आरोग्य

ओमिक्रॉनपासून कसे सुरक्षित रहाल?

Dipali Naphade  |  Dec 10, 2021
omicron

जगात पुन्हा एकदा जुन्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे देशासह राज्यात पुन्हा एकदा भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नसताना आता नव्या रूपात कोरोना पाय रोवू लागला आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांची स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ताप, सर्दी व खोकला, थकवा जाणवणं, मळमळ व उलट्या होणं आणि वारंवार चक्कर येणं अशी समस्या जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली डॉ. तुषार राणे, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट, अपोलो स्पेक्ट्रा मुंबई यांच्याकडून. 

अधिक वाचा – ओमिक्रॉन कोविड प्रकाराची लक्षणे दिसल्यास चाचणीला उशीर करू नका: डॉक्टरांनी दिला इशारा

ओमिक्रॉन म्हणजे नक्की काय?

ओमिक्रॉन प्रकार आता चिंतेचा विषय बनला आहे. या नवीन शोधलेल्या प्रकाराला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ‘चिंतेचा प्रकार’ म्हटले आहे. हा प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत ओळखला गेला आणि तो तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. हा प्रकार अजून भारतात आलेला नाही. परंतु, प्रत्येकाने सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.  संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आधीच्या कोणत्याही व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याची नोंद करण्यात आली आहे. ओमिक्रॉन या विषाणूचा पहिला रूग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आल्यानंतर आता अनेक देशात या विषाणूचा प्रसार होऊ लागला आहे. त्यामुळे ओमिक्रॉन आजार नेमक काय आहे याची लक्षणं कोणती याबाबत पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे. कारण आजाराचे वेळीच निदान व उपचार लवकर झाल्यास रूग्ण बरा होऊ शकतो. 

अधिक वाचा – दीर्घकालीन कोविडमधून बरे होण्यासाठी टिप्स

ओमिक्रॉनची लक्षणे

ज्यांना या स्ट्रेनची लागण झाली आहे त्यांच्यामध्ये लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. एखाद्याला थकवा जाणवेल पण SPO2 पातळीत घट होणार नाही. घसा खवखवणे, अंगदुखी, कोरडा खोकला, सौम्य स्नायू दुखी ही त्याची इतर धोक्याची चिन्हे आहेत. रुग्णालयात दाखल केल्याशिवाय त्यातून बरे होणे शक्य आहे. शिवाय, एखाद्याला गंध कमी होणे आणि चव कमी होणे यासारखी लक्षणे नसू शकतात जी सामान्यतः पहिल्या आणि दुसऱ्या लहरी दरम्यान दिसून येतात.

सध्याची लस या नवीन प्रकाराविरूद्ध प्रभावी ठरेल का?

कोविड-19 विरूद्ध सध्या उपलब्ध लस नव्याने आढळलेल्या ओमिक्रॉन कोविड प्रकाराविरूद्ध प्रभावी आहेत. म्हणून, आपण पूर्णपणे लसीकरण केले आहे, याची खात्री करा. जर तुम्ही पूर्णपणे लसीकरण केले असेल, तर तुम्हाला हा आजार झाला असला तरीही गंभीर आजार होण्यापासून बचाव करण्यात मदत होईल.

अधिक वाचा – कोविड – 19 आणि इतर तापांमधील फरक नक्की काय, घ्या जाणून

या प्रकारापासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

ओमिक्रॉनपासून तुम्हाला जर सुरक्षित राहायचं असेल तर काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या टिप्स नक्की काय आहेत ते पाहूया – 

प्रवासापूर्वी आणि नंतर चाचणी करणे अतिशय गरजेचं आहे कारण, एखाद्याला आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रवास करणे आवश्यक असल्यास या नियमांच पालन केल्यास या आजाराची लागण होण्यापासून स्वतःचा बचाव करता येईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य