भविष्य

26 नोव्हेंबर 2019चं राशीफळ,मेष राशीच्या व्यक्तींची प्रकृती सुधारेल

Rama Shukla  |  Nov 22, 2019
26 नोव्हेंबर 2019चं राशीफळ,मेष राशीच्या व्यक्तींची प्रकृती सुधारेल

मेष : प्रकृती सुधारेल
दीर्घ आजारपणानंतर आरोग्य सुधारण्याची वेळ आली आहे. फोन बंद ठेवून आणि आराम करा. नियमित दिनक्रम आखून ठेवा. प्रसन्नता वाढेल. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. जोडीदारासह सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

कुंभ : रोजगाराचा शोध पूर्ण होईल
इच्छित रोजगाराचा शोध पूर्ण होईल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये रस वाढेल. महत्त्वाच्या कामात आळस करू नका. आर्थिक समस्या दूर होतील.

मीन : आर्थिक संकटाची भीती
खास व्यक्तीमुळे तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या धीम्या गतीमुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकतात. कर्ज घेणे टाळा. पालकांचे सहकार्य लाभेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.

वृषभ : प्रेमात निराशा होण्याची शक्यता
प्रेमात निराशा होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कृतीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकतात. मित्रांसोबत तणाव वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. खेळासारख्या अॅक्टिव्हिजमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

(वाचा : जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’)

मिथुन : प्रकृतीत बिघाड होऊ शकतो
कुटुंबातील एखाद्या सदस्याचं आरोग्य अचानक बिघाड होऊ शकते. दिवसभरात धावपळ होईल. खर्च वाढू शकतो. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय यशस्वी होतील. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. महत्त्वाचे काम रखडतील.

कर्क : स्वप्न लवकर पूर्ण होईल
घर खरेदी करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. जोडीदारासह परदेशात प्रवास करण्याचा योग आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राजकारणातील स्थान मजबूत होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल.

सिंह : नात्यांमधील गोडवा कायम राहील
जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा कायम राहील. अपत्याकडून चांगली बातमी मिळू शकते. राजकीय क्षेत्रातील जबाबदारी वाढू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. एखाद्या संस्थेद्वारे सन्मान केला जाऊ शकतो.

(वाचा : आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का)

कन्या : नवे करार रद्द होण्याची शक्यता
नवीन व्यवसाय करार आज रद्द होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसमोरही अडचणीही येऊ शकतात. स्वतःची काळजी घ्या. निरुपयोगी गुंतागुंत होईल. प्रियकर/प्रेयसीसोबतचे नाते अधिक दृढ होईल. आपल्या आरोग्याला जपा.

तूळ : संपत्ती खरेदीची योजना
जंगम आणि स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. सासरच्यांकडून पैसे किंवा भेटवस्तू मिळू शकतात. रखडलेली कामे पूर्ण होतील. कायदेशीर प्रकरणात विजय होण्याची शक्यता. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. मित्रांची भेट घडण्याचा योग.

वृश्चिक : कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात
चुकीच्या निर्णयामुळे व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात. सध्या प्रवास करणे टाळा. कौटुंबिक नात्यात गोडवा निर्माण होईल. जुन्या मित्रमैत्रिणींसोबत भेट होईल.

धनु : वृद्धांची प्रकृती बिघडू शकते
वृद्धांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे चिंता वाढू शकते. धावपाळ होईल. अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागेल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील. खर्‍या प्रेमाचा शोध सुरूच राहील.

(वाचा : या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी)

मकर : जोडीदारासोबत उत्साहपूर्ण संबंध
जोडीदारासोबतचे संबंध उत्साहपूर्ण असतील. भावाच्या मदतीने व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या

 

Read More From भविष्य