भविष्य

9 जानेवारी 2019 चं राशीफळ

Jyotish Bhaskar  |  Jan 8, 2019
9 जानेवारी 2019 चं राशीफळ

मेष – प्रयत्नांची दिशा बदला

परिश्रमाला भाग्याची जोड असेल तरच यश प्राप्त होत असते. मात्र प्रत्येक वेळेस भाग्यालाच दोष देण्यात काही अर्थ नाही. कारण एक तर आपण कुठेतरी प्रयत्नांमध्ये कमी पडतो किंवा आपल्या प्रयत्नांची दिशा चुकीची असते. असे असल्यास प्रयत्नांची दिशा आपण बदलली पाहिजे. हे कर­ण्याची आज आपली इच्छा होईल. मात्र पूर्ण खात्री करुनच ते करायचे आहे. नाही तर उगाच नुकसान व्हायचे. जोडीदाराशी आज मनमुटाव होईल. अवास्तव खर्च वाढण्याचे योग आहेत. त्यामुळे खर्चावर लक्ष ठेवावे.

कुंभ – मानसिक शांती लाभेल

आर्थिक लाभ प्रत्येकालाच हवा असतो. मात्र मानसिक शांती लाभली तर त्याचा आनंद आर्थिक लाभापेक्षा मोठा असतो. याची अनुभूती आज तुम्हाला आज मिळवून देणारा दिवस आहे. कारण आज तुम्हाला मानसिक शांती लाभणार आहे. सोबतच ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढून संबंध सुदृढ होऊ शकतात. त्यामुळे आनंदात आणखीच भर पडू शकते. स्त्री पक्षाकडूनही सहयोग मिळेल. महत्त्वाचं म्हणजे आज तुमचे शत्रू पराभूत होणार आहेत. त्यामुळे अति आनंद व मानसिक शांती यांचा परिपूर्ण लाभ तुम्ही आज घेणार आहेत.

मीन – कामात व्यस्ततेचा दिवस

कधी कधी मनाविरुद्ध गोष्टींमधून लक्ष दूर करण्यासाठी कामात व्यस्त राहणे हा खूप चांगला पर्याय असतो. रिकामा वेळ राहिल्यास नको त्या गोष्टींमध्ये अडकण्याची भिती असते. आज तुम्ही कामात व्यस्त असणंच तुमच्यासाठी हितकारक असणार आहे. कारण आज इतर गोष्टी तुम्हाला अनुकूल नाहीत. भरीस भर म्हणजे आज मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. त्यामुळे आज त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य राहिल. जेष्ठ नागरीकांनी आज आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांना आज ताप येण्याची शक्यता आहे. शक्यतोवर बाहेरी पदार्थ खाण्याचे टाळावेत. जंक फूड तर नकोच.

वृषभ – आज प्रवास टाळा

आज आपले प्रवासाचे योग आहेत. मात्र त्यात नुकसान होण्याचाही धोका  आहे आहेत. प्रवास हा काहीतरी मिळविण्यासाठी, इच्छित ध्येय प्राप्त करण्यासाठी केला जात असतो. काहीच नाही तर रोजच्या दिनचर्येतून बाहेर तरी निघता येतं. मात्र त्यात जर नुकसान होणार असेल तर तो टाळलेलाच बरा. काही अत्यावश्यक कारणांनी करावाच लागला तर आपल्याला फार सतर्क राहावे लागणार आहे. आज कोणतेही धाडस करायला नको. कलाकारांना मात्र आज यश मिळणार आहे. आज कलेला वाव मिळून लौकिकात भर पडू शकते. आनंदाने आज वास्तुवरही खर्च कराल. सरकारी कर्मचारी आज गोंधळात पडतील. त्यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा.

मिथुन – व्यायाम करा

व्यायामाचे महत्त्व सर्वश्रृत आहे. मात्र तरीही आपण आळस करतो. व्यायामाच्या वेळा पाळत नाहीत. आपल्याला आज मानसिक अशांतीसोबत  शाररीक थकवाही जाणवणार आहे. त्यामुळे आपण आज वेळेवर व्यायाम करायला हवा. लेखक मंडळींना आज यश प्राप्त होईल. लेखन कलेला वाव मिळून लौकिकात भर पडेल. मित्र आनंद देतील. त्यांच्यासोबत आज एखाद्या गोष्टीचे नियोजन कराल. आज तुमचे प्रवासाचेही योग आहे. विशेष म्हणजे प्रवास जोडीदारासोबत असेल. त्यामुळे घरात आनंदी आनंद पसरलेला असेल.

कर्क – परिश्रमाला पर्याय नाही

यश मिळवायचे असेल तर परिश्रमाला पर्याय नाही. कोणतंही यश सहजासहजी मिळत नाही. ज्या कामात अनंत अडचणी येतात ते काम कर­ण्याची मजाही काही वेगळीच असते. ही सतत्या लक्षात घेण्याचा आजचा आपला दिवस आहे. आज आपल्याला यश प्राप्त करायचे असेल तर परिश्रमाला दुसरा पर्यायच नाही. त्यामुळे आपले शत्रुही आज पराभूत होऊ शकतात. म्हणजे आनंद द्विगुणीत होण्याचे योग आहेत. त्यामुळे परिश्रमांमध्ये आज कमी पडू नका. आपल्यावर आज जोडीदाराचाही प्रभाव राहिल. जोडीदाराच्या मनाप्रमाणे तुम्ही आज वागणार आहात. आकस्मिक आनंदही आज प्राप्त होऊ शकतो. त्याचा स्विकार करण्यासाठी सज्ज राहा.

सिंह – सहनशिलतेतून उत्साह वाढवा

सहनशिलता व उत्साह या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र सहनशिलता आनंदाने स्विकारल्यास त्यातून कामाचा उत्साह वाढविता येऊ शकतो. याचा अनुभव आज आपल्याला येऊ शकतो. घरात जर शितयुक्त सुरु असेल तर ते मिटविण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. घरात अशांती पसरली तर आधी तिला बाहेर काढा. घरात सर्वांशी योग्य सुसंवाद ठेवा. तेथेही तुम्हाला सहनशिलता दाखवावी लागेल, जी तुमचा उत्साहही वाढवेल. जोडीदाराशी मनमुटाव होईल. दिवसभर आत्मवि•ाासाने परिपूर्ण राहाल.

कन्या – काम पूर्ण होईल

अधिकारी वर्गाच्या हातात एखादं काम अडकून पडणं यामुळे तुम्ही वैतागलेला असाल तर आज प्रयत्न करायला चुकू नका. आज ते काम पूर्ण होण्याचे योग आहेत. ज्याचा अति आनंद तुम्हाला मिळू शकतो. संधीवात असणाऱ्यांसाठी आज चिंतेचा दिवस आहे. त्यांना आपल्या आरोग्याची आज काळजी घ्यावी लागणार आहे. प्रेमी मंडळींसाठी आजचा दिवस आनंददायी असेल. कारण आज प्रेयसीशी भेट होऊ शकते. मुलं मात्र आज तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाहीत. त्यामुळे त्रास करुन न घेता आज थोडासा कानाडोळा करणे तुमच्या हिताचे राहिल.

तूळ – कल्पकतेला वाव मिळेल

कल्पकता वापरुन केलेली कुठलीही नाविन्यपूर्ण गोष्ट ही सर्वांच्या पसंतीस उतरत असते. नाविन्य मनाला हवंहवंसंही वाटतं. म्हणून आपल्या कल्पक व सर्जनशीलतेला आज पुरेसा वाव आहे. त्यामुळे आज नाविन्याचे प्रयोग करायला चुकू नका. त्यातून तुमचे आत्मबल वाढीस लागणार आहे. मात्र काम पूर्ण होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे निराश होऊ नका. एखादा आकस्मित आनंदही मिळू शकतो. त्यामुळे मनाला प्रसन्नता जाणवेल. विद्याथ्र्यांचे संपूर्ण लक्ष अभ्यासात राहिल. थोडक्यात आज आपल्या कल्पकतेला, सर्जनशिलतेला पुरेसा वाव आहे. मात्र एखाद्या कामात यश सहजा सहजी मिळणार नाही. त्याला वेळ लागेल.

वृश्चिक – सामंजस्यपणा दाखवाल

समजुतदार व्यक्ती सर्वांना प्रिय असतो. अशा व्यक्तींकडे लोकांचा बघण्याचा एक दृष्टीकोनही निराळा असतो. लोक हक्काने अशा व्यक्तींकडे आपल्या समस्या सांगत असतात. आज तुम्ही सामंजस्य दाखविणार आहात. आज तुमचे ओळखींच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढण्याचे योग आहेत. त्यांच्याशी योग्य पद्धतीने जुळवून घेतल्यास आपल्या मानसन्मातही वाढ होऊ शकते. आज अपचनाचा त्रास होऊ शकतो. म्हणून आज खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासह आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी. आपल्यावर आज जोडीदाराचा प्रभाव राहिल. जोडीदाराच्या मनाप्रमाणे आज तुम्ही वागणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल.

धनु – कामाला वेळ लागेल

भाग्य साथ देत नसेल तर परिश्रम, प्रयत्नांची पराकाष्टा करुनही अपेक्षित लाभ मिळत नाही किंवा काम वेळेवर पूर्ण होत नाही. याची अनुभूती देणारा आजचा आपला दिवस आहे. आज कामाला जास्तीचा वेळ लागू शकतो. म्हणून आत्मबल कमी होऊ देऊ नका. कारण आज अनोळखी लोक तुमचा विरोध करु शकतात. आज नवीन ओळखीही होतील. सकारात्मकता अंगी बाळगुण आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जा. भविष्यात त्याचा तुम्हाला फायदाच होऊ शकतो. सरकारी कर्मचा-यांची आज थोडं सावध राहायला हवं. कोणताही निर्णय घेतांना आज थोडा जास्त विचार करायला हवा.

मकर – चिकाटी कायम ठेवा

अपेक्षित यशाचा आनंद मिळविण्यासाठी चिकाटीने प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवायला हवे. आपल्याला हे समजविणारा आजचा दिवस आहे. आपले एखादे काम अपूर्ण असेल तर निराश होऊन प्रयत्न सोडू नका. चिकाटी कायम ठेवून प्रयत्न करीत राहा. यश नक्कीच मिळेल. केलेले प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाहीत. तन व मनाच्या सुदृढतेसाठी वेळोवेळी व्यायाम करण्यावर भर द्या. म्हणजे प्रसन्नता व उत्साह टिकून राहिल. भुतकाळात घडून गेलेली एखादी आनंददायी घटना पुन्हा आनंद प्रदान करण्याचे योग आहेत. आज वास्तुवरही खर्च होऊ शकतो. जो तुम्हाला चुकणार नाही. कधी तरी ते करावंच लागणार होतं, म्हणून आज हे काम उरकून टाका.

लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र

Read More From भविष्य