मेष – आज लाभासोबत चिंतादेखील आहे.
जीवनात कित्येक गोष्टी अचानक घडतात असं आपल्याला नेहमी वाटत असतं. मात्र तसं नसून जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्या भुतकाळाशी असतो. आपण एखादी गोष्ट अचानकपणे घडली असं म्हणतो. आज अचानक लाभदायक गोष्ट घडणार आहे. त्यामुळे तुम्हाला आज अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. मात्र लाभाच्या आनंदासोबत चिंताही सतावणार आहे. आज तुम्हाला जोडीदार व आई या दोघांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांना पुरेसा वेळ द्या. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस लाभदायक असून आज अभ्यास चांगला होणार आहे.
कुंभ – वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे
आपण समजुदार असलो किंवा निर्णय घेण्यात सक्षम असलो तरी वडीलांचे मार्गदर्शन हे कधीही महत्त्वपूर्णच असते. कारण आपल्यापेक्षा अनुभव त्यांच्याकडे जास्त असतो. आज तुम्हाला वडीलांकडून मार्गदर्शन मिळेल. त्याकडे दुर्लक्ष न करता, ते ज्या गोष्टी सांगतील त्यांचे पालन करा. आपल्यासाठी तेच उपयोगाचे व लाभदायक ठरेल. आजचा आपला दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. त्यामुळे कोणतेही काम त्याच आत्मविश्वासाने पूर्ण कराल. अपचनाचा त्रास संभवू शकतो. म्हणून आरोग्याकडे लक्ष देऊन खाण्यावर नियंत्रण ठेवा. आनंदी आनंद असल्याने आज मानसिक शांतीचा अनुभव कराल.
मीन – प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा
फक्त परिश्रम व प्रयत्नांद्वारे यश मिळत नाही तर त्याला भाग्याची साथदेखील असावी लागते. भाग्याची साथ नसेल तर हिरमोड होऊ शकतो. मात्र निराश होऊ नका. कारण केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाही. चिकाटीने प्रयत्न कायम ठेवल्यास हातात घेतलेले काम नक्की पूर्ण होऊ शकते. म्हणून आज यश मिळणारे नसलं तरी प्रयत्न सोडू नका. कुटुंबात धैर्याने निर्णय घ्याल. घाईघाईने घेतलेले निर्णय संबंधांमध्ये दुरावा निर्माण करु शकतात. आज कितीही घाई असली तरी वाहन थोडे सावकाश चालवा. आरोग्याकडे संपूर्ण लक्ष द्या. शक्यतोवर बाहेरील जंक फूड टाळणेच आपल्या हिताचे राहिल.
वृषभ- परिश्रमाला यश प्राप्त होईल
माणसाने फळाची चिंता न करता कर्म करीत राहावं असा संदेश गीतेत दिलेला आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास व त्या प्रयत्नांवर विश्वास ठेवल्यास चांगलं फळ नक्की मिळतंच. फरक फक्त इतकाच असतो की जर तुमच्या भाग्याची उत्तम साथ असेल तर ते तत्काळ मिळल अन्यथा तेच फळ उशिरा मिळतं. आज तुमच्या परिश्रमाला यश प्राप्त होऊन आर्थिक लाभ संभवू शकतो. त्यामुळे घरात आनंदी आनंद राहिल. या आनंदाच्या भरात आज जोडीदाराशीही तुम्ही योग्य सुसंवाद साधणार आहात. त्यामुळे घराततही शांतीचे वातावरण राहिल. मात्र संततीची काळजी घ्या. आनंदाच्या भरात त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका.खर्च करण्यापूर्वीही आज विचार करा. आर्थिक सुबत्ता असली तरी नियोजन फार महत्त्वाचे आहे.
मिथुन- संयमाचे फळ मिळेल
जीवन जगत असताना कोणत्याही गोष्टीमध्ये उतावीळ न होता संयम, धैर्य बाळगणे खूप गरजेचे असते. “सयंम का फल मिठा होता है’ आजचा आपला दिवस संयमाचे गोळ फळ देणारा आहे. आपले काही कर्जाची प्रकरणे प्रलंबित असतील तर ती आज मार्गी लागू शकतात. घरात आनंददायी वातावरण राहिल. शिवाय आज तुम्हाला व्यवसायातूनही लाभ होऊ शकतो. त्यामुळे व्यावसायिकांनी आज प्रयत्न करण्यामध्ये जराही कमी पडू नये. दगदगीमुळे पोट दुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतोवर दगदग टाळावी. महत्त्वाचे म्हणजे आपले उत्पन्न व खर्च यामध्ये नियंत्रण ठेवा. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त व्हायला नको.
कर्क- संधीचा लाभ घ्या
योग्य वेळी मिळालेल्या संधीचा सुयोग्य लाभ घेणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होत असते. कारण एक योग्य संधी आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकते. आज आपल्याला अशाच संधीचा लाभ मिळण्याचे योग आहेत. आपण नोकरी करीत असाल किंवा व्यवसाय तर दोन्ही गोष्टीत आज उत्तम संधी उपलब्ध आहेत. या संधीचा योग्य तो सदुपयोग करावा. कुटुंबात आज तुम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. घरातील सदस्यांकडून सन्मानही राखला जाईल.आजचा दिवस अभ्यासात यश प्राप्त करुन देणारा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण लक्ष अभ्यासात द्यावे. उत्तर दिशा आज आपल्यासाठी शुभ आहे.
सिंह- मोहापासून सावधान राहा
जीवनात लालसा, मोह बाळगणे कधी कधी नुकसानकारक ठरू शकतं. मोहापासून आपण सदैव दूरच राहिले पाहिजे. कधी कधी छोटा फायदा देणारा मोह तुमचं मोठं नुकसानदेखील करु शकतात. आज याची प्रचिती येणारा दिवस आहे. लहान फायद्यासाठी स्वतःचं मोठं नुकसान करुन घेऊ नका. परिश्रम व प्रयत्नांवर विश्वास ठेवून अविरतपणे ध्येयाकडे वाटचाल सुरु ठेवा.अस केल्याने आपल्याला आज अचानक नवीन कल्पना सूचतील. त्यातून नवीन दिशा प्राप्त होऊ शकते किंवा चांगल्या संकल्पनांना मूर्त स्वरुप प्राप्त होऊन लाभही होऊ शकतो. मोहापासून सावध राहा यातच आपलं भलं आहे.
कन्या- विचार करायला लावणारा दिवस
आयुष्यामध्ये कमी-जास्त प्रमाणात परिश्रम व प्रयत्न तर प्रत्येकजण करतच असतो. मात्र ग्रहमान योग्य नसतील तर भाग्याची साथ मिळत नाही. प्रयत्न करुनदेखील खूपवेळा अपेक्षित यश प्राप्त होत नाही. आपल्याला याची अनुभूती देणारा आजचा दिवस आहे. खूप कष्ट करुनही दिवासाअखेर हातात अपयश येणार आहे. आज भाग्याची साथ नाही. आत्मविश्वास कमी होऊन नैराश्य येऊ शकतं. आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी एकांत शोधण्याचा प्रयत्न कराल. एकांत गाठून चिंतन करण्यावर आपला आज भर असेल. या परिस्थितीत तुम्हाला आपल्या भावंडांची आठवण येईल. मात्र निराश होऊ नका.
तुळ- नुकसान मात्र लाभदायक
कधी कधी मोठा फायदा होणार असेल तर लहान नुकसानाकडे दुर्लक्ष करायला हवे. अशा परिस्थितीत ते नुकसान नसून पुढील मोठ्या फायद्यासाठी गुंतवणूक ठरू शकते. अशा छोट्या नुकसानाच्या चिंतेत अडकून राहिलात तर मोठ्या फाद्यापासूनही दूर जावं लागू शकते. हे शिकविणारा आजचा दिवस आहे. भविष्यात मोठ्या फायद्याची शाश्वती असल्यास आज छोट्या नुकसानाकडे गुंतवणूक म्हणून पहा. आरोग्याकडे संपूर्ण लक्ष असू द्या. व्यापार, व्यवसायासाठी आजचा दिवस विशेष फायदा देणारा नसला तरी सुखद नक्कीच असणार आहे. आज आपण आपल्या कार्यामध्ये व्यस्त राहाल.
वृश्चिक- मित्र व परिवाराकडून आनंद
विद्यार्थ्यांसाठी आज अभ्यासापेक्षा मित्रांमध्ये जास्त रमण्याचा दिवस आहे. विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. कारण मित्रांनी आज काहीतरी वेगळे नियोजन केलेले असेल. त्यामुळे मित्रांकडून आनंद मिळेल. मोठ्या व्यक्तींनाही आपल्या परिवाराकडून आनंद मिळू शकतो. कुटुंबात आज धैर्याने निर्णय घ्याल. आपल्या त्या निर्णयाचे स्वागत केले जाईल. आपल्या शब्दाला आज वजन प्राप्त होऊन कुटुंबात मानसन्मान मिळेल.
धनु- अनोळखी लोकांकडून विरोध
आयुष्यात काही वेळा आपली काहीही चुक किंवा घेणं देणं नसतांना अनोळखी लोकांच्या विरोधाला सामोरे जावं लागते. जणू काही ते आपल्या आयुष्यातील राहू, केतू असावेत असं त्यावेळी वाटू लागतं. आज आपल्याला याची अनुभूती मिळणार आहे. अनोळखी लोकांकडून सावध राहा. आज मोठ्या फायद्यासाठी लहान नुकसान आनंदाने सहन कराल. बहुधा तेच या अनोळखी लोकांच्या पचनी पडणार नाही. मात्र कुणाला काय वाटतं यापेक्षा आज स्वत:च्या लाभाकडे लक्ष देणं तुमच्या फायदयाचं ठरणार आहे. होणाऱ्या नुकसानाला गुंतवणूक समजा. याशिवाय उत्पन्न व खर्च यामध्येही समतोल ठेवा. उत्पन्नापेक्षा खर्च वाढायला नको.
मकर- भुतकाळातील गोष्टींमुळे आज आनंद वाढेल
कधी कधी भुतकाळातील गोष्टी आपल्यासोबत पुन्हा घडत असतात किंवा भुतकाळात घडलेली एखादी आनंददायी गोष्ट पुन्हा कधी तरी आनंद देऊन जाते. याची प्रत्यक्ष अनुभूती आज आपल्याला मिळू शकते. त्यामुळे आनंद द्विगुणीत होऊ शकतो. तसेच नोकरी व व्यवसायातही नवीन संधी प्राप्त होतील. त्यांचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास लाभ होऊ शकतो. व्यायामाच्या वेळा तंतोतंत पाळा. अधिकारी वर्गाच्या हातात एखादे काम अडकलेले असेल तेही आज पूर्ण होण्याचे योग आहेत. एकंदरीत आजचा दिवस आपल्यासाठी सर्वच दृष्टीकोनातून आनंद देणारा असेल. त्याचा योग्य लाभ करुन घ्या. प्रयत्नांमध्ये कमी पडू नका.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje