बाथ अॅंड बॉडी

हॅंडवॉश खरेदी करताना काय काळजी घ्यावी

Trupti Paradkar  |  Dec 24, 2021
how to choose right handwash in Marathi

निरोगी राहण्यासाठी आणि इनफेक्शन दूर ठेवण्यासाठी हात स्वच्छ धुणे गरजेचं आहे. हात कमीत कमी वीस सेकंद धुतले तरच निर्जंतूक होतात. हात कसे धुवावे आणि किती वेळ धुवावे यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे नियम काटोकोर पाळणे हिताचे ठरेल. आता कोरोनामुळे तर लोकांना सतत हात धुण्याची चांगली सवयच लागली आहे. बाहेरून घरी आल्यावर, सार्वजनिक वस्तूंना हात लावल्यावर, जेवणापूर्वी, झोपण्यापूर्वी, सौचविधी नंतर, टॉयलेटचा वापर केल्यावर हात व्यवस्थित स्वच्छ करायला हवेत. जर हात न धुता तुम्ही चेहरा अथवा त्वचेवर हात लावला तर तुम्हाला त्वचेच्या समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे नियमित हात धुणे हा निरोगी राहण्याचा चांगला पर्याय आहे. मात्र यासाठी तुम्ही हॅंडवॉश वापरत असाल तर तो खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.

how to choose right handwash in Marathi

कसा असावा तुमचा हॅंडवॉश

आजकाल हात धुण्यासाठी हॅंडवॉशचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यासाठी जाणून घ्या तुमचा हॅंडवॉश कसा असायला हवा.

जंतू नष्ट करणारा 

हॅंडवॉश घेताना त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय पाहाल तर तो जंतू नष्ट करणारा असेल. थोडक्यात जर्म प्रोटेक्शन देणाऱ्या हॅंड वॉशची या काळात तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे. कारण साबणाने तुमच्या हातावरील धुळ, माती, प्रदूषण निघेल पण त्यामुळे जंतू नष्ट होतीलच याची खात्री देता येत नाही. जर तुमचा हॅंडवॉश बॅक्टेरिआ नष्ट करणारा असेल तर तुमचा चिंता काळजी करण्याची गरज नाही.

सुगंधित

जंतू नष्ट करणाऱ्या हॅंडवॉशला एक प्रकारचा उग्र वास असतो. त्यामुळे तुमच्या हॅंड वॉशमध्ये चांगला सुगंध असेल याची काळजी घ्या. कारण सुगंधामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो. शिवाय चांगला वास असेल तर तुम्ही हॅंड वॉश सतत वापराल आणि तुमचे हात जंतूपासून सुरक्षित राहतील. आजकाल निरनिराळ्या फळांच्या, फुलांच्या वासाचे हॅंड वॉश मिळतात. ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटू शकते.

तुमच्या तेलकट त्वचेसाठी हे फेस वॉश आहेत एकदम परफेक्ट (Face Wash For Oily Skin In Marathi)

उत्तम मॉइस्चराइझर 

चांगल्या गुणवत्तेचे हॅंडवॉश तुमचा हात स्वच्छ करतातच शिवाय तुमच्या हाताच्या त्वचेचं पोषणही करतात. कारण त्यामध्ये तुमच्या हाताच्या त्वचेला पोषण देणाऱ्या मॉइस्चराइझिंग घटकांचा समावेश केलेला असतो. त्यामुळे जेव्हा हॅंड वॉश खरेदी कराल तेव्हा त्याच्यामध्ये कोणला फॉर्म्युला आणि इतर घटक आहेत हे जरूर पाहा.

कोरड्या चेहऱ्यावर असतील मुरूमं, तर नक्की ट्राय करा ‘हे’ फेस वॉश (Best Face Wash For Pimples)

हार्श केमिकल्स नसलेला

हॅंडवॉश खरेदी करताना त्यामध्ये हार्श केमिकल्स नाहीत हे अवश्य तपासून पाहा. कारण जर तुम्ही असं स्टॉंग केमिकल्स असलेलं हॅंड वॉश वापरलं तर तुमच्या हाताच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठी नेहमी केमिकल फ्री हॅंड वॉश खरेदी करा आणि तुमच्या हाताची योग्य काळजी घ्या. 

पाण्याची बचत करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स (How To Save Water In Marathi)

Read More From बाथ अॅंड बॉडी