DIY लाईफ हॅक्स

पावसाळ्यात घरात माश्या त्रास देत असतील तर हे उपाय करा

Vaidehi Raje  |  Jul 6, 2022
How To Get Rid Of Flies

पावसाळा सुरू होताच घरात अनेक प्रकारचे कीटक डास व माश्या दिसू लागतात. कितीही हाकलले तरी माश्या पुन्हा पुन्हा अन्नपदार्थांवर, भाज्यांवर, फळांवर किंवा घरातील भांड्यांवर बसतात. त्यामुळे आपण कितीही स्वच्छता पाळली तरी बाहेरचे जंतू माश्यांबरोबर घरात येतात आणि पदार्थ दूषित होतात. आपण घर कितीही स्वच्छ ठेवले तरी घरात माश्या येतच राहतात.कधीकधी माश्या बाथरूममध्ये फिरतात आणि नंतर थेट स्वयंपाकघरात प्रवेश करतात.त्यामुळे स्वयंपाकघरात ठेवलेले खाद्यपदार्थ दूषित होतात. त्यामुळे पावसाळ्यात जर माश्या तुमच्या घरात येऊ लागल्या असतील तर कुठल्याही हानिकारक रसायनांचा वापर न करता तुम्ही त्यांना दूर करू शकता.

तुळशीच्या पानांचा स्प्रे बनवा 

How to Get Rid of Flies at Home

तुळशीच्या पानांच्या सुगंधामुळे माश्या दूर पळतात. तसेच तुळस ही आपल्यासाठीही फायदेशीर आहे त्यामुळे तुळशीचा वापर करणे प्रभावी ठरू शकते. तुम्ही तुळशीच्या पानांपासून घरीच स्प्रे बनवू शकता किंवा बाजारातून तुळस असलेला स्प्रे खरेदी करू शकता. स्प्रे तयार करण्यासाठी तुळशीची 12-14 पाने गरम पाण्यात भिजवून ठेवा व काही वेळाने त्यांची पेस्ट तयार करा. पेस्ट गाळून घ्या व ते पाणी स्प्रे बाटलीत भरा. याच्या वापराने माश्या पळून जातील. 

ऍपल सायडर व्हिनेगर आणि निलगिरी तेलाचा वापर करा 

How to Get Rid of Flies at Home

ऍपल सायडर व्हिनेगर आणि निलगिरी तेल माश्यांना घालवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. या दोन घरगुती गोष्टींपासून तुम्ही हर्बल स्प्रे बनवू शकता. स्प्रे बनवण्यासाठी 1/4 कप ऍपल सायडर व्हिनेगर आणि निलगिरी तेलाचे 50 थेंब घ्या. हे दोन्ही स्प्रे बाटलीत टाकून मिक्स करा. हे मिश्रण घरातील माश्या घालवण्यासाठी वापरा. 

कापराचा स्प्रे आहे प्रभावी 

How to Get Rid of Flies at Home

कापराच्या वासाने माश्या निघून जातात. कापराचा तीव्र सुगंध माश्यांना आवडत नाही. म्हणून, आपण आपल्या घरातून माश्यांना घालवण्यासाठी कापराचा स्प्रे तयार करू शकता. हे करण्यासाठी भीमसेनी कापराच्या 8-10 वड्या बारीक करून त्यांची पावडर बनवा. नंतर ही पावडर एका ग्लास पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत टाकून घरात जिथे जास्त माश्या असतील तिथे फवारा. कापराच्या सुगंधामुळे इतर कीटक देखील घरात येणार नाहीत.

इसेन्शियल ऑईल्सचा करा वापर 

How to Get Rid of Flies at Home

इसेन्शियल ऑईल्सचे अनेक उपयोग आपल्याला माहित आहेत. पण हे ऑईल्स कीटकांना दूर करण्यासाठीही प्रभावी आहेत. हा स्प्रे बनवण्यासाठी, तुम्ही लवंग तेल,  ओव्याचे ऑइल, पेपरमिंट ऑइल, लेमनग्रास ऑइल आणि दालचिनी तेल यांसारखे तीव्र सुगंध असलेले ऑईल्स वापरू शकता. स्प्रे बनवण्यासाठी, प्रत्येक तेलाचे 10 थेंब घ्या. नंतर त्यात दोन कप पाणी आणि दोन कप व्हाईट व्हिनेगर घाला. आता सर्व साहित्य नीट मिसळा. तुमचा सुगंधी कीटनाशक स्प्रे तयार आहे. 

संत्र्याच्या सालीचा वापर करा 

How to Get Rid of Flies at Home

संत्र्याची साले वाळवून जाळल्यास त्याच्या धुरामुळे माश्या पळून जातात. त्यासाठी चार-पाच संत्र्यांची साले उन्हात नीट वाळवावी लागतात. मग ही साले तुमच्या घरात जिथे माश्यांचा जास्त त्रास असेल तिथे जाळा. असे केल्याने माश्या लगेच पळून जातील.

दालचिनी पावडरचा वापर

How to Get Rid of Flies at Home

दालचिनीच्या वासामुळेही माश्या पळून जातात, त्यांना त्याचा वास अजिबात आवडत नाही. जर तुमच्या घरात जास्त माश्या असतील तर तिथे दालचिनी पावडर शिंपडा, यामुळे माश्या लगेच पळून जातील.

आल्याचा स्प्रे वापरा 

How to Get Rid of Flies at Home

आल्याचा स्प्रे माश्यांना घालवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यासाठी एका भांड्यात चार कप पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे सुंठपूड किंवा आल्याची पेस्ट घाला. आता हे मिश्रण चांगले मिसळा. यानंतर हे मिश्रण चांगले गाळून घ्या आणि स्प्रे बाटलीत भरा. घरातील ज्या ठिकाणी माश्या जास्त फिरतात त्या ठिकाणी हा स्प्रे मारा. 

अशा प्रकारे तुम्ही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून घर माश्यांपासून मुक्त करू शकता. 

फोटो क्रेडिट – istockphoto 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स