Fitness

जाणून घ्या हाडांवर कसा होतो गॅझेट्सचा दुष्परिणाम, तज्ज्ञांचे मत

Dipali Naphade  |  Jul 29, 2021
जाणून घ्या हाडांवर कसा होतो गॅझेट्सचा दुष्परिणाम, तज्ज्ञांचे मत

टेक्नॉलॉजी आणि अनेक अॅपच्या प्रगतीमुळे, महामारीमुळे आणि घरूनच शाळा आणि घरूनच काम चालत असल्याने अशी बरीच मुलं आणि तरूण व्यावसायिकांना हल्ली डॉक्टरांकडे गॅझेट्सच्या अतिवापरामुळे डॉक्टरांकडे जावं लागतं आहे. सतत घरात काम आणि सतत लॅपटॉप आणि मोबाईलमुळे डोळ्यांची हालत तर झालीच आहे. पण शरीरातील हाडांवरही त्याचा अत्यंत वाईट परिणाम होत आहे. मान खाली वाकवून तासनतास मोबाईल किंवा आयपॅडच्या प्रदीर्घ वापरामुळे, मान, खांदा किंवा मागील बाजूला वेदना होते. कालांतराने, यामुळे मसल फटिग, लिगामेंट्स आणि स्पाईनमध्ये बदल होऊ शकतात व  तीव्र वेदना, खराब पोष्चर किंवा हम्पबॅक होऊ शकते. याचे जर वेळीच उपचार नाही केले तर यामुळे डीजेनरेशन किंवा स्पोंडीलोसिसदेखील होऊ शकते. याचसंदर्भात आम्ही डॉ. अनुप खत्री, सिनियर कंसल्टंट ऑर्थोपेडिक, ग्लोबल हॉस्पिटल, परळ, मुंबई यांच्याशी याविषयी चर्चा केली. त्यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी खास तुमच्यासाठी. 

हाडांवर होणारा परिणाम 

मसल फटिग आणि वेदनांशिवाय, बराच तास एकाच ठिकाणी आणि एकाच पोझिशनमध्ये बसल्यामुळे मसल्स, सामान्यत: हॅमस्ट्रिंग्स किंवा काफ मसलचा कडकपणा किंवा कॉन्ट्रॅक्टचर देखील होतो. यामुळे मांडी, काफ किंवा टाचांमध्ये वेदना होऊ शकतात. यामुळे शरारीतील बऱ्याच भागांना त्रास होतो. दीर्घकाळ बसणे किंवा बसण्यासाठी योग्य बॅक सपोर्ट किंवा पोष्चर न वापरणे यामुळे लो बॅक पेन, मांडी किंवा गुडघेदुखी होऊ शकते. यामुळे नर्व्स वर दबाव देखील येतो आणि पायांमध्ये मुंग्या येतात व पाय सुन्न ही होतात.

बोटांनाही होतो त्रास 

Shutterstock

सतत टायपिंगमुळे लोकांना ट्रिगर फिंगर होते ज्यामुळे बोटांच्या टेंडन्स किंवा मसल्समध्ये जळजळ होते. हे सामान्यतः थंब आणि इंडेक्स फिंगरमध्ये पाहिले जाते. यामध्ये सुरुवातीला फक्त वेदना होतात, परंतु जर ते चालूच राहिले तर बोटांना सरळ करणे कठीण होऊ शकते आणि बोटं लॉक ही होऊ शकतात. कीबोर्डच्या वापरामुळे रिस्टवर सतत दबाव येत असल्याने रिस्टमधील नर्व्स वर दबाव येऊ शकतो आणि कार्पल टनल सिंड्रोम होऊ शकतो, ज्यामध्ये बोटांमध्ये मुंग्या येते, बोटं सुन्न ही होतात आणि जर यावर उपचार केले नाही तर अशक्तपणा ही येऊ शकतो.

विटामिन डी च्या कमतरतेमुळे होतो त्रास 

आऊटडोअर ॲक्टिविटीज अर्थात बाहेर जाणं आता कमी झाले असल्याने सूर्याच्या प्रकाशाचादेखील अभाव आहे. त्यामुळे व्हिटामिन डी 3 ची कमतरता भासते आणि याबरोबर कमी शारीरिक व्यायाममुळे ऑस्टिओपेनिया किंवा ऑस्टिओपोरोसिस होतो.

अधिक वाचा – ड जीवनसत्व, मानसिक आरोग्य आणि उच्च रक्तदाब यांचा परस्पर संबंध काय, तज्ज्ञांचे मत

लठ्ठपणाचा त्रास 

Shutterstock

या व्यतिरिक्त, दीर्घकाळ बसण्यामुळे लठ्ठपणा होऊ शकतो आणि सांध्यावरील भार वाढू शकतो आणि गुडघे किंवा पाय किंवा हिप्स दुखू शकतात आणि यामुळे आर्थ्रायटिसदेखील होऊ शकतो. यातील बहुतेक प्रतिकूल परिणाम योग्य प्रकारे बसणे आणि गॅझेट्सच्या उपयोगापासून नियमित ब्रेक, नियमित व्यायाम, बाहेर चालणे किंवा खेळांद्वारे रोखले जाऊ शकते.

वरीलपैकी दिलेल्या कोणत्याही गोष्टींचा अनुभवत होत असल्यास सोपे औषध किंवा ब्रेसेस किंवा व्यायाम द्वारे कोणत्याही प्रकारचा वाढ थांबविण्यात लवकरात लवकर घेतलेला सल्ला मदत करू शकतो. पण तुम्ही जास्तीत जास्त वेळा यातून वेळ काढून उठणे आणि काळजी घेणे गरजेचे आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Fitness