भविष्य

8 जून 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीचे योग

Rama Shukla  |  Jun 1, 2019
8 जून 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीचे योग

मेष – धावपळीने त्रस्त व्हाल

आज तुम्ही उगीचच्या धावपळीने त्रस्त व्हाल. शारीरिक थकवा आणि ताण जाणवेल. दुसऱ्यांच्या सहकार्यामुळे यश मिळेल. रखडेलेली कामं पूर्ण होतील. राजकारणात सहयोग मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनवृद्धी होईल.

कुंभ – कुटुंबामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो

आज कुटुंबामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. कुटुंबामध्ये तुमच्या कार्याला आज विरोध होईल. कोणताही निर्णय घेणं आज कठीण होईल. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कार्यालयात अधिकाऱ्यांशी पटणार नाही. धार्मिक कार्यात मन लागून राहील.

मीन – आईच्या आरोग्यामुळे चिंतीत राहाल

आईची तब्बेत बिघडल्यामुळे तणावाखाली राहाल. स्वभावामध्ये चिडचिडेपणा येऊ शकतो. आत्मविश्वासात कमतरता जाणवू शकते. घरातील खर्च वाढतील. विरोधक त्रस्त करतील. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. वाहन प्रयोगात सावधानी बाळगा.

वृषभ – धनप्राप्तीचा योग आहे

आईकडून धनप्राप्तीचे योग आहे. संततीकडून सुख मिळेल आणि चांगल्या बातम्या मिळतील. व्यावसायिक विस्तारासाठी तुम्हाला प्रवास करता येईल. कार्यालयात पदोन्नती होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल.

मिथुन – अनेक त्रासातून मुक्ती मिळेल

भावाबहिणीच्या सहकार्याने अनेक त्रासातून मुक्ती मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये रोमान्स टिकून राहील. आपल्या परिवाराला अधिक प्राथमिकता देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रात नवे सहयोगी मिळतील. आर्थिक फायदा होईल.

कर्क – नोकरीमध्ये त्रास होऊ शकतो

व्यवसायात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये त्रास होऊ शकतो. फिरण्याचा कार्यक्रम आता टाळा. कौटुंबिक नात्यामध्ये मधुरता येईल. खेळामध्ये सहभागी व्हा. जुन्या मित्रांबरोबर भेट होऊ शकेल.

सिंह – नव्या भेटीगाठी होतील

व्यावसायिक धावपळीचा फायदा होईल. नव्या भेटीगाठी होतील. कार्यक्षेत्रामध्ये उन्नती होईल. आर्थिक बाबतीत सुखसमृद्धीचा योग आहे. कौटुंबिक मित्रांबरोबर बाहेर जाण्याची योजना बनेल. रखडलेलं धन तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.

कन्या – शैक्षणिक समस्यांनी व्हाल त्रस्त

रोज शैक्षणिक समस्यांनी त्रस्त व्हाल. आज कोणतं नवं काम सुरू करू नका. तुम्हाला जे हवं ते मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. कार्यालयात नको त्या गोष्टीत पडू नका. विरोधकांपासून सावधान राहा. मुलांबरोबर चांगला वेळ घालवा.

तूळ – आरोग्याला त्रास होण्याची शक्यता आहे

दिवसभर आरोग्याला त्रास होत राहील. सावधानी बाळगा. जोडीदाराबरोबर भांडण होण्याची शक्यता आहे. वाद-विवादापासून दूर राहा.  आत्मविश्वास कमी असल्यामुळे निर्णय घेण्यात मागे राहाल. धार्मिक कार्यात विश्वास वाढेल. रखडलेली कामं मार्गी लागतील. धनलाभ होईल.

वृश्चिक – चांगल्या बातमीमुळे मनोबल वाढेल

संततीकडून  चांगल्या वार्ता समजल्यामुळे तुमचं मनोबल वाढेल. आई – वडिलांचं सान्निध्य आणि सहकार्य मिळेल. जोडीदाराबरोबर घनिष्ठता वाढेल. भावनात्मकरित्या अधिक चांगलं वाटेल. रखडेलेली कामं मार्गी लागतील. कार्यालयात अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल.

धनु – नोकरीचा शोध पूर्ण होईल

नोकरीचा शोध पूर्ण होईल. तुमचं म्हणणं स्पष्टपणे मांडा, सर्वांचं सहकार्य मिळेल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात यशप्राप्ती होईल. आवडीचं काम मिळाल्यामुळे उत्साह वाढेल. व्यावसायिक विस्तार वाढण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील.

मकर – आज कोणालाही उधार देऊ नका

कोणालाही आज उधार दिल्यास, परत मिळणं कठीण आहे. व्यावसायिक योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागू शकते. अधिक मेहनत करून लाभ मात्र कमी मिळेल. देण्याघेण्याच्या बाबतीत धोका होण्याची शक्यता आहे. आवश्यक कामामध्ये आळस झटका. धार्मिक कार्यात मन लागून राहील.

Read More From भविष्य