DIY लाईफ हॅक्स

पैसा टिकून ठेवायचा असेल तर या गोष्टी नक्की करा

Leenal Gawade  |  Jul 12, 2022
पैसा आकर्षित करणे

जगातील सगळ्यात चंचल गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे पैसा…. खूप जणांना हा अनुभव नक्कीच असेल की,त्यांच्याकडे असलेला पैसा हा काही केल्या टिकत नाही. कमाई तर चांगली आहे. पण ती कमाई येते आणि जाते कशी कधीही कळत नाही. महिना अखेऱीस पैशांची चणचण असणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. पण काही जणांना अगदी कितीही कमाई केली तरी देखील पैसा टिकत नाही असा अनुभव येतो. तुम्हालाही असे सतत वाटते का? की तुमची बरीच स्वप्न असूनही ती केवळ पैशांच्या अभावामुळे पूर्ण होत नाहीत. तर तुमच्यासाठी आजचा विषय खूप महत्वाचा आहे. कारण पैशांअभावी येणाऱ्या तणाव आणि चुकीच्या निर्णयामुळे आपण आपल्या आयुष्यात चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. त्यापेक्षा या सोप्या गोष्टी करुन पाहा. तुमचा पैसा टिकण्यास नक्कीच मदत होईल.

दिवसातून रोज 50 रुपये काढा बाजूला

रतन टाटांनी दिलेल्या एका उदाहरणाचा आज आपण इकडे उपयोग करुया. दिवसातून 50 रुपये वेगळे काढणे हे आपल्यासाठी काहीही कठीण नाही. त्यामुळे घरात एक गुल्लक किंवा पीगी बँक आणून ठेवा.त्यामध्ये रोजचे 50 रुपये ठेवा.  आता हा गुल्लक तुम्हाला लगेच उघडायचा नाही. तुम्हाला वर्षभर त्यामध्ये पैसे साचवायचे आहेत. त्यामुळे पैसे जमा करण्याची सवय तुम्हाला त्यामुळे लागू शकेल. पैसा नको त्या कारणासाठी खर्च होत असेल तर तुम्ही अगदी हमखास रोज ही गोष्ट करायला हवी. 

https://marathi.popxo.com/article/ratan-tata-tips-for-how-to-become-rich-in-marathi/

जे आहेत त्यात समाधानी राहा

पैसा येईल

आपल्याकडे आहात त्यात समाधानी राहणे फार गरजेचे असते. तुमच्याकडे पैसे कमी असतील पण त्यातही तुम्हाला समाधान मानता यायला हवे. जर तुम्ही आहात त्यात समाधान मानले तर त्यामुळे तुमच्याकडे अधिक पैसा येण्यास मदत मिळेल. त्यामुळे समाधानी राहून तुम्ही पैसा कसा मिळवता येईल याचा विचार करा. रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे जे आहे त्याचे समाधान मानून तुमच्या कामाला सुरुवात करा.

या काही गोष्टींसोबत तुम्ही जर काही स्पिरिच्युअल गोष्टींवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही तसेही काही करा. त्यामुळे तुम्हाला पैसा मिळेल अशी खात्री नाही. पण अनेक जण पैशांचा फ्लो निर्माण होईल याची शाश्वती नक्कीच देतात.

  1. दालचिनीचा तुकडा घेऊन तो तुम्ही पाकिटात असलेल्या कोणत्याही नोटमध्ये गुंडाळून ठेवा. त्यामुळे पैशांची आवक वाढते असे सांगितले जाते. 
  2. तमालपत्र हे जर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवले तर तुमचा अनावश्यक खर्च हा टळतो असे म्हणतात. 
  3. जर तुम्हाला कोणतेही कर्ज डोक्यावर नको असेल तर अशावेळी तुम्ही तुमची नखं मंगळवारी कापा. असे म्हणतात की, मंगळवारी नखं कापल्यामुळे तुमच्यावर कर्जाचा डोंगर होत नाही. 
  4. तुमचे पाकिट हे तुम्ही कायम स्वच्छ ठेवायला हवे. लक्ष्मी तेथेच येते. जिथे स्वच्छतेचा वास असतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. 

आता पैसा टिकवून ठेवायचा असेल तर या गोष्टी नक्की करा. 

Read More From DIY लाईफ हॅक्स