मेष – आईवडीलांची साथ मिळेल
आज तुम्हाला आईवडीलांची भावनिक साथ मिळेल. विरोधकांचा त्रास कमी होईल. प्रतिष्ठित लोकांशी भेट होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. राजकारणातील आव्हाने वाढणार आहेत. वाहन चालवताना सावध राहा.
कुंभ -अचानक धनलाभ होणार आहे
आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. सुखसाधनांमध्ये वाढ होईल. धार्मिक, सामाजिक कार्यातील रस वाढणार आहे. महत्त्वाची रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील. वाहन चालवताना सावध राहा.
मीन- आईला पायदुखी होऊ शकते
आज तुमच्या आईची चांगली काळजी घ्या. आईचा पाय दुखण्याची शक्यता आहे. व्यवसायात बिघडलेली कामे पूर्ण होतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पैशांचे व्यवहार समजूतदारपणे करा. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या.
वृषभ – पदोन्नतीत अडचणी येण्याची शक्यता
आज तुमच्या पदोन्नतीत अडचणी येण्याची शक्यता आहे. व्यवसायात अथवा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे. जोडीजाराची भावनिक साथ मिळेल. मित्रांकडून आनंदवार्ता मिळेल.
मिथुन – नवीन प्रोजेक्टमधून फायदा होईल
आज तुम्हाला तुमच्या नवीन कामातून चांगला फायदा मिळेल. मनासारखी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. देणी घेणी सांभाळून करा.
कर्क – विद्यार्थ्यांना तणाव येण्याची शक्यता
आज विद्यार्थ्यांना तणाव येण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची साथ मिळेल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
सिंह – दुखापत होण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला विनाकारण धावपळ करावी लागेल. दुखापत होण्याची शक्यता आहे सावध राहा. कौटुंबिक कलहापासून दूर राहा. मित्रांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.
कन्या – कौटुंबिक नाती सुधारतील
आज तुमच्या घरात एखादं मंगल कार्य होणार आहे. ज्यामुळे घरातील बिघडलेले नातेसंबंध पुन्हा पूर्वीसारखे होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल.
तूळ – लक्ष्य साध्य करणे सोपे जाईल
आज मार्केटिंगच्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे अधिकारी खुश होतील. व्यवसायात हळूहळू प्रगती होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक – महागडी वस्तू हरवण्याची शक्यता
आज एखादी महागडी वस्तू हरवेल. उत्पन्न कमी झाल्यामुळे निराश व्हाल. कौटुंबिक समस्यांपासून सुटका होण्यासाठी मित्रांची मदत घ्या. बिघडलेले नातेसंबंध सुधारतील.
धनु – शारीरिक दुखण्यातून आराम मिळेल
आज तुम्हाला शारीरिक आजारपणातून आराम मिळेल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वामुळे बरंच काही मिळवाल.सकारात्मक विचारसरणीचा लाभ होईल. विकोधकांपासून सावध राहा. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर – नातेसंबंधातील तणाव वाढेल
आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. सामाजिक कामांसाठी धावपळ करावी लागेल. प्रवासाला जाणे सध्या टाळलेलेच बरे.
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje