बाळाला जन्म देणे (Childbirth) हे प्रत्येक महिलेसाठी वेगळा अनुभव असतो. मात्र त्याचा आनंद कोणत्याच गोष्टीशी तुलनात्मक होऊ शकत नाही. सिझेरियन डिलिव्हरी (Cesarean Delivery) आणि नॉर्मल डिलिव्हरी (Normal Delivery) या दोन्ही पद्धती बाळाला जन्म देण्यासाठी वेगळ्या असतात. नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा सिझेरियन डिलिव्हरी करणाऱ्या मातांना खूपच त्रास सहन करावा लागतो. नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा ही पद्धत खूपच वेगळी असते. यामध्ये बाळाला बाहेर काढण्यासाठी पोटाच्या खाली एक मोठा कट देण्यात येतो. पण सिझेरियन डिलिव्हरीमध्ये सर्वात मोठी काळजी असते ती म्हणजे टाक्यांची काळजी घेणे. टाके असलेल्या जागेची काळजी घेणे. यादरम्यान टाक्यांची योग्य काळजी न घेतल्यास, बरं होण्यास (recovery of health) वेळ लागतो अथवा याठिकाणी इन्फेक्शन होण्याचा धोकाही असतो. अनेक जणांचे सिझर डिलिव्हरीनंतर टाकेही निघतात अथवा टाक्यांमध्ये पू निर्माण होतो. महिलांना याबाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी काय काळजी घ्यायला हवी याबाबत तुम्ही जाणून घ्या.
टाक्यांची बाबतीत काय घडते?
हल्ली अधिकाधिक महिला या मुलांना सिझर पद्धतीनेच जन्म देतात. पण यामध्ये टाक्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण ज्या महिलांना मधुमेह आहे अथवा ज्या महिला अधिक जाड असतात त्यांना सिझर झाल्यानंतर टाक्यांची अधिक काळजी घ्यायला हवी. कारण सिझर झाल्यानंतर टाके भरण्यासाठी अधिक वेळ लागतो. ज्यांना मधुमेह आहे अशा महिलांना तर टाके भरण्यासाठी खूपच वेळ लागतो. जर टाके नीट झाले नाहीत अथवा टाके निघाले तर अशा महिलांना रोज ड्रेसिंग करावे लागते. तर काही महिलांच्या बाबतीत टाके काढून पुन्हा टाकेदेखील घालावे लागतात. इन्फेक्शन असल्यास, अशा स्थितीत लॅबमध्ये परीक्षणासाठीही पाठवले जाऊन याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ज्या महिला डाएट करत नाहीत, त्यांना टाके सुकण्यात त्रास होतो.
अधिक वाचा –
सर्जरी का करावी लागते?
सिझेरियन डिलिव्हरीनंतर महिलांना अँटिबायोटिक, विटामिन सी, अँटीइन्फ्लेमेटरी इत्यादी औषधे देण्यात येतात. अँटिबायोटिक दिल्यानंतर आणि नियमित ड्रेसिंगनंतरही जर एखाद्या महिलेचे टाके सुकले नाहीत तर पुन्हा टाके घालण्याची गरज भासते. त्यानंतर सात दिवसांनंतर ड्रेसिंग करण्यात येते. पण यानंतरही टाक्यांनी त्रास होत असेल तर मात्र सर्जरी करावी लागते. त्यामुळे टाक्यांची काळजी घेण्याची गरज भासते.
अधिक वाचा – सी – सेक्शन (सिझेरियन) समज आणि गैरसमज
सिझेरियन डिलिव्हरीनंतर टाक्यांची काळजी घेताना कपडे बदला
तुम्ही रूग्णालयातून बँडेड लाऊनच घरी जात असाल तर तुम्ही दिवसातून एक वेळ टाके कव्हर करणारे कपडे नक्की बदला. टाके ओले असल्यास, हे कापड एकापेक्षा अधिक वेळा बदला. टाके किती वेळ झाकून ठेवायचे आहेत याचा सल्ला तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून घेऊ शकता.
- टाके ओले असताना घरी आल्यानंतर काही दिवस त्या ठिकाणी पाणी लाऊ देऊ नका. आंघोळ करणे टाळा
- आंघोळ करताना विशेषत्ज्ञांच्या निर्देशानुसारच तुम्ही आंघोळ करा अन्यथा इन्फेक्शन होऊ शकते
- काही महिलांना टाके असणाऱ्या ठिकाणी खाज येते आणि हे होणे अतिशय नैसर्गिक आहे
- सिझर झाले असेल आणि बाळ लहान आहे हे लक्षात घेऊन आईने नखं न वाढवणं योग्य आहे. यामुळे बाळांना आणि आईला दोघांनाही नुकसान होऊ शकतं
- स्वच्छतेची काळजी घ्यावी. ज्यामुळे टाके पिकत नाहीत आणि त्रासही होत नाही
सीझर डिलिव्हरीनंतर टाके न निघण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे काळजी घ्यावी. नवजात आईसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की कळवा.