मेष : वास्तूयोग संभवतो
आज तुम्हाला वास्तुयोग संभवण्याचे योग आहेत. मार्ग सापडत नसेल तर हतबल होऊन बसण्यापेक्षा चालायला सुरुवात करा. भाग्य तुमच्या मागे चालत येणार आहे. प्रयत्नान्ती परमेश्वर असतो, यावर विश्वास ठेवा. कोर्ट कचेरीमध्ये काही प्रकरणे प्रलंबित असतील तर आज ते निकाली लागू शकतात. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करा.
कुंभ : शत्रूवर विजय मिळवाल
आज तुमच्यासाठी पराक्रम गाजविण्याचा दिवस आहे. आज तुम्ही पराक्रम गाजवून शत्रुवर, हितचिंतकांवर विजय मिळविणार आहात. त्यामुळे आत्मविश्वास व आनंद वाढलेला असेल. मात्र कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करायला हवा. कुणाचा सल्ला घेण्याची आवश्यकता भासल्यास कमीपणा वाटुन घेऊ नका. कलाकारांसाठी आजचा दिवस यशदायक असा आहे.
मीन : योग्य लोकांशी मैत्री
परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. त्यामुळे योग्य लोकांशी मैत्री करण्याचा सल्ला आज तुम्हाला देण्यात येत आहे. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी आपली अवस्था होऊ नये म्हणून फुकटच्या गप्पा टप्पा आज नकोच. कुणाशी बोलतांना अचुक व आवश्यक तिककेच बोला. व्यवसनांच्या आहारी जाऊ नका.
वृषभ : शत्रूपासून सावधान
आज तुम्हाला शत्रूपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बेसावध राहिल्याने आज तुमचे नुकसान होऊ शकते. आज शक्यतो कुणावर विश्वास ठेवू नका. आपले काम स्वत:च पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मृग जळाच्या मागे लागून वेळ व्यर्थ दवडू नका. प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने प्रयत्नांची दिशा बदलावीशी वाटेल.
मिथुन : संधी लाभतील
आज तुमचा प्रवास करण्याचा योग असून त्या प्रवासातून तुम्हाला संधी मिळणार आहेत. त्यामुळे प्रवास लाभदायी होऊन आनंद द्विगुणीत होणार आहे. आज बचतीचा मार्ग स्विकारावा. भविष्यासाठी तरतुद करुन ठेवावी. ग्रह अनुकुल आहेत. त्यामुळे तुम्ही जेही कराल त्यात भाग्याची साथ लाभणार आहे. आज धाडस करायला चुकू नका.
कर्क : दान करा
आपण समाजाचं देणं लागतो या भावतेनू आज दोन्ही दातांनी दान करा. दिलेलं दुस-या मार्गाने परत आपल्याकडे आल्याशिवाय राहत नाही. वरकरणी कनवाळू आतून कठोर अशा व्यक्तींपासून सावध राहा. ते तुमचं नुकसान करु शकतात. आशावादी राहणे कधीही चांगले. निराशा मनात घर करणार नाही, याची काळजी घ्या.
सिंह : व्रताचे पालन करा
जीवनामध्ये आत्मिक समाधानासाठी, आध्यात्मिक आनंदासाठी व्रत वैकल्याचे पालन करायलाच पाहिजे, हे तुम्हाला शिकविणारा आजचा दिवस असेल. आपल्याला मिळणा-या वेळेचा सदुपयोग करायला शिका. नाही तर नंतरच पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. कानाचे दुखणे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या.
कन्या : शेरेबाजी नको
आज कुणावरही तडका फडकी शेरेबाजी नको. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवून आपल्या बोलण्याने कुणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. निराशा मनात दाटून आलेली असेल तर तिला तत्काळ दूर सारा. आशावादी राहण्याचा प्रयत्न करा. जगात काहीच अशक्य नसतं. आज तुमच्यासाठी आनंदी राहण्याचा दिवस आहे.
तूळ : अतिआत्मविश्वास घातक
अतिआत्मविश्वासामुळे गाफील राहून नुकसान होण्याची भिती असते. म्हणून अतिआत्मविश्वासघातक असतो, हे लक्षात घ्या. उथळ पाण्याला खळखळात फार. शॉपिंग करण्यापूर्वी आपल्या उत्पन्नाचा, आर्थिक नियोजनाचा विचार नक्की करावा. कोणत्याही गोष्टीत अती करु नका. आज तुम्ही स्वत:चे अस्तित्व सिद्ध करणार आहात.
वृश्चिक : सहनशिलता व उत्साह
अमर्याद सहनशिलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी तुम्ही आज परिपूर्ण राहणार आहात. त्यामुळे आज अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यावर द्या. प्रकृतीकडे लक्ष देण्याचा सल्ला आज तुम्हाला देण्यात आहे. रोजच्या दिनचर्येमध्ये आरोग्याची हेळसांड करु नका. महत्त्वाच्या कामांना उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हतबल न होता, प्रयत्न करत राहा.
धनु : कार्याला उशीर
कधी कधी भाग्यही आपली परिक्षा घेत असतं. म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही जर कार्याला उशीर होत असेल तर निराश होऊ नका. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. जीवनात धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो. त्यामुळे आज धाडस करुन बघा. नैराश्यतेतून बाहेर पडण्यासाठी ध्यान धारणा करण्यावर भर द्या. मन एकाग्र होण्यास मदत मिळेल.
मकर : प्रवास घडतील
आज तुमच्यासाठी प्रवासाचा योग असून दुरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेण्यासाठी तयार राहा. कुणाच्याही व्यंगावर हसणे हे कधीही वाईटच. आज तर अजिबातच नको. सत्याची कास सोडू नका. आपला मार्ग चुकीचा तर नाही ना? याची खात्री करुन घ्या. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे लक्षात ठेवा.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje