Mental Health

ताणतणावाचा तुमच्या दातांच्या आरोग्यावर होतो परिणाम, वेळीच घ्या काळजी

Trupti Paradkar  |  Mar 7, 2022
ताणतणावाचा तुमच्या दातांच्या आरोग्यावर होतो परिणाम, वेळीच घ्या काळजी

दात आणि हिरड्या मजबूत असतील तर तुमचे पोट आणि आरोग्य निरोगी राहते. वास्तविक दातांच्या समस्या निर्माण होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. अगदी अन्न चावण्याच्या चुकीच्या सवयी, अस्वच्छता, आजारपण यासोबतच मानसिक आजारही तुमच्या दातांचे आरोग्य बिघडवू शकतात. काही संशोधनात असं आढळून आलं आहे की दातदुखीमागे तुमच्या मनातील चिंता-काळजी, ताणतणाव, नैराश्य महत्त्वाचे कारण असतात. यासाठी जाणून घ्या मानसिक  आजाराचा दातांवर कसा परिणाम होतो. 

मानसिक आरोग्य आणि दातांच्या समस्या

मानसिक आजारपण ही अशी एक आरोग्य समस्या आहे ही अनेकांना उशीरा लक्षात येते. मानसिक स्वास्थ्याबद्दल कुणीच उघडपणे बोलत नाही. मनातील ताण, तणाव, चिंता, काळजी कधी नैराश्याचं रूप घेतात हे अनेकांना समजत देखील नाही. त्यामुळे मानसिक आरोग्याचा परिणाम हळू हळू शरीरावर होत जातो. मनातून अशांत असलेली माणसं त्यांची दैनंदिन कामे नियमित करू शकत नाहीत. त्यांचे आहार, विहाराकडे लक्ष नसते. सहाजिकच दातांची स्वच्छता कमी राखली जाते. आहारातून पोषक कमी होणे आणि अस्वच्छता यामुळे अशा लोकांना दातांच्या समस्या जाणवू शकतात. ताणतणावात असलेली माणसं जास्त प्रमाणात साखरेचे अथवा अपथ्याचे पदार्थ खातात. ज्याचा त्यांच्या दातांवर परिणाम होतो. नैराश्यात असलेल्या लोकांना जगण्याचा कंटाळा आलेला असतो त्यामुळे ते दातांच्या आरोग्याकडे फार लक्ष देत नाहीत. मानसिक आजारामुळे होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा परिणाम तुमच्या दातांच्या आरोग्यावर होत जातो. ज्यामुळे जी माणसं अति ताणात, चिंतेत अथवा नैराश्याच्या अधीन जातात त्यांना सतत दातांचे दुखणे सहन करावे लागते.

https://marathi.popxo.com/article/home-remedies-for-wisdom-tooth-pain-in-marathi/

औषधांचा दातांवर होतो परिणाम 

मानसिक आजारपण समजताच त्यावर समुपदेशन आणि वैद्यकीय उपचार करणं गरजेचं असतं. मात्र यासाठी रुग्णांना दिलेल्या औषधांचा परिणामदेखील दातांवर होण्याची शक्यता असते. अॅंटि डिप्रेसेस, अॅंटि सायकोटिक्स औषधांमुळे रूग्णांच्या तोंडात कोरडेपणा निर्माण होतो. तोंड सतत कोरडे पडल्यामुळे दातांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. कारण अशा रूग्णांच्या तोंडात लाळ कमी प्रमाणात निर्माण होते ज्यामुळे तोंडाचे आरोग्य बिघडू शकते. 

ताणाचा कसा होतो दातांवर परिणाम 

ताणतणावामुळे तुमच्या शरीरात होणारे बदल हे तुमच्या नकळत होत जातात. बऱ्याच लोकांना चिंता-काळजी करत स्वतःशी बोलण्याची, दात-ओठ चावण्याची अथवा दात चावण्याची सवय यामुळे लागते. काही लोक रात्री झोपेत दात चावतात तर काहींना ताणामुळे दातखळी बसण्याचा त्रास होतो. अशा सवयी लागल्यास तुमच्या दात, कान, जबड्यावर नकळत परिणाम होऊ लागतो. चेहऱ्यावरचे स्नायू ताणले गेल्यामुळे चेहऱ्याच्या आकारात बदल होतो. थोडक्यात ताणतणावामुळे तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी वेळीच ताणतणावावर नियंत्रण मिळवा आणि योग्य वैद्यकीय मदत घ्या.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Mental Health