मेष – शारीरिक थकवा जाणवेल
आज तुम्हाला शारीरिक थकवा अथवा अशक्तपणा जाणवेल. विनाकारण वाद घालू नका. पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. आर्थिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे.
कुंभ – जोडीदारासोबत तणाव जाणवेल
आज तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला तणाव जाणवू शकतो. कौटुंबिक कलहापासून दूर राहा. आरोग्य आणि सामाजिक प्रतिष्ठेची काळजी घ्या. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. देणी घेणी सांभाळून करा. आध्यात्मिक रस वाढणार आहे.
मीन- उत्पन्नात वाढ होईल
आज तुम्हाला नवीन कामे मिळणार आहेत. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत प्रवासाला जाल. सुखसाधनांमध्ये वाढ होईल.
वृषभ – जोडीदाराकडून महागडी भेटवस्तू मिळेल
आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून एखादी महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सरप्राईझ मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान आणि महागड्या भेटवस्तू मिळतील.
मिथुन – कामे बिघडण्याची शक्यता आहे
आज व्यवसात दुर्लक्षपणामुळे तुमची कामे बिघडण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी वाद होतील. रागात कोणताच निर्णय घेऊ नका. आर्थिक स्थितीत मजबूत राहा. बिघडलेले प्रेमसंबंध पूर्ववत होतील.
कर्क – नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता
आज तुमचे व्यवसायिक संबंध मजबूत होतील. कामात व्यस्त राहाल. भौतिक सुख साधनांमध्ये वाढ होईल. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यश मिळेल. जोडीदाराची काळजी घ्या. छोट्याशा गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे.
सिंह – व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता
आज तुमच्या व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होऊ शकतं. मितमैत्रिणीसोबत केलेला प्रवास सुखाचा आणि फायद्याचा ठरेल. कौटुंबिक संबंध चांगले होतील. राजकारणातील रस वाढणार आहे.
कन्या – झोप पूर्ण होणार नाही
आज तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होण्याची शक्यता आहे. झोप पूर्ण न झाल्यामुळे आरोग्याच्या समस्या जाणवतील. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. रचनात्मक कार्यात मन रमेल.
तूळ – एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल
आज तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्यासोबत तुमची भेट होईल. पाहुणेमंडळी येण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नाते चांगले राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.
वृश्चिक – शैक्षणिक समस्या दूर होतील
आज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या दूर होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे.
धनु – कर्ज घ्यावे लागू शकते
कमी वेळात जास्त लाभ देणाऱ्या योजनांवर विश्वास ठेवू नका. अभ्यासासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
मकर – आरोग्य चांगले असेल
आज तुमचे आरोग्य उत्तम राहील. काही तरी नवीन करण्याचा उत्साह वाटेल. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल. आर्थिक बाजू चांगली असेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. नातेसंबंध सुधारतील.
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली
तुम्ही ‘या’ राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje