अगदी आउटगोइंग आणि सोशल लोकांनाही दिवसाच्या शेवटी रिलॅक्स होण्यासाठी एका शांत आणि आरामदायी जागेची आवश्यकता असते आणि शांतता मिळवण्यासाठी आपण तर कुठे जंगलात किंवा हिमालयात जाऊ शकत नाही. आपल्याला स्वतःच्याच घरात आपला असा एक शांत व आरामदायी कोपरा हवाहवासा वाटतो आणि ती जागा म्हणजे आपली बेडरूम असते. आपली बेडरूम हे आपल्यासाठी शांतता मिळवण्याचे एक स्थान असावे, चांगले पुस्तक घेऊन रिलॅक्स करण्याची जागा असावी जिथे आपण सगळं विसरून आराम करू शकतो. वास्तुशास्त्रानुसार बेडरूम असली तर त्यामुळे ती आणखी आरामदायक असेल असे शास्त्र सांगते.
प्रत्येकालाच स्वतःची स्पेस मिळणे आणि वेळ काढणे आवश्यक असते. आपण आपल्या संपूर्ण आयुष्याचा एक तृतीयांश काळ झोपेत घालवतो. त्यामुळे ज्या खोलीत ही क्रिया घडते ती खोली चांगल्या रात्रीच्या झोपेला प्रोत्साहन देण्यासाठी ऑप्टिमाइझ केलेली असावी. तुमची स्वतःची सुव्यवस्थित, आरामशीर आणि वैयक्तिक जागा असणे इतके महत्त्वाचे आहे. आणि ही जागा म्हणजे बेडरूमच असू शकते. शांत झोप व आरामासाठी आपली बेडरूम अधिक आरामदायक कशी बनवता येईल यासाठी खाली काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.
बेडरूम स्वच्छ व नीटनेटकी ठेवा
सर्वप्रथम, तुमची बेडरूम स्वच्छ ठेवा. हे केवळ स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टीने चांगले नाही तर ते आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे. स्वच्छ व नीटनेटक्या जागेत आपले मन शांत व तणावमुक्त होण्यास मदत होते.कधीकधी लोक त्यांच्या बेडरूममध्ये अतिरिक्त वस्तू ठेवतात ज्या इकडे-तिकडे विखुरलेल्या असतात. या वस्तूंचा पसारा होतो.अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये प्रवेश करता तेव्हा तुमच्या मनात एक तणाव निर्माण होतो. हे तुमच्यासोबत घडू नये म्हणून बेडरूम नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. यामुळे मनाला आनंदाची अनुभूती मिळते.
अरोमा कॅण्डल्स लावून वातावरण प्रसन्न ठेवा
आजच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या व विविध सुगंधांच्या अरोमा कॅण्डल्स उपलब्ध आहेत. जर तुम्हाला तुमची बेडरूम अधिक आरामदायक बनवायची असेल, तर तुम्ही ती सुगंधी बनवण्यासाठी व वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी अरोमा कॅण्डल्स वापरू शकता. त्यातून येणारा गोड सुगंध तुमच्या मनाला शांत करेल आणि तुम्हाला खूप हलके आणि चांगले वाटेल. तुम्हाला केमिकलयुल्क्त कॅण्डल्स वापरायच्या नसतील तर सुगंधासाठी तुम्ही इसेन्शियल ऑईल्स वापरू शकता. अरोमा डिफ्युजरच्या मदतीने तुम्ही या इसेन्शियल ऑईल्सचा सुगंध वातावरणात पसरवू शकता ज्याने तुमचे मन प्रसन्न होईल व खोलीतील आर्द्रता देखील टिकून राहील.
छोट्या छोट्या झाडांनी बेडरूम सजवा
जर तुम्हाला बेडरूम सजवायची असेल तर आरामदायी आणि प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी तुम्ही बेडरूममध्ये छोटी छोटी झाडे लावू शकता. यासाठी तुम्ही बोन्साय किंवा एअर प्लांट्स किंवा इनडोर प्लांट्स लावू शकता.ही रोपे तुमच्या बेडरूमची हवेची गुणवत्ता तर सुधारतीलच व तुमच्या खोलीत सकारात्मक लहरी देखील तयार होतील. तुमच्या डोळ्यांसमोरील हिरवळ तुमच्या मनात सकारात्मकता निर्माण करते, ज्यामुळे तुम्हाला आराम वाटेल. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लव्हेंडर, रोजमेरी, लिली, थाईम अशी सुगंधी रोपे बेडरूममध्ये किंवा बेडरूमच्या बाल्कनीत लावू शकता.
बेडरूममध्ये ऑफिसचे काम शक्यतोवर करू नका
कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून, लोक अनेकदा बेडरूममध्ये बेडवर बसून काम करत आहेत. पण अशा प्रकारे आराम व रिलॅक्स करण्याच्या जागेचे रूपांतर वर्कस्पेस मध्ये झाले आहे. याचा परिणाम असा होतोय की तुमच्या मनात सतत कामाचेच विचार सुरु असतात आणि तुम्ही रिलॅक्स होऊ शकत नाही. म्हणूनच बेडरुममध्ये शक्यतोवर ऑफिसचे काम करू नका.
अशा प्रकारे तुम्ही तुमची बेडरूम अधिक आरामदायक बनवू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक