मेष – मन विचलित होईल
आपल्या राशीमध्ये चौथा असलेल्या चंद्रामुळे मनाला थोडी अस्वस्थता लाभेल. करीत असलेल्या कामामध्ये मन लागणार नाही. त्यामुळे मन विचलितही होऊ शकतं. हे सगळं चंद्राच्या प्रभावामुळे होत असल्यामुळे शक्य तेवढ्या प्रमाणात मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. आज तुम्हाला अपचनाचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आहारावर नियंत्रण ठेऊन आरोग्याची काळजी आपण आज घ्यायला हवी. मुलं आज तुमच्या मनानुसार वागणार नाहीत. त्यामुळे त्यांनी हेच केलं पाहिजे हा अट्टहास आज करु नका. त्याचा तुम्हालाच त्रास होऊ शकतो. आजच्या दिवस त्यांना त्यांच्या मताप्रमाणे वागु द्या. आपल्या वास्तुकडून आज तुम्हाला लाभाचे संकेत आहेत.
कुंभ- भावडांशी मतभेद
जीवनात कुणाशीही मतभेद होणं हे कधीही वाईट असतं. त्यात मतभेद जर आपल्या घरातील सदस्यांशी असतील तर ते जास्तच वाईट! आज तुमचे भावडांसोबत मतभेद होणार आहे. त्यामुळे ते होणार नाही किंवा झालेच तर वाढणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. कारण पुढे चालून या मतभेदाचं रुपांतर मनभेदामध्ये होऊन भयंकर परिणाम उद्भवतात. म्हणून तडजोडीचे धोरण ठेवा. एका हाताने टाळी वाजत नाही, हे लक्षात घ्या. आज जोडीदारासोबत प्रवासाचे तुमचे योग आहेत. त्यामुळे आनंदाचे वातावरण असू शकेल. प्रॉपर्टीतूनही आपल्याला आज लाभ मिळू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने आज प्रयत्न करायला हरकत नाही. आज तुमचा एखाद्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे कुणाविषयी कुठले मत बनविण्याआधी आपण विचार करायला हवा.
मीन- वडिलांशी संघर्षाची शक्यता
संवाद योग्य पद्धतीने झाला तर वाद होणारच! मात्र वाद होण्याची शक्यता असल्यास सत्यता लक्षात घेऊन त्याला वेळीच थांबविणे शहाणपणाचे असते. विशेषकरुन हा वाद जेव्हा आपल्या घरातील सदस्यांसोबत असेल तेव्हा तर आपण हे केलंच पाहिजे. आज तुमचा वडीलांची संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे संबंध बिघडू शकतात. तो वाद किती वाढवायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून राहिल. म्हणून तडजोडीचे किंवा कमीपणाचे धोरण स्विकरावे लागल्यास ते स्विकारायला हरकत नाही. अनोळखी लोकांकडून आपल्याला आज विरोध होऊ शकतो. मात्र त्याकडे लक्ष न देता किंवा त्यांच्या विरोधाला न जुमानता तुम्ही प्रयत्न करीत राहिल्यास आज तुमचे शत्रू पराभूत होऊ शकता
वृषभ – संततीबाबत आनंदवार्ता समजतील
पालकांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण म्हणजे त्यांच्या मुलांना कोणत्याही गोष्टीमध्ये मिळालेलं यश होय. यश मग ते छोटं जरी असलं तरी त्याचा आनंद हा खूप मोठा असतो. ते जसं पालकांसाठी आनंदाचं असतं तसचं ते पाल्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठीही आवश्यक असतं. म्हणून त्याचं कौतुक होणं गरजेचं असतं. आज आपल्या संततीला यश मिळू शकतं. एखाद्या कामामध्ये आज उतावळा नवरा उडघ्याला बाशिंग अशी गत होऊ शकते. म्हणून आज धैर्य दाखविलेलेच बरे. सासरच्या मंडळींशी आज तुमचा वाद होऊ शकतो. मात्र याच्या विपरीत गोष्ट म्हणजे आज तुम्हाला जोडीदाराकडून सहकार्यसुद्धा प्राप्त होऊ शकतं. तसंचं खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. आज तुमचा प्रवासाचाही योग असून त्यात नुकसान होयाचा संभव आहे. त्यामुळे शक्यतोवर आज प्रवास टाळा.
