भविष्य

3 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना धनलाभाची संधी

Rama Shukla  |  Aug 31, 2019
3 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना धनलाभाची संधी

मेष – आईची तब्येत सुधारेल

आईच्या तब्येतीत सुधारणा होणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पदोन्नतीची संधी मिळेल. व्यावसायिक कार्यात यश मिळेल. रखडलेली महत्त्वाची कामे पूर्ण कराल. 

कुंभ – कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल

कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. राजकारणातील पकड मजबूत होतील. विरोधकांकडून सावध रहा. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. 

मीन – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करताना सावध रहा. देणी-घेणी करताना सावध रहा. वादविवाद करू नका. राजकारणातील जबाबदाऱ्या पूर्ण होतील. मित्रांसोबत भेट होईल.

 

वृषभ – भावनात्मक कष्ट होण्याची शक्यता आहे

आज तुम्हाला नातेवाईकांकडून भावनात्मक कष्ट मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यश मिळेल. मन निराश राहील. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यश मिळेल. इतरांच्या टीकेपासून दूर राहा. धुर्त व्यक्तींपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मिथुन – वृद्ध लोकांची तब्येत बिघडण्याची शक्यता 

आज कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. विनाकारण दगदग होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. 

कर्क – लाभाची संधी मिळेल

आज तुम्हाला लाभाची संधी मिळेल. सासरच्या लोकांकडून महागडी भेटवस्तू मिळेल. दुर्लक्षपणा केल्यामुळे रखडलेली व्यावसायिक कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.  

 

सिंह – कौटुंबिक वादविवाद कमी होतील

कौटुंबिक वादविवाद घरातील थोरा-मोठ्यांच्या मदतीने कमी होतील. व्यावसायिक भागिदारी फायदेशीर ठरेल. रचनात्मक कार्यात यश मिळेल. अनुभवी लोकांच्या मदतीमुळे कामाच्या ठिकाणी चमकण्याची शक्यता आहे.

कन्या – नवीन काम सुरू करण्याचा विचार सध्या टाळा

नवीन कामाची सुरूवात आज करू नका. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये समस्या येतील. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल. एखाद्या गरजूला मदत केल्यामुळे आनंदी व्हाल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल.

तूळ – रखडलेले पैसे परत मिळतील

आजचे काम तुम्ही अगदी पद्धतशीरपणे सुरू कऱणार आहात. रखडलेले पैसे परत मिळतील. रचनात्मक कार्यात धनसंपत्ती आणि लोकप्रियता मिळेल. विरोधक नमतील. घरात सुखसुविधा पुरवणाऱ्या वस्तूंमध्ये वाढ होणार आहे. 

वृश्चिक – कामे रद्द होण्याची शक्यता आहे

व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. काम करताना समस्या येतील. कामाच्या ठिकाणी मनाविरूद्ध कामे करावी लागतील. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. उत्पन्नाची साधने वाढतील. 

धनु – रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता 

मुलांच्या भविष्याची चिंता सतावेल. रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता आहे. वादविवादांपासून दूर रहा. कुटुंबाची चांगली साथ मिळेल. धनसंबंधी चांगली बातमी मिळेल. रचनात्मक कार्यात वाढ होणार आहे.

मकर – सामाजिक संबंध सुधारण्याची शक्यता आहे

आज तुमचे सामाजिक संबंध सुधारण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या बौद्धिक क्षमतेचा लाभ होईल. व्यावसायिक संबंध मजबूत होतील. वाहन चालवताना सावध रहा. मित्रांच्या मदतीने प्रवास सुखाचा होईल. 

अधिक वाचा

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

 

 

Read More From भविष्य