DIY लाईफ हॅक्स

कडधान्य शिजत नसतील तर वापरा या सोप्या ट्रिक्स

Leenal Gawade  |  Dec 9, 2021
कडधान्य शिजवण्यासाठी

कडधान्य ही आरोग्यासाठी फायद्याची असतात म्हणून खूप जणांच्या आहारात कडधान्यांचा समावेश करतात. उकडलेले कडधान्य, कडधान्यांची उसळ मूगांच्या रेसिपी तर खूप जणांच्या आवडीच्या आहेत. खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा आहारात समावेश करतात.पण बाजारात मिळणारी सगळीच कडधान्य ही चांगल्या दर्जाची असतातच असे नाही. खूप वेळा चांगली दिसणारी कडधान्य भिजली तरी शिजता शिजत नाही. कडधान्य शिजले नाही आणि ते कच्चे खाल्ले गेले की, त्याचा पोटाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे कडधान्य ही 100 टक्के शिजवून खायला हवीत. तुमच्याकडे असलेले कडधान्य शिजत नसतील तर तुम्ही काही सोप्या ट्रिक्सचा वापर करायला हवा.

कडधान्य घ्या शिजवून

कडधान्य शिजवताना

खूप जण एखादी उसळ करताना ती थेट ग्रेव्हीमध्ये भिजवलेले कडधान्य घालून शिजवतात. पण असे करु नका. त्यापेक्षा तुम्ही भिजलेले कडधान्य कुकरमध्ये शिजवून घ्या. कुकरमध्ये पाणी, हळद आणि मीठ घेऊन त्यामध्ये भिजवलेले कडधान्य घातले आणि त्याला चांगल्या शिट्ट्या काढून घेतल्या तर त्याची भाजी किंवा रस्सा रणे खूपच सोपे जाते. त्यामुळे तुम्ही कडधान्य भिजवून आधी कुकरमध्ये शिजवून घ्या आणि मगच त्याचा वापर करा.त्यामुळे कडधान्यांची चव तर वाढतेच. शिवाय ते पोटासाठीही चांगले असते.

तेलाचा असा करा वापर 

अनेकदा कडधान्य जुनी झालेली असली की ती पटकन शिजत नाहीत. पण ही कडधान्य फेकून द्यायलाही नकोसे होते. अशावेळी तुम्ही ती कडधान्य जितक्या लवकर असेल तितक्या लवकर वापरात घ्या. तुमच्याकडे असलेली जुनी कडधान्य तुम्ही साधारण 7 ते 8 तासांसाठी भिजत घाला. ती चांगली फुगली की त्यानंतर तुम्हाला कुकरमध्ये किंवा एखाद्या भांड्यात शिजवताना त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचे आहे. तेल टाकल्यामुळे कडधान्य छान मऊसूत शिजतात तुम्हाला नक्कीच चविष्ट आणि चांगली लागतात.

मटकीपासून बनवा चटकदार रेसिपी आणि वजन करा कमी

सोडा

मूग

खूप जण कडधान्य भिजत घातल्यानंतर ती शिजवताना सोडा घालतात. सोडा घातल्यामुळे कडधान्य शिजण्यास मदत होऊ लागते. खूप जणांना कडधान्यांमध्ये सोडा घालायला अजिबात आवडत नाही. जर तुम्हाला सोडा घालायला आवडत नसेल तर तुम्ही त्याचा वापर करु नका. पण सोड्यामुळेही कधीतरी आयत्यावेळी तुमचे काम होऊ शकते. कडधान्य शिजवण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकतो. 

मीठ घालू नका

डाळी आणि कडधान्य शिजवताना त्यामध्ये मीठ घातले की, ते पटकन शिजत नाही. त्यामुळे कोणतेही कडधान्य तुम्ही भिजत घातले असतील. तर ते शिजवताना तुम्ही त्यामध्ये मीठ घालू नका. कडधान्यांना चांगली शिट्टी काढून झाली की मग तुम्ही त्यामध्ये मीठ घाला. आधी मीठ घातल्याने पदार्थाला चांगले मीठ लागते म्हणून खूप जण मीठ आधी घालतात. पण काही कडधान्यांसाठी ही ट्रिक कामी येत नाही. त्यामुळे मीठ कधी घालावे हे देखील तुम्हाला माहीत असायला हवे. 

आता कडधान्य शिजत नसतील तर या ट्रिक्स वापरा

Read More From DIY लाईफ हॅक्स