निरोगी जीवन

नितंबावरील फॅट होईल कमी नियमित करा हे व्यायाम

Leenal Gawade  |  Oct 7, 2021
नितंबावरील फॅट करा कमी

हल्ली मोठे नितंब कोणालाही आवडत नाही. हल्ली बसून बसून खूप जणांचे नितंब मोठे होऊ लागले आहेत. नितंबाचे फॅट खूप जास्त वाढले असतील आणि तुम्हालाही असे मोठे नितंब मुळीच आवडत नसतील तर तुम्ही काही गोष्टींची काळजी आणि व्यायाम करायला हवा. जर तुम्ही थोडासा वेळ काढला आणि व्यायाम केला तर तुम्हाला नितंबावरील फॅट कमी करण्यास मदत होईल. काही सोपे व्यायामप्रकार केले तर तुम्हाला अगदी महिन्याभरात नितंबावरील फॅट कमी कऱण्यास मदत मिळेल. चला जाणून घेऊया हे व्यायामप्रकार

वॉकिंग

लोव्हर बॉडी कमी होण्यासाठी थोडा वेळच लागतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी त्याच्या संदर्भातील व्यायाम करताना पायांचा अधिक व्यायाम करावा लागतो. नितंब कमी करताना तुम्ही सगळ्यात जास्त चालणे गरजेचे असते. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढे चाला. दिवसात किमान 10000  पावलं होतील इतके चाला. त्यामुळे तुमच्या पायांचा व्यायाम होतो. फॅट कमी होण्यासाठी वॉकिंग हा फारच फायद्याचा आहे. त्यामुळे तुम्ही त्याची सुरुवात तुम्ही चालण्यापासून करा.  त्यामुळे तुमचे नितंब कमी होण्यास मदत होते. 

रनिंग

धावणं हा देखील नितंबासाठी खूप चांगला व्यायाम आहे. तुम्ही जितकं धावाल. तितका तुम्हाला नितंब कमी करायला फायदा मिळतो. त्यामुळे शक्य असेल तेव्हा रनिंग करा.धावण्यामुळे पायांना आलेला लठ्ठपणा आणि नितंबावरील फॅट कमी होण्यास मदत मिळते. स्लो रनिंगपासून सुरुवात करा आणि त्यानंतर तुम्ही धावण्याचा स्पीड वाढवा. तुम्ही जितके जलद गतीने धावायला लागाल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. दिवसातून किमान 30 मिनिटं तरी रनिंग करा.

डक वॉक 

डक वॉक हा सुद्धा पायांसाठी खूपच चांगला असा व्यायाम आहे. डक वॉक करण्यासाठी तुम्हाला बस फुगडीच्या अवस्थेत यायचे आहे. तसे बसून तुम्हाला चालायचे आहे. तसे करताना तुमच्या मांडी आणि नितंबावर चांगला ताण पडतो. त्यामुळे डक वॉक हा करायलाच हवा. डक वॉक पहिल्या पहिल्यांदा करताना खूप त्रास होतो पण नंतर हा वॉक करणे खूप सहज आणि सोपे होऊन जाते.

डॉग किक

कुत्रा ज्याप्रमाणे किक मारतो. त्यासाठी तुम्हाला त्या पोझीशनमध्ये यायचे आहे. समोर बघत तुम्हाला साईडने पाय उचलत किक मारायची आहे. असे केल्यामुळे पायांचा व्यायाम होतो. पायांना जोरात हिसका बसताना नितंबाची हालचालही होते. असे तुम्ही दोन्ही पायांचे करायचे आहे. यामुळे नितंबच नाही तर तुमच्या मांड्याचा सैल पडलेला भागही टोन्ड होण्यास मदत मिळते. 

आता हे व्यायामप्रकार आवर्जून कर आणि तुमच्या नितंबामधील फरक पाहा.

Read More From निरोगी जीवन