रेसिपी

बाहेरुन का आणायचा पेरीपेरी मसाला, सहज बनवा घरी

Leenal Gawade  |  Jul 18, 2022
घरीच बनवा पेरी पेरी मसाला

चटपटीत आणि चमचमीत खाणे ज्यांना आवडते त्यांच्यासाठी आजचा दिवस हा फारच महत्वाचा आहे. कारण तुमचा लाडका पेरीपेरी मसाला जो तुम्ही सगळ्यात घालून घाता तो विकत आणण्यापेक्षा तुम्ही मस्त घरीदेखील बनवू शकता. आपल्याकडे हल्ली अनेक पदार्थांवर हा मसाला घातला जातो. मस्त तिखट आणि तितकाच चविष्ट असा हा मसाला. एखाद्या साध्या जेवणाचीही रंगत वाढवतो.  

परदेशात सफर करताना ज्यावेळी आपल्याला खूप तीव्र काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी हा पेरीपेरी मसाला खूपच आठवतो. कारण परदेशात कितीही भारतीय पद्धतीचे जेवण मिळत असले तरी देखील तेथील चवीत बरेच अंतर पडते. अशावेळी फ्राईज, बर्गर, पिझ्झा अशा गोष्टींवर अवलंबून राहावे लागते. अशावेळी जर तुम्हाला हा थोडासा पेरीपेरी मसाला (Peri Peri Masala) कशावरही थोडासा भुरभुरता आला तर त्याची चव छान वाढते. आता हा मसाला घरी बनवण्याआधी त्याचा शोध कसा लागला तेही जाणून घेऊया

पेरी पेरी मसाला म्हणजे नेमकं काय?

फ्राईजवर घातलेला मस्त पेरीपेरी मसाला

आफ्रिका आणि पोर्तुगीज यांच्या खानपान पद्धतीमध्ये काही खास तिखट मिरच्यांचा समावेश होतो. या तिखट मिरच्या भारतीयांसाठी सर्वसामान्य असल्या किंवा ज्या देशात अधिक मसाले खाल्ले जातात तिथे या सर्वसाधारण चवीच्या असल्या तरी देखील यांची चव काही देशांसाठी ही खूपच जास्त आहे. या खास मिरच्यापासून सॉस आणि काही मिश्र मसाले वापरुन त्याची पावडर अर्थात मसाला केला जातो. तर अशा प्रकारे पेरी पेरी मिरच्यांपासून पेरी पेरी मसाला तयार केला जातो. 

असा बनवा पेरी पेरी मसाला

असा बनवा पेरी पेरी मसाला

पेरी पेरी मसाला जर तुम्ही चाखला असेल तर तो एकदम खास अशा चवीचा आहे. या मध्ये पेरी पेरी मिरच्यांसोबत अन्य काही मसाल्यांचा देखील समावेश केला जातो. 

साहित्य:  2 चमचा गार्लिक पावडर, 2 चमचे कांदा पावडर, 1 चमचा साखर,  2 चमचे पार्सले, सिट्रीक ॲसिड, 2 चमचे ओरिगॅनो, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे स्वीट पेपरीका, मीठ 

कृती:

एका ब्लेंडरमध्ये तुम्ही वरील सगळे साहित्य एकत्र करुन वाटायचे आहे.असे करताना तुम्ही हे सगळे साहित्य आधी एक भांड्यात एकत्र करा आणि कुटा. 

जर तुम्हाला हा मसाला अगदी कोर्स म्हणजेच बारीक हवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये एतदा फिरवला तरी देखील चालू शकतो. 

 (टीप: या मसाल्यामध्ये जर तुम्ही साखर जास्त घातली तर तो मसाला एकदम गोड लागेल. शिवाय पेरी पेरी ही आफ्रिकेची ओळख असल्यामुळे तो मसाला थोडा तिखट असणे गरजेचे असते.)  

आता तुम्हीही मस्त घरीच असा पेरीपेरी मसाला बनवायला अजिबात विसरु नका. 

Read More From रेसिपी