रेसिपी

फ्रोजन फ्रुट्स स्मुदी खाल, तर आईस्क्रिम विसरुन जाल

Leenal Gawade  |  Jun 14, 2022
frozen_fruit_smoothie

फळांचे सेवन करायला अनेकदा खूप जणांना आवडत नाहीत. डाएट करणाऱ्यांना आहारात जास्तीत जास्त फळांचे सेवन करणे गरजेचे असते. थोडं वेगळ्या पद्धतीने फळ खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही मस्त फ्रोजन फळांची स्मुदी करुन पिऊ शकता. ही स्मुदी रोजच्या स्मुदीसारखी अजिबात प्यायची नाही. तर तुम्हाला ही स्मुदी मस्त फ्रोजन फ्रुट्सपासून बनवून खायची आहे . अशापद्धतीने बनवलेल्या स्मुदीला सॉरबेट (Sorbet) असे देखील म्हटले जाते. खूप वेळा डाएटवर असताना साखर असलेले पदार्थ खाऊ नका असा सल्ला दिला जातो. अशावेळी तुमच्या थंडची भूक भागवण्यासाठी तुम्ही मस्त फ्रोजन फ्रुट्स स्मुदी खायला हवी. हे बनवणे फारच सोपे आहे. चला जाणून घेऊया वेगवेगळ्या पद्धतीने फ्रोजन फ्रुट्स स्मुदी कशी बनवायची ते.

असे करा फ्रुट्स फ्रोजन

फ्रोजन स्मुदी बनवण्यासाठी तुम्हाला मस्त फ्रोजन फ्रुट्स लागणार आहेत. बाजारात फ्रोजन फ्रुट्स मिळतात. पण जर तुम्हाला ते विकत घ्यायचे नसतील तर तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या फळांपासून फ्रोजन फ्रुट्स बनवू शकता. 

  1. तुमच्या आवडीचे फळ घेऊन त्याला स्वच्छ करुन त्याचे तुकडे करुन घ्या. यामध्ये तुम्ही वेगवेगळी फळ घेऊ शकता. 
  2. एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ही फळ काढून घ्या. जर तुम्हाला मिक्स फ्रुट चालणार असेल तर एकत्र केली तरी चालू शकतात. जर वेगवेगळी स्टोअर करुन शक्य असेल तरी देखील चालू शकेल. 
  3. कापलेली फळ फ्रोजन होण्यासाठी साधारण 8 तास लागतात. त्यामुळे तुम्ही तेवढा वेळ फळ ठेवायला हवीत. फ्रिजरमध्ये ठेवलेली फळ ज्यावेळी तुम्हाला वापरायची असतील तेव्हा ती सतत काढून नका. एकावेळी सगळी फळ वापरा

अशी बनवा मस्त फ्रोजन स्मुदी

तुमच्या आवडीची फळ फ्रोजन केल्यानंतर तुम्ही त्यापासून मस्त स्मुदी बनवू शकता. चला जाणून घेऊया काही कॉम्बिनेशन 

  1. आवडीचे कोणतेही कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही ही फ्रोजन स्मुदी बनवू शकता. जर तुम्हाला पिवळ्या रंगाची स्मुदी हवी असेल तर तुम्ही मस्त केळी, अननस, आंबा फळ घालू शकता. ज्यामुळे स्मुदीचा रंग पिवळा होईल. 
  2. एक्झोटिक फळ खायला आवडत असतील तर तुम्ही पीच, प्लम, ड्रॅगन फ्रुट असे घेऊन ते क्रश करु शकता त्यामुळे याचा रंग छान गुलाबी असा येईल. ड्रॅगन फ्रुट निवडताना ते गुलाबी गराचे निवडा तेही चवीला खूपच छान लागते. 
  3. हिरवा रंग हा ही खूप जणांना आवडतो. अशी ग्रीन स्मुदी प्यायची असेल तर तुम्ही किवी या फळाचा वापर करु शकता. किवी फ्रोजन करुन त्यामध्ये बनाना, पायनॅपल आणि पालकाची काही पाने घाला ते मिक्सरला लावा. त्यामुळेही तुम्हाला मस्त हिरवा रंग मिळेल. 

अशापद्धतीने तुम्ही मस्त फ्रोजन स्मुदी बनवा. ती खायला मजा तर येतेच शिवाय त्यामुळे फळही पोटात जातात. 

Read More From रेसिपी