मिथुन – जेष्ठ नागरीकांनी काळजी घ्यावी
जेष्ठ नागरीकांना वयोमानानुसार अनेक त्रासांशी झगडावं लागत असतं. कधी कधी तर त्रासात अधिकच वाढ होत असते. आज आपला त्रास वाढू शकतो. त्यामुळे जेष्ठ नागरीकांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. प्रेमी मंडळींसाठी आजचा दिवस लाभदायक व आनंददायक आहे. कारण आज प्रेयसीशी संपर्क होऊ शकतो. नोकरी व व्यवसायामध्येही आज चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा योग्य तो उपयोग करुन घ्यायला हवा. थोडक्यात जेष्ठ नागरीकांना होणारा त्रास सोडला तर आज जागृत राहून प्रयत्न करीत राहिल्यास यश नक्कीच प्राप्त होऊ शकतं.
कर्क- संततीचा सामाजिक कार्यात सहभाग
जीवन जगत असतांना आपण या समाजाचं देणं लागतो, ही भावना मनात ठेवून इतरांची जमेल तशी मदत करीत राहणे अत्यावश्यक असतं. इतरांची मदत करण्याचे हे संस्कार बालवयात किंवा किशोरवयात झाले तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. या आनंदाची अनुभूती आज तुम्हाला मिळणार आहे. कारण आज तुमची संतती एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी होईल. त्यामुळे त्याचं तुम्हाला प्रचंड कौतुक करावसं वाटेल. त्यांना अजुन चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देत राहा. जोडीदाराशी आज मनमुटाव होऊ शकतो. घरोघरी मातीच्याच चुली असतात. त्यामुळे कुठलाही वाद न वाढवता तो कसा संपवता येईल यावर लक्ष द्या. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
सिंह – खर्चाचे प्रमाण वाढेल
आपल्या राशीला चंद्र बारावा असल्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे तो तुम्ही थांबवू शकत नसले तरी कमी करण्याचा मात्र प्रयत्न नक्कीच करु शकतात. त्यामुळे जो गरजेचा असेल तो खर्च करुन अवास्तव किंवा अनावश्यक खर्चाला तुम्ही कात्री लावू शकता. आपले आरोग्यही चांगले राहणार आहे. ते कायम तसेच राहावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. आज तुम्हाला सासुरवाडीकडून एखादा लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे घरात आनंद राहण्याऐवजी जोडीदाराबद्दल गैरसमज होऊ शकतो. जी संसारासाठी वाईट केव्हाही वाईट बाब आहे. म्हणून गैरसमज वाढणार नाहीत किंवा होणारच नाही याची दक्षता आपल्याला आज घ्यावी लागणार आहे. एंकदरीत आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा आहे.
कन्या – अन्नबाधा होऊ शकते
कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांनी जेवणाच्या चुकलेल्या वेळा, आहारावर नियंत्रण नसणे, पचनयुक्त आहार न घेणे अशा विविध कारणामुळे अन्नबाधा होत असते. म्हणून या गोष्टींपासून आपण सावध राहायला हवं. कारण आज तुम्हाला अन्नबाधा होऊ शकते. म्हणून आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. व्यापार, व्यवसायासाठी आजचा दिवस सुखद असा असेल. त्यामुळे आज कुठली संधी चालून आल्यास तिला व्यावसायिकांनी सोडता कामा नये. त्यात आपला फायदाच होणार आहे. विद्याथ्र्यांनी सोशल मीडिया व टीव्हीपासून लांब राहणे कधीही चांगलं. या गोष्टीचं महत्त्व आज पटू शकतं किंवा या गोष्टींमुळे डोक्याला ताप होऊ शकतो. म्हणून यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. फक्त आजच्यासाठीच नाही तर भविष्यासाठी ते तुमच्या उपयोगाचं होऊ शकतं.
