भविष्य

7 एप्रिल 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांनी आर्थिक नियोजन करण्याची गरज

Jyotish Bhaskar  |  Apr 4, 2019
7 एप्रिल 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांनी आर्थिक नियोजन करण्याची गरज

मेष : आर्थिक नियोजन उत्तम

आज तुम्ही आर्थिक नियोजन उत्तमपणे करु शकणार आहात. त्यामुळे आत्मविश्वासवाढून काय करायचे आहे, याची यादीही तयार राहिल. इतरांवर टिका टिप्पणी करण्यात वेळ घालवू नका. आपले हित कशात आहे, हे बघुन तेच साध्य करण्याचा प्रयत्न करा. चैन व मनोरंज यावर आज तुम्ही पैसा खर्च करणार आहात.

कुंभ : शत्रू वरचढ होतील

आज तुमचे शत्रू वरचढ होऊ शकतात. त्यामुळे मनाला विफलता येऊन आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आज कामे किंवा निर्णयही चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करतांना विचारपूर्वकच करा. आवश्यकता भासल्यास सल्ला घेण्यामध्ये कमीपणा वाटून घेऊ नका. स्वत:मधली लवचिकता वाढविण्याची तुम्हाला खूप गरज आहे.

मीन : वास्तुरचनेत बदल करा

घरात शांतता टिकत नसेल किंवा तुमचे मन लागत नसेल तर वास्तुरचनेत बदल करुन पाहा. तुम्हाला परिणाम नक्की दिसतील. तणाव जाणवत असेल तर तो घालविण्यासाठी संगीत ऐका. आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मनाला रमवा. छंद जोपासा. आजचा दिवस सर्वच दृष्टीकोनातून उत्तम आहे. त्याचा योग्य तो लाभ घ्या.

वृषभ : गैरसमज होईल

एखाद्याविषयी आज तुमच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो. म्हणून स्वत:वर आज नियंत्रण ठेवा. अचानकपणे कुणाविषयी भुमिका घेऊ नका. कामातून वेळ काढून थोडा आराम करा. तुमच्यासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे. मनस्वाथ्य बिघडविणा-या घटना आज घडू शकतात. त्यामुळे मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

मिथुन : वाहन खरेदी

नवीन वाहन खरेदीचा विचार तुमच्या मनात सुरु असेल तर आज तो पूर्ण होऊ शकतो. वेळ मिळत आहे, आजचा दिवसही उत्तम आहे. त्यामुळे मनसोक्त आज जगुन घ्या. कठिण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आज तुम्ही मार्ग काढू शकणार आहात. त्यामुळे आत्मविश्वासात वाढ झालेली असेल. प्रयत्न करण्यामध्ये कमी पडू नका.

कर्क : कर्मात बदल करा

प्रयत्न करुनही यश प्राप्त होत नसेल तर आधी कर्म, प्रयत्नांची दिशा योग्य आहे नाही? हे तपासून बघा व त्यानंतर कर्मात बदल करा. भाग्य तुमच्या मागे चालत येणार आहे. लहान फायद्यासाठी आज मोठं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. ऐकावे जनाचे करावे मनाचे, ही भुमिका ठेवा. आज जवळीचीच माणसं तुम्हाला दु:ख देणार आहेत.

सिंह : अकस्मिक आनंद

सायंकाळपर्यंत आज तुम्हाला एखादा अकस्मिक आनंद प्राप्त होऊ शकतो. ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल. त्यामुळे मनाला खूप आनंद होईल. फक्त आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्याकडून कोणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. खेळाडूंसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. यश मिळण्यासोबतच आज लौकिकातही भर पडणार आहे.

कन्या : मुद्देसुद बोला

उचलली जीभ लावली टाळ्याला असे करणे चुकीचे असते. आज शक्यतोवर मुद्देसुदच बोलण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आपल्या बोलण्याने कोणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. आपल्या व्यस्त अशा दिनचर्येतून आज स्वत:साठी वेळ काढा. आवडत्या गोष्टींमध्ये मन रविण्याचा प्रयत्न करा. छंद जोपासा. नशिबाची साथ लाभू शकते.

तूळ : वैरभावना त्यागा

कुणाविषयी मनात वैरभावना असेल तर आज तिचा त्याग करा. पाण्यात राहून माशाशी वैर करु नये. आपल्या दैनंदिन कामांमध्ये लक्ष घाला. रोजची कामे त्याच दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कामाचे ओझे वाटणार नाही. पूर्वी केलेल्या कामाचे आज कौतुक होऊ शकतं. त्यामुळे परिश्रमांचे सार्थक झाल्याचे समाधान लाभेल.

वृश्चिक : यात्रा घडतील

आज तुम्हाला धार्मिक यात्रा घडण्याचे योग आहेत. त्यामुळे आत्मिक समाधान तुम्हाला आज लाभू शकणार आहे. नकारात्मक विचारापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस अनुकूल आहे. इच्छिलेली सर्व कामे वेळेवर होतील. त्यामुळे आजच्या दिवसाचा सदुपयोग घेऊन अपूर्ण असलेली सर्व कामे आजच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवा.

धनु : धार्मिक कार्यात आनंद

आज तुमच्यासाठी आनंदासह मनशांती मिळवि­ण्याचा दिवस आहे. कारण आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात. जीवन जगत असतांना सुखाचा गणाकार व दु:खांचा भागाकार करायचा असतो, हे लक्षात घ्या. एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यानधारणा करा. लाभलेला आनंद द्विगुणीत कसा करता येईल, याचा प्रयत्न करा.

मकर : आनंद द्विगुणीत करा

एखाद्या गोष्टीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मन एकाग्र राहणे गरजेचे आहे. त्यासाठी ध्यानधारणा करण्यावर भर द्या. टिका व तक्रारी या वेळ व्यर्थ लाघवत बसू नका. जे पदरी पडले आहे, ते पवित्र मानुन त्याचा स्विकार करा. आज आळस अंगास घुसल्याने जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न कराल.

एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात, जाणून घ्या

Read More From भविष्य