भविष्य

12 डिसेंबर 2018, आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घेण्यासाठी हे वाचा

Sneha Ranjankar  |  Dec 11, 2018
12 डिसेंबर 2018, आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घेण्यासाठी  हे वाचा

मेष- तब्येत सांभाळा

तब्येत सांभाळा. जास्त दगदगीमुळे शाररिक आणि मानसिक थकवा येवू शकतो. तुमच्या जोडीदारालाही शारिरिक त्रास संभावतो त्यामुळे जोडीदाराच्या त्रासाकडे दुर्लक्ष करु नका. आर्थिक अडचणी येऊ शकतात

वृषभ- आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे

 तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.  पाकिट चोरीला जाऊ शकतं. महत्त्वाचं काम न झाल्याने ताण येईल. कोणालाही उधार देऊ नका. आर्थिक संकट येईल. कुंटुंबाच्या सुख सुविधांसाठी मनावर दडपण येईल.

मिथुन- कुटुंबात आनंद नांदेल

तब्येती संबंधीतली काळजी मिटेल. खाण्या-पिण्यात बेजबाबदार राहू नका. कुठल्यातरी खास बाबतीत मित्र आणि आप्तेष्टांचा पाठिंबा मिळेल. कुटुंबात आनंद नांदेल. जोडीदारासोबतही छान वेळ जाईल.

 कर्क- कामात यशस्वी व्हाल

आज अडकलेले सगळे व्यवहार पुर्ण होतील, त्यामुळे कामात यशस्वी व्हाल. नवे कॉंट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. बिझनेस किंवा नोकरीमध्ये अधिकाऱ्यांशी ताळमेळ साधाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. नोकरीसंबंधीतली सगळी स्वप्न पुर्ण होतील.

सिंह- खास व्यक्तीशी गाठ पडेल

आज पहिल्या प्रेमात डुंबून जालं. कुठल्यातरी खास व्यक्तीशी गाठ पडेल. सासरच्यांकडून फायदा मिळेल. जोडीदाराशी दृढ नातं निर्माण होईल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. राजकारण्यांचा पाठिंबा मिळू शकतो. बिझनेसमध्ये नव्या ओळखी होतील.

कुंभ- वाद-विवाद टाळा

व्यर्थ वाद-विवाद टाळा. ऑफीसमध्ये अडचणी येऊ शकतात. आत्मविश्वास कमी होईल. लोकांसोबत व्यवहारिक संबंध जोडण्याआधी पारखून घ्या. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांसाठी जास्त मेहनक घ्यावी लागेल. बेरोजगारांना भावनिक पाठिंब्याची गरज भासेल.

कन्या- संधी चालून येईल

बेरोजगारांना नव्या संधी चालून येतील. शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. ऑफीसमध्ये वरिष्ठांच्या मदतीने अडकलेले प्रोजेक्ट पुर्ण होईल. उन्नती, सन्मान आणि गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.

तुळ- यश मिळेल

जवळच्या मित्राच्या मदतीने फायद्याचे प्रोजेक्ट मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. प्रॉपर्टी संबंधित विवादामध्ये यश मिळेल. महागडे गिफ्ट मिळण्याचा योग. बिझनेस किंवा नोकरीमध्ये तुमच्या अनुभवाचा उपयोग होईल.

वृश्चिक- जोडीदाराशी दृढ नातं निर्माण होईल

तब्येतीच्या तक्रारींमध्ये दुर्लक्ष करु नका. ज्यांना तब्येतीच्या तक्रारी आहे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल. तुमच्या मेहनतीचे कौतूक होईल. जोडीदाराशी दृढ नातं निर्माण होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

धनु- रोमॅंटिक दिवस जाईल

वैवाहिक संबंधांमध्ये जवळकी वाढेल. रोमॅंटिक दिवस जाईल. कुटुंबात मुलांकडून गोड बातमी मिळेल. आई-वडील आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल. कुटुंबात आनंद नांदेल. मित्रांसोबत लांब प्रवासाचे बेत ठरतील.  

 मकर- नुकसान होऊ शकतं

आज तुम्हाला सांभाळून रहावं लागेल कारण तुमची फसवणूक होऊ शकते. वाद- विवादामुळे चिडचिड वाढेल. आर्थिक नुकसान होऊ शकतं. नोकरीमध्ये कुठल्यातरी वरिष्ठांच्या वागण्यामुळे तणाव वाढेल. अनोळकी व्यक्तींसोबत व्यवहार करु नका, हव्यास टाळा.

मीन- कौटुंबिक समस्या निर्माण होतील

तुमच्या आप्तेष्टांकडून मदत मिळणार नाही. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. नात्यांमध्ये तणाव निर्माण होईल. घरातल्या वाद विवादात पडू नका. मानसिक ताण वाढेल.

 

 

 

 

 

Read More From भविष्य