DIY लाईफ हॅक्स

घरात कोळी वाढले असतील तर असे करा सोपे उपाय

Leenal Gawade  |  Oct 7, 2021
कोळ्यांचा त्रास असा करा कमी

 घरात थोडी जरी धूळ किंवा घाण वाढली की, धरात किटक येऊ लागतात. त्यातल्या त्यातल्या त्यात घरात कोष्टकांची जाळी तयार झाली की, अगदी नकोसे होऊ लागते. कोष्टकांची किंवा कोळ्याची जाळी येण्यास फारसा वेळ लागत नाही. घरात थोडीशी अडचण झाली की, लगेच कोळ्यांची जाळी येऊ लागतात. तुमच्या घरातही कोळ्यांची जाळी वाढत असतील .ठिकठिकाणी तुम्हाला मोठमोठ्या पायांचे कोळी दिसू लागली असतील तर ते घालवण्यासाठी तुम्ही काही सोपे असे उपाय करु शकता. त्यामुळे तुमचे घर फ्रेश आणि स्वच्छ दिसेल. खूप जण घरी पेस्ट कंट्रोल देखील करुन घेतात. पण त्याऐवजी काही सोप्या ट्रिक्स तुम्ही अगदी आरामात करु शकता. 

कमी बजेटमध्येही सजवू शकता तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर, या टिप्स करा फॉलो

लिंबाच्या किंवा सिट्रस असलेल्या साली 

घरात कोळ्यांचा वावर वाढला असेल आणि ठिकठिकाणी जळमट दिसू लागली असतील तर तुम्ही लिंबाच्या साली किंवा सिट्रलच्या साली म्हणजजे लिंबू- संत्री- मोसंबी अशा साली घेऊन तुम्ही फळांच्या साली ठेवू शकता. जिथे जिथे तुम्हाला कोळ्यांची जाळी दिसत असतील त्या त्या टिकाणी तुम्ही या साली ठेवू शकता. त्यामुळे कोळ्यांचा त्रास कमी होण्यास नककीच मदत मिळेल.

पेपरमिंट तेल

Instagram

पेपर मिटंच्या तेलाचा त्रास कोळ्यांना होतो. त्यांना अजिबात या तेलाचा वास आवडत नाही. त्यामुळे घरात एक वेघला वास येतो. त्यामुळे तुम्ही पेपरमिंट तेलाचा उपयोग करुन त्याचा शिडकावा करु शकता. पेपरमिंटच्या वासामुळे कोळी दूर होण्यास मदत होते. याला थोडा वेळ लागतो. पण त्याचा उपयोग तुम्ही नक्कीच करु शकता.  एका स्प्रे बॉटलमध्ये पेपरमिंटचे तेल घेऊन त्याचा वापर करु शकता. 

निलगिरीचे तेल 

निलगिरी तेलाचा दर्प हा खूप जणांना आवडत नाही. त्याचा वास हा एकदम स्ट्राँग असतो. त्याच्या वापरामुळेही कोळ्याची जाळी ही कमी होण्यास मदत मिळते. निलगिरीचे तेल कापसावर घेऊन तुम्ही तो कापूस शेल्फ, खिडकीच्या कडांना आणि कोपऱ्यात तुम्ही निलगिरी तेलाचा कापूस ठेवा. त्यामुळे निलगिरी तेलाचा वापर करुन तुम्ही त्याचा वापर करु शकता.  जर तुमच्याकडे निलगिरीचे तेल नसेल तर तुम्ही निलगिरीचे पाने ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.

पूजेची भांडी कशी ठेवावीत जपून, जाणून घ्या टिप्स

स्वच्छता

सतत स्वच्छता राखणे हे प्रत्येकाच्या हातात असते. जर तुम्ही तुमच्या घरांचे कोपरे अतिशय घाणेरडे ठेवले असतील किंवा तुम्ही रोजच्या रोज कचरा काढत नसाल तर तु्म्ही त्या कोपऱ्याची स्वच्छता करायला हवी. तुम्ही चांगले फ्लोअर क्लिनर वापरुन चांगली स्वच्छता करा त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईलय 

आता घरात कोळी वाढले असतील तर नक्की हे सोपे उपाय करा.

तांदळाला कीड लागत असेल तर करा सोपे उपाय

Read More From DIY लाईफ हॅक्स