DIY लाईफ हॅक्स

लाल मुंग्यांचा त्रास कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

Leenal Gawade  |  Apr 10, 2022
लाल मुंग्यांचा त्रास करा कमी

एवढीशी मुंगी चावली तरी ती एका मोठ्या प्राण्यालाही रडवून ठेवते. घरात ठिकठिकाणी मुंग्या दिसू लागल्या की काहीही ठेवायची सोय नसते  खूप जणांच्या घरी कितीही आणि काहीही केले तरी देखील लाल मुंग्या आपला माग काढून येतात. एकदा मुंग्याना काहीतरी खाण्याचा गंध किंवा शोध लागला की, त्या काही केल्या ती जागा पुन्हा शोधून काढतात आणि पुन्हा येतात. लाल मुंग्या घरात येण्याचे संकेत देत असतात.  तुम्हालाही अशा लाल मुंग्यांच्या त्रासाने खूप हैराण केले असेल तर अशावेळी काही सोपे उपाय करुन तुम्हाला त्यापासून सुटका मिळवता येतील.

 लाल मुंग्यांचा त्रास असा करा कमी

लाल मुंग्यांचा त्रास

घरात अचानक लाल मुंग्या दिसू लागल्या असतील तर तुम्हाला काही सोपे उपाय घरच्या घरी करता येतील. त्यामुळे मुंग्यांचा त्रास नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल. 

  1. लिंबाची साल : घरत लाल मुंग्या सतत येत असेल तर तुम्ही  लिंबू पिळून झाल्यानंतर त्याची साल जपून ठेवा. ती ओली साल ज्या ठिकाणी मुंग्या येत आहे तिथे ठेवली तर त्या ठिकाणी मुंग्या येत नाहीत. लिंबाच्या वासामुळे मुंग्याची रांग तुटते आणि ते त्या ठिकाणाहून लगेच निघून जातात. तुम्हाला पटकन असा पर्याय हवा असेल तर तुम्ही हा उपाय करु शकता. 
  2. तमालपत्र : मसाल्याच्या डब्यात असलेले तमालपत्र जर तुम्ही तोडून तोडून लाल मुंग्यांचा असलेल्या ठिकाणी टाकले तरी देखील त्यामुळे मुंग्या निघून जाण्यास मदत मिळते. तमालपत्राला देखील मसाल्याचा एक दर्प असतो. त्यामुळे मुंग्या आपोआप निघून जातात. 
  3. मीठ: मीठ जेवणाची चव वाढवते हे आपण जाणतो. या शिवाय हे अँटीबॅक्टेरिअल आहे. त्यामुळे अनेक गोष्टी जाण्यास मदत मिळते. फरशी पुसताना तुम्ही त्या पाण्यामध्ये मीठ घातले आणि मग फरशी पुसली की त्या ठिकाणी मुंग्या पुन्हा येत नाहीत. लादी पुसताना किंवा ज्या ठिकाणाहून मुंग्या येतात. अशा ठिकाणी तुम्ही मीठाच्या पाण्याने लादी पुसायला अजिबात विसरु नका. 
  4. लवंग: गरम मसाल्यामधील लवंग ही देखील यासाठी खूपच जास्त फायदेशीर ठरते. ज्या ठिकाणी मुंग्या आलेल्या असतील तेथे तुम्ही थोडे गरम केलेले लवंग ठेवा. लवंगाचा वास आला की, त्यामुळे त्या आपोआप दूर पळून जातात. 
  5. हळद: हळद हा देखील मुंग्या घालवण्यासाठी सर्वात माहीत असलेला असा उपाय आहे. ज्या ठिकणी तुम्हाला मुंग्याची रांग दिसेल त्या ठिकाणी तुम्ही हळद टाका. त्यामुळे मुंग्याची रांग तुटते आणि मुंग्या पांगतात. 
  6. लाल तिखट: घरात असलेले लाल तिखट असेल तर तुम्ही लाल मुंग्यावर टाका. त्यामुळेही लाल मुंग्या निघून जातात. त्या पुन्हा येत नाहीत. लाल मुंग्यांना लाल तिखट टाकताना थोडे जपून राहा. कारण त्याचा त्रास इतरांना होऊ शकतो. 

लाल मुंग्या चावल्यावर

लाल मुंग्या चावल्यानंतर ती जळजळ खूपच त्रासदायक असते. जर लहान मुलांना किंवा तुम्हालाही मुंग्या चावल्या असतील तर अशावेळी घरात असणारे कोणतेही मॉश्चरायझर लावायला हरकत नाही. त्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला जळजळ खूप जास्त होत असेल तर तुम्ही त्यावर बर्फ लावला तरी देखील चालू शकेल. 

आता घरी मुंग्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्की हे उपाय करायला विसरु नका. 

Read More From DIY लाईफ हॅक्स