मेष – विद्यार्थ्यांचे मन भटकण्याची शक्यता आहे
विद्यार्थ्यांचे मन भटकू शकते. कामाच्या ठिकाणी दबाव वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक गोष्टींबाबत सावध राहा. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. देणी घेणी सावधपणे करा.
वृषभ – पायाचे दुखणे वाढेल
आज तुमच्या पायातून वेदना जाणवणार आहेत. प्रॉपर्टीबाबत एखादी खुषखबर मिळेल. जोडीदारासोबत सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.
मिथुन – घरातील आनंद वाढणार आहे
आज तुमच्या घरातील आनंद वाढणार आहे. प्रेमात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन कामे वाढतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क – विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस वाढेल
आज तुम्ही दिवसभर कामात व्यस्त असाल. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस वाढणार आहे. व्यावसायिक कामे फायदेशीर ठरतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. जोडीदाराच्या भावनांना समजून घ्या, आरोग्याची काळजी घ्या.
सिंह – महागड्या वस्तूंची खरेदी करू नका
आज व्यवसायात मनाप्रमाणे यश मिळणार नाही. एखाद्या महागड्या वस्तूंची खरेदी करणे सध्या टाळा. संपत्तीमुळे घरात समस्या निर्माण होऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल.
कन्या – आईची तब्येत सुधारेल
आज तुमच्या आईच्या तब्येतीत सुधारणा होईल. कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. सामाजिर मानसन्मान आणि धनप्राप्तीत वाढ होईल. कोर्टकचेरीत यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
तूळ – जोडीदाराचा तणाव वाढेल
जोडीदाराचा तणाव वाढणार आहे. मुलांना तुमच्या प्रेम आणि साथीची गरज लागेल. देणी – घेणी करताना सावध राहा. रागावर नियंत्रण ठेवा. विरोधकांकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक प्रवास करणे टाळा.
वृश्चिक – संपत्तीत वाढ होण्याची शक्यता
आज तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. घरात मंगल कार्य घडणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध राहा.
धनु – अपचनाचा त्रास होईल
आज तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. आहाराबाबत सावध राहा. स्वभावात चिडचिड आणि अस्वस्थता राहील. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. देणी – घेणी करताना सावध राहा.
मकर – मुलांकडून समस्या निर्माण होतील
आज तुमच्या जोडीदाराच्या समस्याा वाढण्याची शक्यता आहे. मुलांकडून समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार वाढण्याची शक्यता आहे. जोखीमेची कामे करू नका. राजकारणातील महत्त्वकांक्षा पूर्ण होतील.
कुंभ – व्यवसायात चढ-उतार वाढतील
आज तुमच्या व्यवसायात चढ- उतार येण्याची शक्यता आहे. आळस आणि दुर्लक्षपणा वाढणार आहे. जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. देणी-घेणी सांभाळून करा.
मीन- अचानक धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे
आज तुम्हाला नवीन कामे मिळाल्यामुळे आर्थिक लाभ होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शेतीविषयक कामातून लाभ मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. आत्मविश्वासात वाढ होईल.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje