मनोरंजन

‘हॉट आणि सिझलिंग’ बिपाशाने केले होते सहा अभिनेत्यांना डेट

Dipali Naphade  |  Jan 6, 2019
‘हॉट आणि सिझलिंग’ बिपाशाने केले होते सहा अभिनेत्यांना डेट

‘जिस्म,’ ‘राज’, ‘ओमकारा’, ‘अजनबी’ यासारख्या चित्रपटातून हॉट आणि सिझलिंग अवतारातून प्रेक्षकांवर भुरळ घालणारी अभिनेत्री बिपाशा बासूचं नावच तिच्या चाहत्यांसाठी काफी आहे. आजही बिपाशाचे अनेक चाहते आहेत. बिपाशा बासू आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशा ही बॉलीवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र असं असलं तरीही अभिनय, सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचं अफलातून मिश्रण बिपाशा बासू आहे असं म्हटलं जातं. बिपाशा चित्रपटात येण्यापूर्वी एक प्रसिद्ध मॉडेल होती. तुम्हाला माहीत आहे का? बिपाशाने तीन मोठ्या चित्रपटांना नकार दिला होता. बिपाशाच्या वाढदिवसानिमित्ती तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया –


करण सिंग ग्रोव्हरशी लग्नापूर्वी सहा अभिनेत्यांना केले डेट

बिपाशा बासूने अभिनेता करण सिंग ग्रोव्हर याच्याशी तीन वर्षापूर्वी विवाह केला. मात्र तुम्हाला माहीत आहे का? बिपाशाने त्यापूर्वी सहा अभिनेत्यांना डेट केले आहे. सुपर आणि हॉट मॉडेल मिलिंद सोमण हे बिपाशाचं पहिलं प्रेम होतं असं म्हटलं जातं. मॉडेलिंगच्या दिवसात हे एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले. मात्र जास्त काळ या दोघांचं अफेअर टिकू शकलं नाही. ‘राज’ चित्रपटाच्या सेटवर डिनो आणि बिपाशामध्ये जवळीक निर्माण झाली आणि त्यानंतर ते एकमेकांबरोबर जास्त दिसू लागले. मात्र काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. डिनोनंतर जॉन अब्राहम बिपाशाच्या आयुष्यात आला. बिपाशा आणि जॉनचं प्रेम नऊ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलं. दोघेही एकत्र राहात होते. मात्र अचानक दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं कारण कधीही चाहत्यांसमोर आलं नाही. ‘बाहुबली’फेम राणा दुगुबट्टी याच्याबरोबरही बिपाशाचं नाव जोडलं गेलं. मात्र त्याचं प्रेम जास्त काळ टिकू शकलं नाही. सैफ अली खानबरोबरदेखील बिपाशाचं नाव जोडलं गेलं. मात्र अचानक सैफने करीनाशी लग्न केलं. तर हरमन हा बिपाशाच्या आयुष्यातील सहावा अभिनेता होता. मात्र त्यांचं नातंही जास्त काळ टिकू शकलं नाही. सरतेशेवटी करण सिंग ग्रोव्हरबरोबर बिपाशाने लग्न केलं.

तीन मोठ्या चित्रपटांना दिला होता नकार

तुम्हाला या गोष्टीची कल्पना आहे का? बिपाशा ही चित्रपटामध्ये येण्यापूर्वी प्रसिद्ध आणि सुपरमॉडेल होती. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने तीन मोठ्या चित्रपटांना नकार दिला होता. मात्र अब्बास मस्तानच्या ‘अजनबी’मधून तिने अगदी धमाकेदार पदार्पण केलं. सुपरमॉडेल स्पर्धेमध्ये बिपाशाने भाग घेतला होता. त्या स्पर्धेचे परीक्षक अभिनेता विनोद खन्ना होते. त्यावेळी आपला मुलगा अक्षय खन्नासह ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटासाटी बिपाशा बासूच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यावेळी बिपाशाने लहान असल्यामुळे चित्रपटामध्ये येण्यास नकार दिला होता आणि त्यावेळी ती भूमिका अंजला झवेरी या अभिनेत्रीला मिळाली होती.

अभिषेक बच्चनबरोबर ‘आखिरी मुगल’

यानंतर बिपाशा बासूला अभिषेक बच्चनबरोबर ‘आखिरी मुगल’ हा चित्रपट करण्यासाठी जया बच्चन यांनी विचारलं आणि त्यासाठी बिपाशा तयारदेखील झाली होती. मात्र जे. पी. दत्ताचा हा चित्रपट काही कारणाने बनला नाही आणि त्यानंतर या कथेमध्ये बदल करत जे. पी. दत्ता यांनी करिना कपूरबरोबर रिफ्यूजी हा चित्रपट बनवत अभिषेक बच्चनला लाँच केले. वास्तविक या चित्रपटात सुनील शेट्टीबरोबर बिपाशा बासूला कास्ट करण्यात आलं होतं, पण बिपाशाने यावेळीदेखील नकार दिला. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजनबी’ चित्रटातून अक्षयकुमारबरोबर बॉलीवूडमध्ये बिपाशाने पदार्पण केलं. अब्बास – मस्तान दिग्दर्शित या चित्रपटामधून बिपाशाने धमाकेदार पदार्पण करत आपलं स्थान पक्क केलं. मात्र बऱ्याच समीक्षकांनी बिपाशाला नाकारलं होतं. त्याचवर्षी तिला फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता.

‘राज’ने गाठलं यशाचं शिखर

बिपाशाला लगेचच पुढच्या वर्षी विक्रम भट दिग्दर्शित ‘राज’ चित्रपटात काम मिळालं आणि या चित्रपटानं तिला यशाचं शिखर गाठून दिलं. हा चित्रपट हॉरर होता आणि बॉलीवूडमध्ये हॉरर क्वीन म्हणूनही बिपाशाला ओळख मिळाली. कारण अशा स्वरुपाचे बरेच चित्रपट नंतर बिपाशाने केले. बिपाशा बऱ्याचदा उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नॉमिनेट झाली. बिपाशा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र लवकरच ती कमबॅक करेल अशी अपेक्षा आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From मनोरंजन