DIY लाईफ हॅक्स

दुधावर जाड साय तयार होण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

Trupti Paradkar  |  Apr 20, 2022
दुधावर जाड साय तयार होण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

घरी तयार होणारी मलई म्हणजेच साय ही बाजारातील मलईपेक्षा नक्कीच चांगली असते. खाद्यपदार्थ सजवण्यासाठी, तूप तयार करण्यासाठी, खाण्यासाठी  आणि सौंदर्य खुलवण्यासाठी दुधावरची साय वापरली जाते. मात्र बऱ्याचजणांची अशी तक्रार असते की दुधावर बाजारात मिळणाऱ्या मलईप्रमाणे जाड साय तयार होत नाही. जर तुम्हाला घरच्या घरी मलई तयार करायची असेल तर, तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता. ज्यामुळे तुमच्या घरच्या दुधातही जाड साय तयार होऊ शकते. मात्र यासाठी तुम्ही फुल क्रिम म्हशीचं दूध अथवा गाईचं दूध वापरायला हवं. कारण स्किम्ड मिल्कवर साय नेहमी पातळच येते. यासोबतच जाणून घ्या दुधाची साय फायदे, सौंदर्य खुलवण्यासाठी करा वापर | Dudhachi Say Fayde

दूध उकळण्याची पद्धत

दुधावर जाड साय हवी असेल तर आधी तुम्ही दूध उकळण्याची पद्धत बदला. कारण जर तुम्ही दूधाच्या कूकरमध्ये दूध उकळत असाल तर तुम्हाला हवी तशी साय मिळत नाही. दूधावर साय तेव्हाच जाड तयार होते जेव्हा दूध चांगलं उकळलेलं असतं. यासाठी दूध चांगलं उकळू द्या आणि मग ते थंड करा. यासाठी दूध थेट फ्रीजमधून काढल्यावर तापवू नका. शिवाय दूध नेहमी मंद आंचेवर उकळत ठेवा. दूध तापवल्यावर ते झाकून ठेवू नका. पातेल्यात काही पडू नये यासाठी तुम्ही छिद्र असलेले झाकण यासाठी वापरू शकता. 

चमच्याने ढवळत राहा

दूधावर चांगली आणि जाड साय हवी तर दूध उकळताना त्यामध्ये अधून मधून चमच्याने ढवळा. जेव्हा दुधाला उकळी येण्यास सुरुवात होते तेव्हा एक ते दोन वेळा चमच्याने दुधावर येणारे बुडबुडे बाजूला करा. असं केल्यामुळे दूध जास्त उकळलं जाईल आणि जमा केलेल्या बुडबुड्यांपासून जास्त जाड मलई तयार होईल. या प्रकारासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल पण परिणाम खूपच चांगला आणि लवकर मिळेल. 

मातीच्या भांड्यात दूध गरम करा

दूध गरम करण्यासाठी तुम्ही कोणते भांडे वापरता, कितीवेळ आणि कसं दूध गरम करता हे महत्त्वाचं आहे. यासाठीच दुधावर जाड साय मिळवण्यासाठी दूध मातीच्या भांड्यात गरम करा. कारण मातीच्या भांड्याच्या तापमानामुळे दूध संथपणे गरम होतं आणि थंड होतं. ज्यामुळे तुम्हाल चांगली साय मिळू शकते. 

आम्ही शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स