पोहणे हा अनेकांचा आवडीचा व्यायामप्रकार आहे. विशेषत: उन्हाळ्यात तर अनेकांना स्विमिंग पूलमध्ये उतरायला आवडते. तसेच विविध प्रकारच्या राइड्स असणाऱ्या वॉटर पार्कमध्ये तर लोक तासंतास रमतात. पोहण्याचे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी ही एक चांगली क्रिया असल्याचे म्हटले जाते. अर्थात श्रीमंत लोकांकडे त्यांचा स्वतःचा स्विमिंग पूल असतो परंतु सर्वसामान्य व्यक्तीच्या घरात स्विमिंग पूल नसतो, त्यामुळे त्यांना सार्वजनिक जलतरण तलाव हाच एकमेव पर्याय उरतो. ज्यामुळे लोकांना कमी खर्चात पोहण्याचा आनंद लुटण्याची संधी मिळते, पण स्विमिंग पूलच्या पाण्यात असणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये पोहताना कशी काळजी घ्यायची तसेच संसर्ग होऊ नये म्हणून काय करावे हे पुढे वाचा.
स्विमिंग पूलमध्ये गेल्याने होऊ शकते फंगल इन्फेक्शन
बुरशीजन्य संसर्गामुळे उन्हाळ्यात त्वचेचा दाह होण्याची समस्या वाढू शकते. खास करून पावसाळ्यात व उन्हाळ्यात तर बुरशीजन्य संसर्गाच्या सर्वाधिक केसेस असतात. आणि पोहताना ते आणखी वाढते. वास्तविक, आपल्या शरीरात जिथे जास्त आर्द्रता असते तिथे घर्षणामुळे बुरशीजन्य संसर्ग होतो. जसे काखेत, मांड्या, स्तनाखाली किंवा पायाची बोटे आणि बोटांच्या मध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकते. कधीकधी असे होते की ज्याला फंगल इन्फेक्शन झालेय अशी व्यक्ती पूल मध्ये उतरली तर त्यामुळे ते इन्फेक्शन इतरांनाही होऊ शकते.
क्लोरीनचे दुष्परिणाम होऊ शकतात
क्लोरीन हे अत्यंत शक्तिशाली रसायन आहे जे स्विमिंग पूलच्या पाण्यातील जीवाणू मारण्यासाठी वापरले जाते. कधीकधी हे देखील पुरळ उठण्याचे एक कारण असते. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा, सूज आणि खाज येते. हे जर ते वाढले तर त्याचे एग्झिमा मध्ये रूपांतर होऊ शकते.
पोटाला इन्फेक्शन होऊ शकते
एक्रिप्टोस्पोरिडियम, म्हणजे क्रिप्टो, स्विमिंग पूल आणि वॉटर पार्कच्या पाण्यात आढळतो. क्रिप्टो हा एक परजीवी आहे जो आपल्या आतड्यांवर आणि श्वसन प्रणालीवर परिणाम करतो. त्यामुळे जुलाबही होऊ शकतात. जेव्हा स्विमिंग पूलमधील दूषित घाण पाणी तोंडात जाते, तेव्हा जुलाब होण्याची शक्यता वाढते. याशिवाय जलतरण तलावाच्या घाण पाण्यामुळे ई-कोलाय आणि हिपॅटायटीस ए चा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.
केसांमध्ये उवा होऊ शकतात
सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये पोहल्याने केसांमध्ये उवा होऊ शकतात. याचे कारण असे की स्विमिंग पूलमध्ये केस ओले होतात आणि उवा या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या केसांत जाऊ शकतात.
क्लोरीनचे हवे योग्य प्रमाण
आवश्यक रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, जलतरण तलावातील क्लोरीन आणि पीएच पातळी योग्य नसल्यास, जलतरणपटू आजारी पडू शकतात. म्हणून, जंतूंना मारण्यासाठी, पीएच पातळी 7.2, 7.6 आणि 7.8 असणे आवश्यक आहे, या प्रमाणात शरीराला देखील त्रास होत नाही. याशिवाय योग्य प्रमाणात क्लोरीन काही मिनिटांत ई-कोलाय सारखे जीवाणू नष्ट करते.
म्हणूनच पोहण्यामुळे आजारी पडायचे नसेल तर पूलमधून बाहेर पडल्यानंतर अनवाणी चालू नका, तर लगेच चप्पल घाला. पोहण्याच्या आधी आणि नंतर आंघोळ करायला विसरू नका. तुम्हाला जखम झाली असल्यास पोहू नका आणि केस घट्ट बांधायला विसरू नका. शक्यतोवर पोहताना स्विमिंग कॅप घाला.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From Uncategorized
चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून परत येण्यासाठी शाहरूखने घेतली मेहनत, ट्रेनरने केला खुलासा
Trupti Paradkar
भारतीय स्किन टोनवर शोभतात हे ब्लश
Dipali Naphade