गंज (rust) फक्त लोखंडाच्या वस्तूंना वा भांड्यांनाच लागतो असं नाही. तर स्टीलच्या भांड्यांनाही (steel utensils) गंज चढतो. हा गंज केवळ भांड्यांचे सौंदर्यच खराब करत नाही तर भांड्याचा टिकण्याचा काळही कमी करतो. अनेक सामान्य धातूंनाही गंज चढतो. तुम्ही निरीक्षण केले असेल की, आपण गॅससाठी वापरतो तो लायटरदेखील स्टीलचा असतो. पण जुना झाल्यानंतर त्यालाही गंज लागतो. पण स्टीलच्या भांड्यांना लागलेला गंज काढून टाकता येतो का? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नक्कीच हो असे आहे. काही घरगुती उपाय वापरून तुम्ही हा गंज काढून टाकू शकता. असेच काही सोपे घरगुती उपाय घ्या जाणून –
अधिक वाचा – स्वयंपाघरातील तेलकट, चिकट डाग असे करा कमी
इनो आणि लिंबाचा वापर (eno and lime)
कोणत्याही स्टीलच्या भांड्यांना गंज लागला असेल तर ती भांडी स्वच्छ करण्यासाठी इनो आणि लिंबाचा वापर करा. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. एका बाऊलमध्ये तुम्ही इनो घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर टूथब्रशच्या मदतीने तुम्ही गंज लागलेल्या ठिकाणी हे मिश्रण लावा आणि साधारण 15 मिनिट्स तसंच राहू द्या. त्यानंतर सँडपेपर घ्या आणि गंज लागलेल्या ठिकाणी घासा. ही टिप्स वापरल्यास, तुम्हाला स्टीलच्या भांड्याला लागलेला गंज निघून गेलेला नक्की दिसेल.
अधिक वाचा – मिनिटात स्वच्छ करा जळलेली भांडी, सोप्या टिप्स
बेकिंग सोडा आणि इसेन्शियल ऑईलचा वापर (Baking soda and essential oil)
अनेक घरगुती स्वच्छतेच्या बाबतीत आपण बेकिंग सोड्याचा वापर करत असतो. याचा साफसफाईशिवाय दुर्गंधी दूर करण्यासाठीही उपयोग करण्यात येतो. तुम्ही स्टीलच्या भांड्यांवरील गंज काढण्यासाठी यामध्ये काही गोष्टी मिक्स करून याचा उपोयग करून घेऊ शकता.
- सर्वात पहिले कापसाचा बोळा घ्या आणि त्यावर अॅपल साईडर व्हिनेगर स्प्रे करा. त्यानंतर बेकिंग सोडा स्टीलच्या गंज लागलेल्या भांड्याला लावा आणि मग सदर कापसाच्या बोळ्याने रगडा
- लक्षात ठेवा की, मध्ये मध्ये या कापसाच्या बोळ्यावर तुम्हाला व्हिनेगरचा स्प्रे मारत राहावा लागेल. कारण भांड्यावरील गंज काढताना हे सुकू शकते. हे अजिबात सुक देऊ नका आणि साधारण 5 मिनिट्स व्यवस्थित रगडून स्वच्छ करा आणि मग स्वच्छ कपड्याने पुसून घ्या
- गंज काढून झाल्यावर दुसऱ्या स्वच्छ कपड्यावर एसेन्शियल ऑईलचे काही थेंब घाला आणि मग त्याने पुसून घ्या. यामुळे भांड्यांची चमकही राहील आणि गंजही निघून जाईल
अधिक वाचा – दिवाळीमध्ये मिनिट्समध्ये भांडी स्वच्छ करायची असतील तर सोपे हॅक्स
मीठ आणि लिंबाचा तुकडा (Salt and lime)
स्टीलच्या भांड्यांना गंज लागला असल्यास, लिंबू आणि मिठाचा वापर करावा. याने गंज पटकन काढण्यास मदत मिळते.
- सर्वात पहिले एका बाऊलमध्ये 2 चमचे मीठ घ्या आणि ते लिंबाच्या तुकड्यावर लावा
- आता हा लिंबाचा तुकडा तुम्ही गंज लागलेल्या ठिकाणी रगडा. साधारण 5-10 मिनिट्स रगडून गंज काढा
- त्यानंतर पाण्याने आणि डिशवॉश लिक्विडने तुम्ही हे स्वच्छ करा आणि चांगल्या कपड्याने पुसून घ्या
- भांड्यांची चमक तुम्हाला पूर्वीसारखीच दिसेल
स्टीलच्या भांड्यांची अशी घ्या काळजी
- बऱ्याचदा स्टीलची भांडी जास्त झाल्याने आपण माळ्यावर टाकून देतो. भांडी अशीच ठेवल्यास, त्यांना गंज लागतो. त्यामुळे वर टाकलेली भांडी मधूनमधून स्वच्छतेसाठी बाहेर काढत जा
- गॅससाठी वापरण्यात येणारे लायटर ओल्या कपड्याने स्वच्छ करत असाल तर सुक्या कपड्यांचा वापर करा. तसंच आठवड्यातून एक दिवस याची व्यवस्थित स्वच्छता करा
- स्टीलच्या भांड्यांना धुतल्यानंतर लगेच ट्रॉलीमध्ये ठेऊ नका. संपूर्ण सुकल्यानंतर ठेवा. अशीच भांडी ठेवली तर त्यांना गंज चढतो
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक