भविष्य

27 जून 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांना वारसाहक्क मिळण्याची शक्यता

Rama Shukla  |  Jun 26, 2019
27 जून 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांना वारसाहक्क मिळण्याची शक्यता

मेष – पोटाच्या तक्रारी जाणवतील

प्रवास करताना आहाराबाबत सावध रहा. पोटाच्या समस्या जाणवू शकतात. व्यवसायात समस्या जाणवतील. नोकरीत इतरांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंध आनंदाचे असतील. 

कुंभ – आई-वडीलांकडून वारसाहक्क मिळेल

आईकडून आज तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे साधन वाढवा. अडकलेले पैसे मिळतील. जोडीदारासोबत नाते मजबूत होतील. रचनात्मर कार्यात यश मिळेल. व्यवसायासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल.

मीन- अभ्यासातील समस्या वाढतील

अभ्यासातील समस्या वाढू शकतील. आज नवीन काम सुरू करू नका. ध्येय साध्य करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी फायवळ गप्पा मारण्यापासून दूर रहा. विरोधक त्रास देतील. मुलांसोबत चांगला वेळ घालवा.

वृषभ – भावंडांसोबत सलोख्याने रहा

आज तुम्हाला भावंडांशी मिळूनमिसळून राहण्याची गरज आहे. सत्कर्माामुळे समाजात प्रतिष्ठा मिळेल.एखाद्या सामाजिक संस्थेतून सन्मान प्राप्त होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. मुलांसाठी असलेली कर्तव्य पूर्ण कराल. जोडीदारासोबत वेळ आनंदात जाईल.

मिथुन – नोकरीची नवी संधी मिळेल

मीडिया आणि लेखनक्षेत्रातील लोकांसाठी आज शुभ दिवस आहे. नवीन नोकरीची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात प्रगती जाणवेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे  सहकार्य मिळेल. रोजगाराच्या संधी चालून येतील. कायदेशीर गोष्टींतून सुटका मिळेल.

कर्क – एखादी मौल्यवान वस्तू चोरी होण्याची भिती

एखादी मौल्यवान वस्तू आज चोरीला जावू शकते. वाहनखर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. रखडलेले काम पूर्ण होतील. न आवडणारी माणसे भेटण्याची शक्यता.

सिंह – गंभीर आजारपणातून सुटका

घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीचा गंभीर आजार दूर होईल. आज दिवस आनंदाचा असेल. घरातील लोकांसोबत वेळ मजेत जाईल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. व्यवसायात वाढ होईल. उत्पन्नाचे साधन वाढेल. 

कन्या – कुंटुंबात गैससमज निर्माण होतील

एखाद्या प्रिय व्यक्तीकडून आज तुम्हाला त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. वाहन चालवताना सावध रहा. रखडलेली कामे पूर्ण कराल. वारसाहक्क मिळण्यासाठी कायद्याची मदत घ्यावी लागेल.

तूळ – पायदुखीमुळे हैराण व्हाल

पायाचे दुखणे वाढण्याची शक्यता. मित्रांशी वाद घालू नका. विनाकारण त्रास वाढू शकतो. वारसाहक्काबाबत आनंदवार्ता मिळेल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कठीण मेहनत घ्यावी लागेल.

वृश्चिक – वारसाहक्क मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला वारसाहक्क मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू कराल. कोर्ट कचेरीतून सुटका होईल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. वाहन चालवताना सावध रहा.

धनु – मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता

आज तुमचे मित्रमंडळींसोबत मतभेद होतील. कुंटुंबातील छोट्या मोठ्या गोष्टीबाबत गैरसमज करून घेऊ नका. राजकारणातील ओळखींचा व्यवसायात फायदा होईल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील.

मकर- आज नवीन काम सुरू करू नका

आज एखादे नवीन काम सुरू करू नका. समस्या वाढू शकतात. विद्यार्थ्यांवर नकारात्मक विचारांचा प्रभाव होईल. कामाच्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानामुळे त्रास वाढेल. व्यवसायातील एखादे प्रोजेक्ट रद्द होऊ शकते. जोडीदाराशी नाते दृढ होईल.

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)

Read More From भविष्य