भविष्य

20 जुलै 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस रोमॅंटिक

Rama Shukla  |  Jul 19, 2019
20 जुलै 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस रोमॅंटिक

मेष – जुने वाद मिटतील

प्रेमसंबधात आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जुने वाद मिटतील. व्यवसायात तुम्ही तुमच्या कामामुळे असमाधानी राहण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदाचे असेल. विरोधक नमतील.

कुंभ – अती विश्वासाने काम बिघडू शकते

व्यवसायात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या अती विश्वासामुळे एखादे काम बिघडू शकते. जोडीदाराच्या मदतीचा फायदा होईल. वाहन चालवताना सावध रहा. दुखापत होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात रस वाढेल. देणी घेणी करताना सावध रहा. 

मीन – वडिलांना सांधे दुखी होऊ शकते

आज वडिलांना सांधे दुखीचा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अथवा व्यवसायाक नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीच्या गोष्टींमधून सुटका होईल. सामाजिक समारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे.

वृषभ – विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल

विद्यार्थ्यांना आज मेहनतीचे चांगले फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी समस्या दूर होण्याची शक्यता आहे.अधिकारी आज तुमच्या मताला महत्व देतील. एखादे नवे काम हातात घेण्यापूर्वी जुनी कामे पूर्ण करा. व्यवसायानिमित्त प्रवास वाढण्याची शक्यता आहे. 

मिथुन – खर्चावर नियंत्रण ठेवा

आज तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. दिखावा करण्याच्या प्रयत्नात तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. इतरांवर विश्वास ठेऊ नका. जोडीदारासोबत नातेसंबध मजबूत होतील. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी रोजची कामे वाढण्याची शक्यता आहे. मंगल कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

कर्क – आई-वडीलांचे आरोग्य चांगले राहील

आई-वडीलांचे आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. आज तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. अचानक फिरायला जाण्याचा बेत आखाल. सामाजिक कार्यात रस वाढण्याची शक्यता आहे.

सिंह – प्रेमात निराशा होऊ शकते

आज तुम्हाला प्रेमात अपयश येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यता  आहे. बोलण्यापूर्वी नीट विचार करून मगच बोला. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक भागिदारी टुटण्याची शक्यता आहे.

कन्या – पोटाची समस्या होऊ शकते

आज तुम्हाला पोटाची समस्या जाणवू शकते. खाण्या-पिण्याबाबत सावध रहा. कोर्ट-कचेरीचे निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. एखादे नवीन काम करताना सावध रहा. भविष्यात फायदा होण्याची  शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यामुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

तूळ – शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला सासरच्या लोकांकडून धनप्राप्ती होणार आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते. व्यवसायात फायदा आणि नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात चांगला ओळखी निर्माण होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात सन्मान आणि भेटवस्तू मिळतील.

वृश्चिक – आज दिवस रोमॅंटिक असेल

आज तुमच्यासाठी दिवस रोमॅंटिक असेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची  शक्यता आहे. प्रवासाला जाण्याचा बेत आखाल. व्यवसायात काही लोकांची ओळख फायदेशीर ठरेल. इतरांबद्दल संवदेनशील व्हाल. वडिलधारी व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते.

धनु – काम पूर्ण करण्यात समस्या येतील

आज तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. काम करताना कामावर नीट लक्ष ठेवा. नियोजित काम वेळेत पूर्ण होणे थोडे कठीण आहे. आर्थिक स्थिती बेताची राहील. स्वभाव आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.

मकर – शेअर बाजारात फायदा होईल

उत्पन्नाचे नवे साधन मिळणार आहे. शेअर बाजारात आर्थिक फायदा होण्याची  शक्यता आहे.एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग आहे. अर्धवट राहीलेली कामे पूर्ण कराल.आरोग्याची काळजी घ्याल.

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

 

Read More From भविष्य