Skin Care Products

उन्हाळा येतोय, त्वचेची काळजी घेण्यासाठी निवडा स्वतःसाठी योग्य सनस्क्रीन

Vaidehi Raje  |  Mar 11, 2022
उन्हाळा येतोय, त्वचेची काळजी घेण्यासाठी निवडा स्वतःसाठी योग्य सनस्क्रीन

सनबर्न आणि त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत सनस्क्रीन लावण्याचे महत्त्व आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे. परंतु केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर  खरोखर वर्षभरच आपण सनस्क्रीन नियमितपणे लावले पाहिजे. तुमच्या त्वचेचा रंग किंवा टोन काहीही असो, नेहमी बाहेर जाताना सनस्क्रीन लावा. प्राचीन इजिप्तमधील लोक सुद्धा त्याकाळी सनस्क्रीन लावत असत. ते लोक तांदळाच्या कोंड्याचा अर्क आणि चमेलीचा लेप लावून त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करत असत. 

ढगाळ वातावरणात देखील सनस्क्रीन आवश्यक 

सूर्याची 80 टक्के किरणे ढगांमधून आरपार जाऊ शकतात, म्हणून जर आपण असे गृहीत धरले की ढगाळ वातावरण असेल आणि ऊन नसेल तर त्यादिवशी सनस्क्रीन लावले नाही तरीही चालेल तर तसे नाही. अगदी तुम्ही बर्फाळ प्रदेशात गेलात तरी सनस्क्रीन आवश्यक असते कारण बर्फ हा 80 टक्के अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांना परावर्तित करू शकतो, ज्यामुळे त्वचेला सूर्याच्या किरणांपासून असलेला धोका वाढतो. आपण जितक्या उंच ठिकाणी जाऊ तितके  UV एक्सपोजर वाढते. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात जर बर्फाळ प्रदेशात फिरायला जाणार असाल तर तिथे सनस्क्रीन नक्कीच लावा. आपली त्वचा कोणत्या प्रकारात मोडते हे जाणून घेऊन आपण त्याप्रमाणे सनस्क्रीन निवडले पाहिजे. 

कोरडी त्वचा 

जेव्हा तुमची त्वचा कोरडी असते, तेव्हा तुमच्या त्वचेला आर्द्रता मिळणे आवश्यक आहे. अशा वेळी तुम्ही क्रीमच्या स्वरूपात असलेले मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन घेऊ शकता. जे तुम्हाला मॉइश्चरायझर नंतर लावता येऊ शकेल. सेरामाइड्स, ग्लिसरीन, हायलुरोनिक ऍसिड, मध यांसारख्या मॉइश्चरायझिंग घटकांनी समृद्ध असलेले कोणतेही सनस्क्रीन तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. 

तेलकट त्वचा

तुमची त्वचा तेलकट असल्यास, मॅट फिनिशसह वॉटर-बेस्ड किंवा जेल फॉर्म्युलामध्ये असलेले सनस्क्रीन निवडा जे तुमच्या त्वचेचे पोअर्स ब्लॉक करणार नाहीत. तुमच्या सनस्क्रीनमधील ग्रीन टी, टी ट्री ऑइल किंवा नियासिनामाइड यांसारखे घटक तुम्हाला त्वचेवरील सिबमचे उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे हे घटक असलेले सनस्क्रीन तुम्ही निवडू शकता. 

मायग्लॅमचे हे जेल बेस्ड सनस्क्रीन तेलकट त्वचेसाठी आणि सेन्सिटिव्ह त्वचेसाठी फायदेशीर आहे.

सामान्य त्वचा

तुमची त्वचा सामान्य असल्यास, योग्य सनस्क्रीन निवडताना तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. जेल बेस्ड, क्रीम बेस्ड, ऑरगॅनिक असे कोणतेही सनस्क्रीन तुम्हाला चालू शकेल. जर तुम्ही प्रयोग करू इच्छित असाल, तर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक टिंटेड SPF पैकी एखादे सनस्क्रीन वापरून बघा. 

वाचाएसपीएफ (SPF) म्हणजे काय

संवेदनशील त्वचा

तुमची त्वचा संवेदनशील असल्यास, सनस्क्रीन खरेदी करताना तुम्हाला अनेक घटक टाळावे लागतात ज्याने तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. अल्कोहोल, सुगंध, ऑक्सिबेन्झोन, पॅरा-एमिनोबेंझोइक ऍसिड (PABA), सॅलिसिलेट्स हे घटक असलेले सनस्क्रीन तुम्हाला चालणार नाहीत. झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साइड असलेले सनस्क्रीन तुमच्यासाठी योग्य आहेत. 

सनस्क्रीन निवडताना हे लक्षात ठेवा 

मायग्लॅमचेचे हे ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन उन्हाळ्यासाठी अगदी योग्य आहे.

सनस्क्रीन निवडताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. 

फोटो क्रेडिट – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Skin Care Products