मेष : शत्रू वरचढ होतील
आज तुमच्यासाठी अत्यंत कठिण दिवस असेल. कारण आज तुमचे शत्रु वरचढ होऊ शकतात. दोघांचे भांडण तिस-याला लाभ याचाही अनुभव आज मिळू शकतो. त्यामुळे आपल्या कामावर लक्ष ठेवा. कुणाशीही बोलतांना आज अचुक संवाद साधा. बोलण्याने कुणी दुखवावणार नाही, याची काळजी घ्या. आज तुम्ही कार्यामध्ये व्यस्त राहणार आहात.
कुंभ : संकट दूर होईल
आज तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण दिवस आहे. कारण आज तुमच्यावरील संकट दूर होणार असून त्यातून तुम्ही सुखरुपपणे बाहेर पडणार आहात. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी याची अनुभूती तुम्हाला मिळणार आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी विचार विचार करा. आज तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात.
मीन : वास्तूवर खर्च
आज तुम्ही आनंदाने वास्तुवर खर्च करणार आहात. घरात नवीन गोष्ट येणार असल्याने आनंदाचे वातावरण राहिल. कुठल्या गोष्टीचा तणाव जाणवत असेल तर आज मनोरंजनासाठी वेळ अवश्य काढा. तणाव दूर होईल. अंगात घुसलेला आळस झटकून आज तुम्हाला कामाला लागावे लागणार आहे. नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.
वृषभ : शत्रूपासून सावधान
अनामिक शत्रू किंवा संकटांपासून सावध राहण्याचा सल्ला आज तुम्हाला देण्यात येत आहे. बेसावध किंवा गाफील राहू नका. नुकसान होऊ शकतं. कोणताही कार्य करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. आज तुम्हाला अनोळखी लोकांच्या विरोधाचाही सामना करावा लागू शकतो. आज तुमच्यासाठी कठिण दिवस आहे.
मिथुन : प्रवास सुखाचा
आज तुमचे प्रवास करण्याचे योग असून तो सुखाचा होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा आनंद तुम्हाला घेता येईल. वाईट आठवणी डोके वर काढण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे मन विचलित होऊ शकतं. म्हणून झालं गेलं गंगेला मिळालं ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. व्यस्त अशा दिनचर्येतून आज वेळ मिळत आहे, मनसोक्त जगून घ्या.
कर्क : अध्यात्मिक आनंद
आज तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण दिवस आहे. कारण आज तुम्ही अध्यात्मिक आनंदात रममान होणार आहात. त्यातुन तुम्हाला मनशांतीही मिळू शकते. भविष्यात मोठा फायदा होणार असेल तर आज झालेल्या लहान नुकसानाला गुंतवणूक समजा. चार दिवस सासुचे आणि चार दिवस सुनेचेही असतात. कुणाला फुकटचा सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका.
सिंह : योग्य संवाद साधा
आज तुम्हाला तोलून मोलून बोलण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कुणाशीही बोलातांना अचुक संवाद साधा. कुणाशीही वागतांना संयम आणि सामंजस्याने वागण्याचा प्रयत्न करा. तडका फडकी किंवा भावनेच्या आहारी जाऊन वागु नका. स्वत:वर नियंत्रण ठेवा. खेळाडूंना आज अपयशाचा सामना करावा लागू शकतो.
कन्या : पश्चाताप नको
अब पछताये क्या होत जब चिडिया चुग गई खेत. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आज आपल्याकडून कोणतीही चुक होणार नाही, याची काळजी तुम्हाला आज घ्यावी लागणार आहे. वायफळ खर्चाला आवर घाला. तुमचे आर्थिक गणिते बिघडू शकतात. आज तुम्ही नवीन वस्तुची खरेदी करणार आहात. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहिल.
तूळ : बेशिस्तपणा नको
एक ना धड भाराभर चिंध्या अशी आपली अवस्था होऊ नये म्हणून आज थोडाही बेशिस्तपणा नको. जे काम करत आहात ते शिस्तीत व व्यवस्थित करा. पळ काढण्यापेक्षा परिस्थितीशी सामना करायला शिका. धाडस करायला शिका. घरात मंगलकार्य जुळून येण्याचे योग आहेत. त्यामुळे घरात आनंदासह पाहुण्यांचीही रेलचेल असेल.
वृश्चिक : आत्मविश्वास कमी
आज तुमचा आत्मविश्वास कमी राहिल. त्यामुळे आज कुठलेच धाडस नको. महत्त्वाच्या विषयांवर आज निर्णय घेऊ नका. जेही कराल ते विचारपूर्वकच करा. आज कुठल्याच वादविवादात पडू नका. ते तुमच्या हिताचे राहणार नाही. घरामध्ये सुसंवाद वाढवून नाती बळकट करण्याकडे लक्ष द्या. त्यात आज तुम्हाला यश मिळू शकतं.
धनु : लेखन कार्यात यश
जे न देखे रवि ते देखे कवी. आज लेखक व कवी मंडळींसाठी अत्यंत लाभदायक दिवस आहे. त्यांना आज यश मिळणार असून सोबत लौकिकही वाढणार आहे. महत्वपूर्ण प्रश्नाचे निर्णय आज नको. आज कुठलेच धाडसही नको. कोणालाही टोचुन बोलू नका. त्याने संबंध खराब होण्याच्या व्यतीरीक्त काहीच साध्य होणार नाही.
मकर : पर्यायी साधन
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एका साधनावर अवलंबून राहू नका. निराशा हाती येऊ शकते. म्हणून पर्याय साधने तयार करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या संकटातून सुखरुपपणे बाहेर पडल्यामुळे परमे·ाराची आपल्यावर कृपा असल्याची भावना मनात दाटून येईल. सायंकाळपर्यंत एखादा अविस्मरणीय क्षण आज प्राप्त होऊ शकतो.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje