मेष : आनंदाचा दिवस
प्रेमवीरांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. कारण आज आपल्या प्रिय व्यक्तीशी संपर्क होण्याची शक्यता आहे. यश मिळविण्यासाठी किंवा कोणतेही कार्य पूर्ण होण्यासाठी आज इतरांवर अवलंबून राहू नका. स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करा. आपली संस्कारांशी असलेली नाळ तुटणार नाही, आपला मार्ग चुकणार नाही, याची काळजी आज तुम्हाला घ्यायची आहे.
कुंभ : हव्यास नको
जीवनात सर्व गोष्टी आपल्यालाच मिळतील हा हव्यास मनी धरुन वागणे चुकीचे आहे. शैतानालाही त्याचा वाटा लागतो, हे लक्षात ठेवा. अपूर्ण असलेली कामे पूर्ण होण्यासाठी कामाची गती वाढवा. स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून त्यात सासत्य ठेवा. आज आपल्या मानसन्मानात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्मविश्वासवाढेल.
मीन : वास्तूंवर खर्च
आज तुम्ही वास्तूंवर आनंदात खर्च करणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंद पसरलेला असेल. घरात नवीन वस्तू आल्याने प्रसन्नताही येईल. आज तणाव जाणवत असेल तर तो घालविण्यासाठी परिवारासह सिनेमा बघायला जा. प्रयत्न करुनही यश मिळत नसेल तर कर्मात बदल करुन पाहा. यश नक्की मिळू शकतं.
वृषभ : शत्रू पराभुत होतील
आज तुमच्यासाठी पराक्रम गाजवून शत्रुंना पराभुत करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला असेल. तरही कोणतही कृती करण्यापूर्वी विचार करा. घाईगडबडीत कोणताच निर्णय घेऊ नका. आज तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार आहेत. त्यामुळे प्रयत्नांनी पराकाष्ठा करण्यात कमी पडू नका. दिवस छान आहे, त्याचा लाभ घ्या.
मिथुन : ओळखी होतील
आज तुम्ही प्रवास करणार आहात. त्यात नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणीत होणार आहे. आज तुम्ही आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. अनावश्यक खर्चाला कात्री लावायला हवी. आधी केलेल्या मुर्खपणाची फळे आज तुमच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आलीया भोगासी असावे सादर.
कर्क : आत्मविश्वास उंचावेल
आज तुमचा आत्मविश्वास उंचावणा-या घटना घडणार आहेत. त्याचा योग्य तो लाभ घेऊन स्वत:च्या भरभराटीवर लक्ष द्या. हे करीत असतांन थेंबे थेंबे तळे साचे हे लक्षात ठेवा. कुठल्याच गोष्टीचा अट्टहास आज अजिबात नको. मला सर्व गोष्टी जमल्याच पाहिजे ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. त्यामुळे व्यर्थ गोष्टीमुले आत्मविश्वास कमी होणार नाही, याची काळजी घ्या.
सिंह : प्रगती होईल
कल्पक व सर्जनशील कार्यात आज प्रगती होऊ शकते. त्यामुळे आपल्या संकल्पनांना आज मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न करा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्टा करण्यामध्ये कमी पडू नका. मन चिंती जे वैरी न चिंती. आज मन अस्थिर राहू शकतं. इतरांना सल्ला देतांना थोडे सांभळून राहा.
कन्या : अतिविचार घातक
अतिविचार घातक असतात. त्यातून चिंता जन्माला येऊ भिती निर्माण होते. त्यामुळे चिंता करण्यापेक्षा, जास्त विचार करण्यापेक्षा चिंतन करण्यावर भर द्या. त्यातून नवीन मार्ग गवसतील. आज संधी मिळण्याचीही शक्यता आहे. तिचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही खेळामध्ये प्राविण्य मिळविणार आहात. खेळाडूंनी आजच्या दिवसाचा लाभ घ्यावा.
तूळ : प्रयत्न वाढवा
आपले एखादे महत्त्वपूर्ण काम अपूर्ण असेल तर आज तुम्ही प्रयत्न वाढवायला पाहिजे. आज ते पूर्ण होऊ शकतं. आपले मानसिक व शारीरिक आरोग्य संतुलित राखण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी योगा व ध्यानधारणा नियमित करा. आज तुम्ही संकटांवर मात करु शकाल. त्यामुळे चिंतेतून मुक्त व्हाल. आत्मविश्वास वाढीस लागेल.
वृश्चिक : चिंतन करा
चिंता ही चितेला जाळत असते. त्यामुळे चिंता करीत बसण्यापेक्षा चिंतन करा. त्यातुन तुम्हाला नवीन मार्ग सापडतील. दररोज न चुकता तुळशीला पाणी घाला. स्वत:च्या अपयशासाठी इतरांना जबाबदार धरण्यात कोणताच शहाणपणा नाही. नाचता येईना अंगण वाकडे अशी तुमची अवस्था होऊ शकते. म्हणून काळजी घ्या.
धनु : धार्मिक कार्यात सहभाग
आज तुमच्यासाठी मनशांती मिळविण्याचा दिवस आहे. कारण आज धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात. या अनिश्चित जगामध्ये निश्चितता शोधण्याचा प्रयत्न करु नका. वास्तविकता जमजून घेऊन वागण्याचा प्रयत्न करा. मिळत असलेली अर्धी भाकर सांभाळून ठेवा. अतिलालसा नुकसानकारक ठरु शकते.
मकर : नुकसान होईल
आज तुमचे प्रवासाचे योग आहेत. त्यात नुकसान होण्याची शक्यता असल्याने आज काळजी घ्या किंवा प्रवासच टाळण्याचा प्रयत्न करा. काम करीत असतांना योग्य प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, हे लक्षात घ्या. स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा.
यासोबत वाचा एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje