मेष – विद्यार्थी अभ्यासात लक्ष देतील
विद्यार्थ्यांनी रोजचा अभ्यास रोजच करणे आवश्यक आहे. मात्र दररोज अभ्यासात लक्ष लागेलच असं होत नाही. कधी कधी मुलं संपूर्ण दिवस अभ्यास करीत असतात. त्यापैकीच आजचा दिवस आहे. आजचा दिवस अभ्यासासाठी अतिशय उत्तम आहे. अमर्याद सहनशिलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी आज तुम्ही परिपूर्ण राहणार आहात. एखाद्या गोष्टीवर विनाकारण तुमचा संताप होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितके मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. तेच तुमच्या हिताचेही राहिल. आज तुम्ही आयुष्याविषयी चिंतनही करणार आहात. त्यासाठी तुम्ही एकांत शोधाल. आयुष्यामध्ये चिंतन करणे खूप आवश्यक आहे. मात्र चिंतनातून मार्ग शोधता आले पाहिजे नाही तर चिंतनाचे रुपांतर चिंतेत होऊ शकतं.
कुंभ – जंक फूड टाळा
तसं बघितलं तर घरचं जेवण किंवा नाश्ता हाच आपल्यासाठी सर्वाेत्तम असतो. मात्र प्रयत्न करुनही ते कधी कधी शक्य होत नाही. इच्छा नसतांनाही बाहेरचं खावंचं लागतं. आज तुम्हाला बाहेरचं काही खावं लागलं तर त्यामध्ये जंक फूड तुम्ही टाळलेच पाहिजे. नाही तर त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आपल्या कल्पक व सर्जनशील कार्यात आज प्रगती होऊ शकते. आपल्या कल्पनेला आज पुर्ण वाव मिळू शकतो. त्याचा परिणाम म्हणून आज आपल्या मानसन्मानातही वाढ होऊ शकते. एखादं महत्त्वपूर्ण कार्य अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न वाढवायला हवेत. आज ते पूर्ण होऊ शकतं. अतिविचार घातक ठरु शकतात. त्यामुळे कुठल्याच विषयावर आज जास्त विचार करु नका.
मीन – आहारावर नियंत्रण ठेवा
आहारावर नियंत्रण नसले तर अपचनाचा त्रास होतो. आज त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे आज तुम्हाला आहारावर नियंत्रणासोबत आपल्या आरोग्याकडेही लक्ष ठेवायला हवे. आज कुठल्याच गोष्टीवर जास्त विचार करु नका. नाही तर त्या गोष्टींचा चिंता लागू शकते. आज चिंता नको तर चिंतन करण्यावर भर द्या. चिंतन केल्याने तुम्हाला नवीन मार्ग सापडू शकतात. चिंता केली तर ती आयुष्यभरासाठी चिकटून बसू शकते. त्यामुळे तिला स्वत:पासून दूरच ठेवलेली बरी असते. आकस्मिक फक्त संकटच येत असतात चांगल्या गोष्टीही घडत असतात. याचा अनुभव आज तुम्हाला मिळू शकतो. कारण आज तुम्हाला एखादा आकस्मिक आनंदही प्राप्त होऊ शकतो. त्याचा स्विकार करण्यासाठी तयार राहा.
वृषभ – भावंडांची काळजी घ्या
घरात जर आपण मोठे असू तर घरातील इतर सदस्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असते. ही जबाबदारी जर आनंदाने पूर्ण केली तर त्यातून मिळणारा आनंद व आत्मिक समाधान याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. याची अनुभूती आज तुम्ही घेणार आहात. कारण आज तुम्हाला लहान भावंडांची काळजी घ्यावी लागणार आहे. कदाचित त्यांना तुमची आवश्यकता असू शकते. अधिकारी वर्गाच्या हातामध्ये जर एखादे काम अडकलेले असेल तर आज तुम्ही प्रयत्न वाढवायला हवेत. ते आज पूर्ण होऊ शकतं. मुलं आज तुमच्या आवडीप्रमाणे वागणार नाहीत. त्यामुळे आज थोडं त्यांच्याकडे दुर्लक्ष करा नाहीतर त्याचा त्रास तुम्हाला होईल. आज मित्रांकडून तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. आज मित्रांमध्ये तुम्ही रमणार आहात.
मिथुन – लेखकांना यश मिळेल
लेखक मंडळींसाठी आजचा दिवस अतिशय चांगला व आनंददायी आहे. कारण आज त्यांना त्यांच्या लेखन कार्यामध्ये यश मिळणार आहे. सोबतच मानसन्मानामध्येही वाढ होऊ शकते. कधी कधी आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात ज्यामध्ये आपण काही लोकांना ओळखतही नसतो, मात्र त्यांच्या विरोधाचा आपल्याला सामना करावा लागतो. आज ते तुमच्यासोबत होऊ शकतं. म्हणून अनोखळी लोकांपासून सावध राहावं. संततीकडून सुवार्ता कानी येतील. आज त्यांच्या यशाचा दिवस आहे. त्यामुळे घरात आज आनंद असेल. आज थोडी बेशिस्त तुम्ही राखता कामा नये. एक तर नुकसान होऊ शकतं किंवा मोठ्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकतात. तसंही शिस्तीचे पालन हे रोजचं केले पाहिजे.
कर्क – लाभावर लक्ष द्या
लाभ हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यामुळे तो आपल्याला कसा मिळेल किंवा मिळवता येईल याकडे आपले लक्ष असायला हवे. हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस आहे. मात्र हे करीत असतांना लहान फायद्यासाठी मोठं नुकसान व्हायला नको, याची काळजी आपणास घ्यावी लागणार आहे. आज मोठ्यांचे आशीर्वाद, त्यांचे मार्गदर्शन मिळविण्याचा प्रयत्न करावा. त्याच्याने तुमचा आत्मवि•ाास वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय आपल्यापेक्षा जेष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद सोबत राहिल्यास आपण कोणत्याही संकटामध्ये चांगलं काम करु शकतो. यश मिळविण्यासाठी परिश्रम करावेच लागतात. त्यामुळे आधी परिश्रम व नंतरच यश म्हणजेच भाग्य अशी आजची स्थिती राहिल. आज तुमच्या मानसन्मानातही वाढ होऊ शकते. जे एखादं यश मिळविल्यानंतरच होऊ शकतं.
सिंह – आत्मविश्वास जाणवेल
जीवन यशस्वीरीत्या जगण्यासाठी आत्मविश्वास अंगी असणे खूप महत्त्वाचं असतं. त्याशिवाय आपण कुठल्याही गोष्टीचं धाडसंच करु शकत नाहीत. मात्र हा आत्मविश्वास जर जराही जास्त झाला तर तो घातक ठरत असतो. कारण त्यामुळे गाफील राहत असतो. आज तुम्ही आत्मवि•ाासाने परिपूर्ण राहाल. त्यामुळे तो जास्त होणार नाही, याची काळजी घेऊन वाढलेल्या आत्मविश्वासाचा फायदा करुन घ्या. आज जेष्ठांचे आशीर्वाद, मार्गदर्शन मिळविण्याचा प्रयत्न करावा. भविष्यात किंवा पुढील वाटचालीसाठी त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जास्त करुन आपल्याला बघायला मिळतं की भाग्य हे परिश्रम करणा-याच्याच सोबत असतं. त्यामुळे परिश्रम करीत राहा, भाग्याची साथ तुम्हाला नक्की मिळेल. आज आपल्या मानसन्मानातही वाढ होऊ शकते.
कन्या – मानसिक शांतता मिळेल
जीवनामध्ये मानसिक शांतता मिळणे आवश्यक असते. जी आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये मिळणं खूपच अवघड असतं. मात्र ती तुम्हाला मिळू शकते. आज घरासह बाहेरही तुमच्यासाठी मानसिक सुख शांतीचे वातावरण राहिल. त्यामुळे तुमच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे. मात्र आपल्या आहारावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. तसे केले नाही तर अन्नबाधा होऊन अपचनाचा त्रास होऊ शकतो. आपल्या लहान भावंडांचीही आज तुम्हाला विचारपूस करायची आहे. कदाचित त्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता असू शकते. आज तुम्ही आपल्या कार्यामध्ये व्यस्त राहणार आहात. जी खूप चांगली बाब आहे. कारण त्यामुळे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करु शकतो व ते काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते.
तूळ – कामात अडचणी येतील
सहजासहजी पूर्ण होणारे काम तर कोणीही करु शकतो. मात्र काम करण्याची खरी मजा किंवा एखादं काम करण्याचा तेव्हाच आनंद मिळतो, जेव्हा त्या कामात अडचणी येत असल्याने ते पूर्ण करण्यासाठी आपले कौशल्य पणाला लागत असते. ती आपली परिक्षा असते. त्यामुळे कामात अडचणी येत असतील तर विचलित होऊ नका धैर्य राखा. हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस आहे. एखादं महत्त्वपूर्ण कार्य अपूर्ण राहिलेलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न वाढवायला हवे. ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस कलाकरांनाही यश मिळवून देणारा आहे. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. आज विनाकारण एखाद्या गोष्टीचा तुम्हाला संताप येणार आहे. त्यामुळे आपल्या रागावर आज तुम्ही नियंत्रण ठेवायला हवे.
वृश्चिक – रागावर नियंत्रण ठेवा
कधी चुकीचा विचार, कधी झालेला गैरसमज यामुळे एखाद्या गोष्टीवर आपला विनाकारण संताप होत असतो. त्यावेळी आपला रागावर नियंत्रण नसतं. नंतर सत्यता लक्षात आपल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. आज पश्चाताप करावा लागू नये यासाठी तुम्हाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. म्हणजे विनाकारण आपला संताप होणार नाही. जर तुम्ही कुठल्या द्विधा मनस्थितीत असाल तर जेष्ठांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घ्यायला विसरु नका. त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आज मोठ्या फायद्यासाठी लहान नुकसान होणार असेल तर त्यामध्ये मनाला अडकवू नका. ती एक प्रकारची गुंतवणूक समजा. अति आत्मविश्वास हा घातक असतो. त्यामुळे आज सावध राहावं.
धनु – सहनशीलता व उत्साह वाढेल
सहनशील व उत्साह या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्या एकावेळी फार क्वचितच आपल्या सोबत राहू शकतात. आज या दोन्ही गोष्टींचा तुम्ही लाभ घेणार आहात. जीथं सहनशीलता दाखविण्याची आवश्यकता आहे तिथं ती अमर्याद पद्धतीने तुम्ही दाखविणार आहात व उत्साहाचीही तिच अवस्था राहिल. मात्र आज शक्य तितके कमी बोलण्याचा प्रयत्न करा. बोलायचेच झाल्यास मुद्देसुद बोला. त्याचा वेगळा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडेल. विद्याथ्र्यांनी सोशल मीडिया व टीव्हीपासून लांब राहावे व आपल्या अभ्यासावर लक्ष द्यावे. वारंवार प्रयत्न करुन जर यश मिळत नसेल तर आज कर्मामध्ये, करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये बदल करुन पाहा. आपलं भाग्य बदलू शकतं.
मकर – वेळोवेळी व्यायाम आवश्यक
यशस्वी, सुखदायी जीवन जगण्यासाठी तनासह मनही सुदृढ राखणे आवश्यक असतं. ते राखण्यासाठी वेळोवेळी व्यायाम करणं आवश्यक असतं. मनाला प्रसन्न ठेवणं आवश्यक असतं. हे आपल्याला शिकविणारा आजाचा दिवस असेल. आज तुमचे शत्रू पराभुत होऊ शकतात. ज्याचा तुम्हाला मनस्वी आनंद प्राप्त होऊ शकतो. स्पर्धा परिक्षेची तयारी करण्या-या विद्याथ्र्यांसाठी आजचा दिवस सर्वाेत्तम आहे. त्यामुळे त्यांनी आज फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष दिले पाहिजे. स्त्रियांना आज मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टीची आवड असेल त्यामध्ये मन रमविण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. म्हणजे इतर गोष्टींवर लक्ष जाऊन मानसिक तणाव येणार नाही.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje