DIY लाईफ हॅक्स

तुमचा लॅपटॉप किंवा पीसी स्लो झाला असेल तर असा वाढवा त्याचा स्पीड

Vaidehi Raje  |  Apr 22, 2022
how to boost laptop speed

बरेचदा असे होते की आपल्या लॅपटॉपचा स्पीड खूप कमी होतो, तो सारखा हँग होतो आणि खूप हळू चालतो. अशावेळी काम करणे खूप कठीण होते. तुमच्या हातातील स्लो लॅपटॉप हे उत्पादकता आणि फोकस कमी होण्याचे प्राथमिक कारण असू शकते.  जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामात असता तेव्हा स्लो लॅपटॉपमुळे एखादी कमांड दिल्यावर वाट बघत बसणे आणि त्यामुळे कमी काम होणे हे अत्यंत निराशाजनक असू शकते. तुमचा लॅपटॉप किंवा पीसीचा परफॉर्मन्स झटपट बूस्ट करण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत, ज्या तुम्ही फॉलो करू शकता. लॅपटॉप टेक्निशियन्स उपलब्ध नसले तरी या टिप्स वापरून तुम्ही स्वतःच लॅपटॉपचा किंवा पीसीचा स्पीड बूस्ट करू शकता. 

वापरात नसलेले फोरग्राउंड, बॅकग्राउंड प्रोग्राम क्विट करा 

आत्ता वापरात नसलेले पण चालू असलेले प्रोग्राम, तुमच्या लॅपटॉपची संसाधने चुकीच्या कामासाठी खर्च होण्याचे प्रमुख कारण आहेत. म्हणूनच तुम्हाला तुमच्या कामासाठी आवश्यक नसलेल्या सर्व प्रोग्राम विंडोज बंद करा. हे केल्यावर तुम्हाला लगेच लॅपटॉपचा स्पीड थोडातरी वाढल्याचे  लक्षात येईल. सर्व विंडोज किंवा प्रोग्रॅम्स फक्त ‘X’ बटण दाबून बंद करता येत नाहीत. लॅपटॉपवर कुठले बॅकग्राउंड प्रोग्रॅम्स सुरु आहेत हे देखील तुम्हाला चेक करावे लागेल. त्यासाठी Ctrl+Shift+Esc दाबा आणि विंडोज टास्क मॅनेजरमध्ये काय चालले आहे ते पाहून तुम्ही अनावश्यक बॅकग्राउंड प्रोग्रॅम्स बंद करू शकता. तुम्ही तुमच्या टास्कबारच्या उजव्या बाजूस असलेल्या वरच्या दिशेला बाण दाबून तुमचा सिस्टम ट्रे देखील तपासू शकता की बॅकग्राउंडमध्ये कोणतेही प्रोग्राम चालू आहेत की नाही.

How To Boost Laptop Speed

अनावश्यक ब्राउझर टॅब बंद करा

जर तुमच्या कामात ब्राउझर नेहमी सुरु असल्‍यास व तुमचा लॅपटॉप पुरेसा फास्ट नसल्‍यास तुम्‍हाला टॅबची संख्‍या कमीत कमी ठेवावी लागेल. लक्षात ठेवा की ब्राउझर विंडोमध्ये जितके जास्त टॅब उघडले जातील, तितके तुमच्या RAM आणि प्रोसेसरवर ताण येईल. म्हणून अनावश्यक टॅब्स बंद करा. 

लॅपटॉप रीस्टार्ट करा

तुम्ही लॅपटॉप जर रोज बंद करत नसाल तरीही तो स्लो होऊ शकतो कारण त्यात टेम्पररी कॅशे फाईल्स साचून राहतात. मधून मधून रीस्टार्ट केल्याने टेम्पररी कॅशे मेमरी क्लिअर होते आणि तुमचा लॅपटॉप फास्ट होऊ शकतो. 

Windows 10 साठी काही थर्ड-पार्टी सिस्टम क्लीनअप युटिलिटीज उपलब्ध आहेत ज्या तुमच्या कॉम्प्युटरचा वेग वाढवू शकतात. त्यामुळे तुम्ही कोणतेही क्लिनर ऍप वापरून तुमच्या लॅपटॉपमधील अनावश्यक फाईल्स क्लिअर करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही CC क्लीनर सॉफ्टवेअर वापरून पाहू शकता.

अनावश्यक स्टार्टअप प्रोग्राम बंद करा

जेव्हाही आपण आपला लॅपटॉप किंवा पीसी चालू करतो, तेव्हा त्यावेळी अनेक सिस्टिम्स आपोआप चालू होतात, ज्या बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे आपला लॅपटॉप हळू चालतो. त्यामुळे तुम्हाला लॅपटॉपचा स्पीड वाढवायचा असेल तर हे असले सर्व ऍप्स डिसेबल करा.

डिस्क क्लीनअप करा 

 लॅपटॉपच्या डिस्कचे वेळोवेळी क्लीनअप करणे आणि अनावश्यक फाइल्स डिलीट करणे आवश्यक आहे.  तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ऑनलाइन क्लाउड स्टोरेजमध्ये अधिक फोटो किंवा व्हिडिओ सेव्ह करू शकता जेणेकरून ते तुमच्या लॅपटॉपवर सेव्ह करण्याऐवजी इंटरनेटवर सेव्ह केले जातील. लॅपटॉपमध्ये जास्त काही सेव्ह केलेले नसेल तर त्याचा वेग वाढेल. 

How To Boost Laptop Speed

रॅम वाढवा 

जर तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये जास्त सॉफ्टवेअर किंवा गेम्स इन्स्टॉल केले तर त्याची रॅमही संपते आणि लॅपटॉपचा वेगही हळूहळू कमी होऊ लागतो. त्यामुळे, तुमच्या PC मधील RAM नक्कीच वाढवा, जेणेकरून तुमच्या लॅपटॉपचा वेग वाढेल. 

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पीसी/लॅपटॉपचा स्पीड वाढवू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स