खेळातील रूची वाढेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील.

कुंभ – वैवाहिक समस्या येतील

वैवाहिक समस्या निर्माण होऊल शकतात. कुटुंबाला वेळ न दिल्यामुळे तणाव वाढेल. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देऊ शकतात. भावनेच्या आधारावर घेतलेले निर्णय बदलावे लागतील. जुन्या ओळखींमधून लाभ मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.

मीन- शारीरिक थकवा आणि आळस जाणवेल

दिवसभर शारीरिक थकवा आणि आळस जाणवेल. दिनक्रम अव्यवस्थित होईल. विद्यार्थ्यांच्या जीवनात समस्या निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. सामाजिक सन्मान मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.

वृषभ – प्रभावशाली व्यक्तीशी ओळख होईल

प्रभावशाली व्यक्तीशी झालेली भेट लाभदायक ठरेल. जर तुमचे एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर प्रेमाची कबुली देण्यासाठी पुढाकार घ्या. कुटुंबासोबत प्रवास कराल. विरोधक त्रास देतील. कोर्टकचेरीतून सुटका मिळेल. देणी-घेणी सावधपणे करा.

मिथुन – कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल

कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणामुळे तणाव वाढेल. खोटं बोलून स्वतःची कामे करून घेऊ नका. महत्त्वाची कामे आधी करा. मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. वाद-विवाद करणे टाळा. वाहन चालवताना सावध रहा.

कर्क – कुटुंबातून वारसाहक्क मिळेल

आज तुम्हाला तुमच्या वारसाहक्काचा हिस्सा मिळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीकडून सरप्राईज मिळेल. नोकरीत बदल होऊ शकतात. व्यावसायिक कामे मिळतील. जोडीदारासोबत परदेशी जाण्याची शक्यता आहे. आरोग्य् चांगले राहील.

सिंह – व्यवसायातील प्रोजेक्ट रद्द होऊ शकते

कामाच्या ठिकाणी आव्हाने वाढतील. एखाद्या शुल्लक गोष्टीवरून वाद होऊ शकतात. विद्यार्थ्यांवर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. व्यवसायातील एखादे काम रद्द होईल. धार्मिक कार्यात रस वाढेल.

कन्या – आजारपण वाढण्याची शक्यता

आज तुमची तब्येत ठीक नसेल. निरोगी आरोग्यासाठी वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करा. व्यवसायामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पगारवाढ होईल.कुटुंबातील खर्च वाढू शकतो. जोडीदाराला भावनिक आधार द्या. देणी-घेणी करताना सावध रहा.

तूळ – गैरसमज दूर होतील

आज तुमच्या भांवडांमधील गैरसमज दूर होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. जमा-खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या सहकार्यामुळे व्यवसायात नवीन कामे मिळतील. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल.

वृश्चिक – पदोन्नतीची संधी मिळण्याची शक्यता

कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे. आई-वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या. रचनात्मक कार्यात रस वाढेल. रखडलेली कामे पूर्ण कराल.

धनु – दिखावा करण्याच्या नादात कर्ज वाढेल

आज तुम्ही लोभामुळे एखादी चांगली संधी गमवाल. दिखावा करण्याच्या नादात विनाकारण कर्ज वाढवाल. जोखिमेची कामे मुळीच करू नका. कामाच्या ठिकाणी वादापासून दूर रहा. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. कोर्ट-कचेरीपासून सुटका मिळेल.

मकर – आरोग्यात सुधारणा

आज एखाद्या दीर्घ आजारपणातून तुमची सुटका होईल. मानसिक ताण-तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाला वेळ द्या. आर्थिक समस्या सुटतील. मित्रांसोबत प्रवासाला जाल. घाईघाईत कोणतेही काम करू नका. 

अधिक वाचा –

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)

 

Read More From भविष्य