DIY लाईफ हॅक्स

कणीक अधिक तास ताजी ठेवायची असल्यास वापरा सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Nov 10, 2021
how-to-keep-wheat-dough-fresh-for-long

आपल्याकडे सर्वात जास्त जेवणामध्ये जर काही खाल्ले जात असेल तर ते म्हणजे गव्हाच्या पोळ्या (चपाती). गव्हाची पोळी करण्यासाठी आपल्याकडे कणीक भिजवणे अत्यंत आवश्यक आहे. गोलकार आणि मऊ पोळ्या आपण वेगवेगळ्या भाज्यांसह खातो. कणीक भिजवताना गव्हाचे पीठ, पाणी आणि तेलाचा वापर करण्यात येतो. मात्र तरीही प्रत्येकाच्या पोळ्या या वेगळ्या होतात. कणीक भिजवून काही घरांमध्ये फ्रिजमध्येदेखील ठेवली जाते आणि त्याच्या रात्री अथवा दुसऱ्या दिवशी पोळ्या केल्या जातात. मात्र ही पद्धत योग्य नाही. तुम्हाला कणीक अधिक तास ताजी ठेवायची असेल तर काही सोप्या टिप्स वापरण्याची गरज आहे. कारण बऱ्याचदा पोळ्या करण्यासाठी कणीक आधी तिंबत ठेवली जाते. मात्र मग कणीक उन्हाळ्याच्या दिवसात लवकर खराब होण्याचीही शक्यता असते. गव्हाचे पीठ चपाती करताना अधिक महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. जर गव्हाचे पीठ योग्य नसेल तर तुमची पोळी अजिबातच मऊ होणार नाही. त्यामुळे कणीक अधिक तास ताजी राहण्यासाठा जाणून घ्या सोप्या टिप्स. 

पाण्याचा जास्त वापर करू नका

पोळीची कणीक भिजवताना ही गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे की, यामध्ये अधिक पाणी घालू नका. असं केल्यामुळे कणीक खराब होते आणि पोळ्या मऊ होत नाहीत. जेव्हा तुम्ही कणीक मळता तेव्हा पाण्याचा अधिक उपयोग करू नका. पाण्याचे योग्य प्रमाण तुम्ही घ्या. जर कणीक अधिक सैलसर झाली तर त्यात अधिक गव्हाचे सुके पीठ घाला आणि कणीक व्यवस्थित मळून घ्या. त्यानंतर साधारण कणीक अर्धा तास तिंबत ठेवा आणि मगच त्याचे गोळे करून पोळ्या लाटायला घ्या. 

कणीक मळताना त्यात तेल घालणे आवश्यक

पोळीची कणीक भिजवताना लक्षात ठेवा की त्यामध्ये तेल अथवा तुपाचे योग्य प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे. तेल अथवा तूप हे चपाती अधिक मऊ करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. तेल आणि तूप या दोन्ही गोष्टी कणीक भिजवताना खूपच आवश्यक आहेत. कणीक खराब होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही जेव्हा भिजवून झाल्यानंतरही वरून तेल अथवा तूप लावता तेव्हा ती कणीक अधिक चांगली राहते आणि मऊ राहण्यास मदत मिळते. तसंच कणीक काळी पडत नाही. तुम्ही या टिप्सचा वापर केला तर तुम्हा पोळ्या नक्कीच मऊ आणि मुलायम मिळतील. 

कोमट पाणी अथवा दुधाचा वापर करा

आपल्याला जेव्हा कणीक मऊ बनवायची असेल अथवा अधिक तास ताजी ठेवायची असेल तर तुम्ही कणीक भिजवताना कोमट पाणी अथवा दुधाचा वापर करावा. तसंच हे पीठ मळताना साधारण 10-15 मिनिट्स व्यवस्थित तुम्ही मळा. नियमित थंड पाण्याचा वापर करून कणीक अधिक घट्ट बनते आणि पोळ्या बनवणे अधिक कठीण होते. 

एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा 

तुम्हाला त्वरीत पोळ्या बनवायच्या नसतील आणि कणीक ठेवायची असेल तर ती अशीच ठेऊ नका. कारण अशीच कणीक फ्रिजमध्ये अथवा बाहेर ठेवल्यास ती काळी पडते. कणीक तुम्ही एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा तरच ती अधिक काळ व्यवस्थित टिकू शकते आणि कणकेला आंबटपणाही निर्माण होत नाही. कणकेतील बॅक्टेरियामुळे कणीक लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अधिक तास कणीक स्टोअर करण्यासाठी एअर टाईट कंटेनरचा चांगला वापर करता येऊ शकतो.

प्लास्टिक रॅप अथवा अल्युमिनिअर फॉईलने करा कव्हर 

प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा कणीक काढता तेव्हा ती एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा अथवा प्लास्टिक रॅप वा अल्युमिनिअम फॉईलमध्ये कव्हर करा. यामुळे कणीक अधिक काळ टिकण्यास मदत होते आणि ताजी राहाते. साधारण गव्हाचे पीठ हे 6 महिने टिकू शकते, जर तुम्ही व्यवस्थित एअर टाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे ठेवलेत. तसंच तुम्हाला हवं असेल तर गव्हाचे पीठ तुम्ही रेफ्रिजरेटरमध्येही ठेऊ शकता. 

विशेष सूचना – कणीक भिजवल्यानंतर जास्त काळ नाही ठेवली तरच ते आरोग्यासाठी अधिक योग्य आहे. कारण त्याचा आपल्या आरोग्यावर अधिक वाईट परिणाम होतो. त्यामुळे वेळीच कणीक भिजवून पोळ्या करून ताज्या पोळ्या खाणे शरीरासाठी आणि आरोग्यासाठीही योग्य ठरते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स