Ayurveda

फुलांपासून बनवा नैसर्गिक फेस पॅक , त्वचेच्या अनेक समस्यांसाठी आहेत लाभदायक

Vaidehi Raje  |  Jul 5, 2022
Homemade Floral Face Packs

आपली त्वचा तेजस्वी आणि नितळ असावी अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. प्रत्येकालाच केवळ काही खास प्रसंगांसाठीच नाही तर कायमस्वरूपी निरोगी आणि सुंदर त्वचा हवी असते. निरोगी त्वचा असल्‍याने प्रचंड आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःच्या दिसण्याबाबत एक सकारात्मक भावना निर्माण होते. निरोगी व नितळ त्वचा मिळावी म्हणून पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंटच घेतल्या पाहिजेत असे नाही. आहार-विहार व्यवस्थित, नियमित व्यायाम आणि तणाव चांगल्यापैकी मॅनेज केल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तसेच स्किन केअर रुटीनमध्ये नैसर्गिक गोष्टींचा समावेश केल्यास त्वचेला भरपूर फायदा होतो. 

तुमच्या बागेतील आणि आजूबाजूच्या सुंदर फुलांचे अनेक त्वचेसाठी फायदे आहेत. या फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून आपण सुंदर त्वचेसाठी घरीच फेसपॅक बनवू शकतो. हे फेसपॅक इतर रासायनिक व कृत्रिम स्किनकेअर उत्पादनांपेक्षा त्वचेसाठी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. फुलांपासून बनवलेले फेस पॅक केवळ मुरुम कमी करण्यासाठीच नाही तर एक्झिमा सारखे त्वचा रोग कमी करण्यासही मदत करतात. याशिवाय काही फुलांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि अँटीफंगल गुणधर्म देखील असतात जे चेहऱ्याला बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गापासून वाचवू शकतात. या फुलांपासून फेस मास्क बनवणे खूप सोपे आहे आणि तुम्ही ते घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

लोटस फ्लॉवर फेस पॅक

कमळाचे त्वचेसाठी असंख्य फायदे आहेत. कमळाची फुले त्वचेला खोलवर हायड्रेट करण्याचे काम करतात आणि त्वचेची लवचिकता वाढवतात. कमळाने त्वचा उजळते व चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी देखील ते उपयुक्त आहे. याशिवाय यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीवायरल गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. यासोबतच ज्यांना मुरुम आणि एक्झिमाची समस्या आहे त्यांच्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे.

Homemade Floral Face Pack

कमळाच्या काही पाकळ्या घ्या आणि त्या बारीक वाटून घ्या. मॅश करताना त्यात थोडे पाणी घाला आणि नंतर एक चमचा दूध आणि मसूर डाळीचे पीठ घाला. हा फेस पॅक चेहऱ्यावर पंधरा मिनिटे राहू ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

लिली फेस पॅक

Homemade Floral Face Pack

लिली फेस पॅक त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. लिलीच्या पाकळ्या बारीक करून त्यात मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिसळा आणि चेहऱ्याला लावा. काही वेळ असेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. तुमच्या त्वचेची छिद्रे उघडण्यासोबतच ते त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्याची चमक वाढवते.

ग्लिसरीन आणि गुलाब फेस पॅक

Homemade Floral Face Pack

ग्लिसरीन आणि गुलाबाचा फेस पॅक बनवायला खूप सोपा आहे. यासाठी देशी गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या बारीक करा आणि त्यात दूध व ग्लिसरीन मिसळा. हे सगळे चांगले एकत्र मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. गुलाबामध्ये असलेले नैसर्गिक तेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते व त्वचा मऊ आणि चमकदार बनवते. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असलेली साखर संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी फायदेशीर आहे. या फेसपॅकने त्वचा आतून स्वच्छ होते. यातील दुधामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होते तर  ग्लिसरीन त्वचेला आर्द्रता प्रदान करते ज्यामुळे त्वचेचे पोषण होते. 

चमेली फेस पॅक

Homemade Floral Face Pack

चमेलीच्या फुलाचे अनेक फायदे आहेत. विशेषतः कोरडी त्वचा असलेल्यांसाठी हे फायदेशीर आहे. हा फेसपॅक त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करण्याचे काम करतो. चमेलीचे फूल बारीक करून त्यात थोडे दूध आणि बेसन घालावे. हा फेसपॅक क्लिन्जर म्हणून चेहऱ्यावर लावा, 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवून नंतर धुवून टाका. या फेसपॅकमुळे तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर होईल.

अशा प्रकारे नैसर्गिक उपाय करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. 

Feature Image- istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Ayurveda