तूळ – लहान भावंडांची काळजी घ्या
घरामध्ये जो जेष्ठ व्यक्ती असतो किंवा भावंडांमध्ये जो मोठा असतो त्याला नेहमीच इतरांची काळजी घ्यावी लागते. ती त्यांची जबाबदारीही असते. मात्र रोजच्या दिनचर्येत, कामाच्या व्यापामुळे या जबाबदारीकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. तसे होत असेल तर आज आपल्याला लहान भावंडांची काळजी घ्यावी लागणार आहे. होऊ शकतं तुमच्या मदतीची त्यांना आवश्यकता असेल. कुटुंबातही आज तुम्ही धैर्याने निर्णय घेणार आहात. त्या निर्णयाचे स्वागतही होणार आहे. वडीलांकडूनही आज तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. त्यांच्या मार्गदर्शनाचा योग तो लाभ करुन घ्या. खर्चाकडे मात्र आज तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. अंथरुन पाहून पाय पसरावे. त्यानुसार खर्च करीत असतांना आपल्या उत्पन्नाकडेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
वृश्चिक – आरोग्याची काळजी घ्या
रोजच्या दिनर्येत कामाच्या व्यापामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपल्याला स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. एखाद्या गोष्टीचा त्रास व्हायला लागल्यानंतरच आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळतं. हे आपल्याला पटवून देणारा आजचा दिवस असेल. आज विशेषत: ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. कोणत्याही परिस्थितीत आपला रक्तदाब कमी किंवा जास्त होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्त्रियांनाही आज मानसिक तणाव सहन करावा लागू शकतो. त्यामुळे स्त्रियांनी आज इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करुन ज्या गोष्टीची आवड असेल त्यात मन गुंतवले पाहिजे. खर्चावरही आपल्याला आज नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायातही आज गोंधळ उडू शकतो. त्यामुळे व्यावसायिकांनी आज कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा.
धनु – विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात राहिल
तसं बघायला गेलं तर विद्यार्थ्यांनी रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करणे हीच खरी अभ्यासाची पद्धत आहे. मात्र सगळ्यांच्या बाबतीत तसे होत नाही. विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत असतात. आज मात्र त्यांचे पूर्ण लक्ष अभ्यासात राहिल. त्यामुळे आजच्या सारखा अभ्यास रोज कसा करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, याची प्रचिती आज आपल्याला मिळू शकते. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो आपण सहन करायला हवा. आज आरोग्याकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. छोटेही दुखणे असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. स्त्री पक्षाकडून आपल्याला आज सहयोग प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे घरात आनंदी आनंद राहिल. व्यावसायिकांनी आज आपल्या नफ्याकडे लक्ष ठेवावे.
मकर- वैवाहिक जीवनात आनंद
जीवन जगत असतांना सुख-दु:ख, चढ-उतार हे लागूच असतात. मात्र कधी कधी असे काही प्रसंग घडतात की ज्यामुळे आपल्या आनंदाला पारावार राहत नाही. त्या क्षणांचा पुरेपुरे आनंद घेऊन त्यांना संस्मरणीय बनविले पाहिजे. आपल्या वैवाहिक जीवनातील विविध रंग आज आपल्याला अनुभवायला येणार असून हे क्षण आपण जपले पाहिजेत. आज तुम्ही अगदी आनंदाने वास्तुवर खर्च करणार आहात. तसेच व्यवसायातही जोड व्यवसायाचा विचार तुम्ही करु शकता. मात्र हातचे सोडून पळत्याचे मागे लागणे चुकीचे आहे. हे सत्य लक्षात घेऊन जोड व्यवसायाचा विचार करीत असतांना आपले मुख्य व्यवसायाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मनशांती आज गुरुंचे आशीर्वाद मिळवायला विसरु नका.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje