मेष– दुर्लक्ष केल्यामुळे चांगल्या संधी गमवाल. आरोग्य आणि करिअरची चिंता सतावेल. नातेसंबंध मजबूत होतील.संतान-सुख मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत प्रवास सुखाचा आणि फायद्याचा ठरेल. भेटवस्तू आणि मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ- वडीलधाऱ्या मंडळीचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. विनाकारण वादामध्ये अडकाल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या वागणूकीने त्रस्त व्हाल. संयम राखा. सायंकाळी खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
मीन – आज अचानक प्रियकर समोर येण्याची शक्यता आहे. नवीन प्रेमप्रकरण निर्माण होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. साहित्य आणि संगीतामध्ये रस घ्याल. देण्याघेण्याच्या समस्या मार्गी लागतील. कौटुंबिक समस्या सुटतील. कुंटुंबाचे सहकार्य मिळेल.
वृषभ – वारसा हक्काने मिळणारी संपत्ती कायदेशीर पद्धतीने ताब्यात येईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. सुखसाधनांमध्ये वाढ होईल. विरोधकांपासून सावध रहा. व्यावसायिक योजना सफळ होतील.सध्या कोणतेही नवीन काम सुरु करू नका. मित्रमंडळींसोबत केलेला प्रवास अविस्मरणीय असेल.
मिथुन – नोकरीत तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे वरिष्ठ नाराज होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारीमध्ये व्यस्त रहाल. व्यवसायातील मंद गतीमुळे तणाव वाढण्याची शक्यता. व्यवसायात चढ-उतार येतील. रखडलेली कामे सहज पूर्ण होतील.
कर्क – कुंटुबातील वाद-विवाद चांगल्या मार्गाने मिटवाल. प्रियकराशी भेट होईल. नवीन प्रेमप्रकरण होण्याची शक्यता आहे. आरोग्याची योग्य काळजी घ्यावी लागेल. अचानक एखादी आरोग्य समस्या डोकं वर काढेल. मन अशांत होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये वाढ होईल. करिअरमध्ये प्रमोशन मिळेल.
सिंह – आईच्या शारीरिक दुखण्याने निराश व्हाल. मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे.समस्या सोडवताना जोडीदाराची चांगली साथ मिळेल.खर्च वाढण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. व्यवसायामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. महत्वाची कामे लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कन्या – लेखन आणि अभ्यासामध्ये रस वाढेल. पार्टनरशिपमध्ये एखादे काम सुरू कराल. व्यवसायामध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यामध्ये व्यस्त रहाल. योग्य सन्मान मिळेल. वादविवादापासून दूर रहा. तुमच्या करिअरच्या क्षेत्रात तु्म्हाला यश मिळेल. आरोग्याची चिंता सतावण्याची शक्यता आहे. सावध रहा.
तुळ- आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आज एखादीअनोळखी व्यक्ती तुम्हाला फसवेल.महत्वाचे कागदपत्र हरविण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल. बजेट गडबडण्याचे देखील संकेत आहेत. सासरच्या मंडळींकडून लाभ होतील. कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद घालू नका. आरोग्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक- आरोग्य-स्वास्थ लाभेल. आहाराची काळजी घ्या. एखाद्या जुन्या आजारपणातून आराम मिळेल. नियोजित कामे पूर्ण होतील. व्यावसायिक योजना मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी त्रास जाणवल. अनोळखी लोकांवर विश्वास ठेऊ नका. जमाआणि खर्चा मध्ये संतुलन राखा.
धनु – अति दगदगीमुळे नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे.विरोधक त्रास देतील. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यांत रस वाढेल. रखडलेली कामे मित्रांमुळे मार्गी लागतील. व्यवसाय करणाऱ्या महिलांना घनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.
मकर – नोकरी करणाऱ्या महिलांचे उत्पन्न वाढेल. व्यापारामध्ये लाभ आणि उन्नती होण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीचा विचार कराल. जोडीदाराची काळजी घ्या.नातेसंबंध सुधारतील. आरोग्याची काळजी घ्या. शैक्षणिक क्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje